Showing posts from September, 2024

दिव्यांगाचे पेंशन वाटप वेळेवर करा महिलाध्यक्ष सौ अरूणाताई काकड यांची मागणी मनोज भगत प्रतिनिधी, अकोलाअकोला : दिव्यांगाना शासनाकडुन दरमहा पंथराशे रुपये मानधन दिले जाते परंतु ते मानधन वेऴेवर मिऴत नाही ते वेऴेवर मिऴावे ही मागणी प्रहार अपंग संघटना अकोला महिलाध्यक्षा सौ अरूणाताई काकड यांनी शासनाकडे केली आहे समाजातील शेवटचा घटक म्हणजे दिव्यांग आहे तो अत्यंत हलाखीचे परिस्थिति मधे जीवन जगत असुन आणि शासना कडुन तुटपुंजे मानधन मिऴत असुन तें ही दोन तीन महिने मिऴत नाही. ज्यावेळेस तहसिल कार्यालयास विचारणा केली असता नायब तहसिलदार उडवा उडवीचे उत्तरे मिळतात.शासनाने आता मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना राबविली असुन लाडकी बहिन यांना पंधराशे रूपये मानधन देत आहे तेंही एका महिने मधे दोन महिने चे एकत्रित हप्ता टाकत असुन मात्र आमचे दिव्यांग बांधवांना मात्र तीन तीन महीने मानधन येत नाही ते नियमित वेऴेवर दयावे व जिल्ह्यातील दिंव्यागांची दखल घ्यावी अशी मागणी अकोला जिल्हा मधील दिव्यांग बांधव करित आहेत

*4 ऑक्टोबर रोजी राज्यातील हजारो दिव्यांग करणार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर आंदोलन...*(छञपती संभाजीनगर)बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालय वर आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी प्रहार प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दिव्यांगांचे आंदोलन झाले होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तब्बल पाच तास धो धो पावसामध्ये सुरू होते. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना पुढाकार घेऊन दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान वाढवून देण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आमदार बच्चू कडू यांना व दिव्यांगांना भर पावसात जाहीर आश्वासन दिले होते की सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांगांचे मासिक मानधन वाढविण्यात येईल. इतर मागण्या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील. याच वेळी बच्चुभाऊंनी मंत्री अब्दुल सत्तार यांना इशारा दिला होता की आम्हाला खोटे आश्वासन दिल्यावर तुमच्या घरावर आंदोलन करू. परंतु झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात दिव्यांगांचे मानधन एक रुपयाने देखील वाढविण्यात आले नाही. त्यासोबतच दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक देखील बोलविण्यात आली नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरडे आश्वासन दिल्यामुळे राज्यातील लाखो दिव्यांग नाराज झाले असून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 4 ऑक्टोबर रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील घरावर हजारो दिव्यांग आंदोलन करणार असल्याचे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी जाहीर केले आहे..दिव्यांगांच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यासाठी राज्यातील हजारो दिव्यांगांनी सिल्लोड येथे निषेध आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.या आंदोलनाला स्वतः बच्चुभाऊ उपस्थित राहणार आहेत..

*दिव्यांगांना राजकिय आरक्षण नाकारणारे राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिव्यांगांन कडुन जाहीर निषेध* नाशिक (ललित पवार)* दिव्यांगांच्या आरक्षणावर प्रश्न विचारला असता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांगांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यातील दिव्यांगांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे, महत्वाच्या जबाबदार पदावर असलेल्या अशा व्यक्तींचा प्रहार दिव्यांग संघटना जाहीर निषेध करत आहे, आज अजित पवार हे नाशिक येथे येणार असुन सर्व दिव्यांग त्यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध केला**या वलेश संघटनेचे* *जिल्हाध्यक्ष.ललित पवार,* *कार्याध्यक्ष बबलु मिर्झा,**सरचिटणीस,, शहराध्यक्ष कैलास चव्हाण,महीला आघाडीच्या संध्या जाधव, ज्योत्सना सोनार , ललिता पवार,रुपेश परदेशी, सुभाष निकाळजे , बापु जाधव, लक्ष्मण पवार, दत्ता कांगणे , तबासु शेख, जब्बार शेख, सागर जाधव, आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते*

गारडगांव येथील बौध्द़ विहार साठी 1 कोटी निधी सहडॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत दलीत बांधवाच्या वस्तीच्या विकासासाठी रु.5 कोटी मंजूरआमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश खामगांव – खामगांव तालुक्यातील प्रसिध्द़ गारडगांव येथील बौध्द़ विहार येथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी विविध विकास कामांसाठी रु. 1 कोटी सह मतदार संघातील विविध दलीत वस्तीतील विकास कामांसाठी रु.5.00 कोटी निधी आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेले आहे. खामगांव मतदार संघाचा विकास आमदार ॲड आकाशदादा फुंडकर हे सबका साथ सबका विकास या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या धोरणानुसार करीत आहेत. गारडगांव येथील बौध्द़ विहार हे विदर्भात प्रसिध्द़ आहे बौध्द़ अनुयायी या ठिकाणी दसरा, बुध्द़ पौर्णिमा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती या कार्यक्रमानिमीत्य़ मोठया संख्येने भेट देतात. अनेक अनुयायी हे मुक्कामी असतात. त्यांच्या सोयीसाठी भक्त़ निवास व्हावे या ठिकाणी मोठे स्तुप उभे रहावे अशी मागणी अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. त्यासाठी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांनी रु 1.00 कोटी निधी विशेष प्रयत्नातून मंजूर करुन घेतला आहे. या कामाची लवकरच निविदा प्रक्रीया पुर्ण होऊन कामांना सुरुवात करण्याचा प्रयत्ऩ आहे. बौध्द़ धर्मियासाठी अतिशय महत्वाचे हे विकास काम मागील अनेक दशकांपासून प्रलंबीत होते. परंतु आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांनी पुढाकार घेत हे काम मार्गी लावले आहे यामुळे दलीत बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आमदार ॲड आकाश फुंडकर निधी मंजूर केल्याबद्दल आनंद व्यक्त़ केल्या जात आहे. या सोबतच खामगांव मतदार संघातील खामगांव व शेगांव तालुक्यातील दलीत बांधवांसाठी बौध्द़ विहा सौदर्यीकरण, स्मशानभूमी, सभामंडप, रस्ते, नाल्या या कामांसाठी देखील रु.4.00 कोटी मंजूर केले असून दलीत बांधवांसाठी एकुण 5.00 कोटी रु निधी मंजूर केला आहे. दलीत वस्तीतील जवळपास सर्वच् कामे पुर्ण झालेली असून येत्या काळात प्रलंबीत असलेली उर्वरीत कामे देखील पुर्ण केल्या जातील असे आमदार ॲड आकाश फुंडकर यावेळी बोलतांना म्हणाले.

*समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील शासन निर्णयानुसार 5% टक्के दिव्यांग कल्याण निधी वाटप करा.**येत्या सात दिवसात दिव्यांग निधी वाटप करा अन्यथा ठिय्या आंदोलन...**राष्ट्रवादी अपंग सेलचे गटविकास अधिकारी यांना निवेदन...*समुद्रपूर:- समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील शासन निर्णयानुसार 5% टक्के दिव्यांग कल्याण निधी वाटप येत्या सात दिवसात करा अन्यथा ठिय्या आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे गटविकास अधिकारी यांना निवेदन... शासन निर्णया नुसार दिव्यांगाच्या कल्याण व पुनर्वसनाकरीता अनेक फायदे व निर्णय घेत असतात परंतु अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे दिव्यांग समाज त्यांना मिळणाऱ्या सोई सवलती पासून वंचित राहत आहे अशाच प्रकार समुद्रपूर पंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत मध्ये घडताना दिसून येत थाहे ग्रामीण भागातील दिव्यांगाच्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेतत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलने त्यांची दखल घेऊन दिव्यांग कल्याण निधी येत्या सात दिवसात निधिचा वाटप करण्यात यावा अन्यथा पंचायत समिती कार्यालमात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल द्वारे देण्यात आले.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, समुद्रपूर तालुका अध्यक्ष अमोल कंडे, हिंगणघाट शहराध्यक्ष जगदीश देवतळे, चिंधु लोहांडे, हरिदास कोटकर, सुमेध भगत, राजू पोहने, शंकर काकडे, गजानन अंडरस्कर, संगीता चुनारकर, सुनंदा काटकर, व अन्य दिव्यांग बांधव उपस्थित होते

०१०-०१-२०१९ते २०२४ या कालावधित लागलेल्या दिव्यांगाची चौकशी करण्याची मागणी बुलढाणा (गणेश सोनोने) काही वर्षात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून काही लोक सरकारी नौकरीवर रुजू होत आहेत. त्यामुळे खरोखर दिव्यांग असणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे. मागील वर्षांपासून जसे की, तलाठी / कृषीसेवक जलसंपदा/ पोलीस भरती / इत्यादी परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळून आलेला दिसतो . दिव्यांग उमेदवारांना स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी सरकारी नोकरी हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. जसे की इतर खाजगी नोकरी करणे दिव्यांग उमेदवारांना तुलनेने कठीण आहे. त्याचप्रमाणे बोगस खेळाडू प्रमाणपत्र काढून, जे व्यक्ती खेळाडू आहेत त्यांचे आरक्षण काही उमेदवार बळकावत असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. तरी वा विषयाच्या अनुसरुनदिनांक ०१/०१/२०१९ - ३१/०८/२०२४ पर्यंत शासकीय सेवेतते रुजू झालेल्या दिव्यांग व खेळाडू यांची कागदपत्राची फेरतपासणी व आरोग्य तपासणी करण्यात यावी. जेणेकरून या बोगस प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईहोईल, कोणीही दिव्यांग व जे व्यक्ती मूळ खेळाडू आहेत ते व्यांच्या हक्कापासून वंचित राहणार नाही. असे निवेदन शिवसेना विद्यार्थीसेना तालुका प्रमुखओमराजे गायकवाड व अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल इवरकर यांनी मा. जिल्हाधिकारी किरण पाटील यांना दिले.१० ऑक्टोंबर २०२४ वार गुरुवार या दिवसापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करण्यात बाच्या अन्यया तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

माजी कामगार मंञी तथा आमदार डॉ श्री संजय कुटे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांना मोफत किचन सेट वाटप .... जळगाव जा.(विनायक भगत) ऊद्या दि 28/9/2024 रोजी बायोमॅट्रीक नोंदणी करित पाञ ठरलेल्या बांधकाम कामगरांना घरगुती ऊपयोगी भांड्यांची किटचे वाटप जळगाव जामोद विधानसभेचे आमदार तथा राज्याचे माजी कामगार मंञी संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे ज्या कामगार बंधू भगिनींचे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे त्यांनीच खालील ठिकाणी उपस्थित राहावे.ज्यांचे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन बाकी असेल त्यांच्या साठी 30 तारखेनंतर बायोमेट्रिक होताच त्याच ठिकाणी किचन सेट किट चे वाटप होणार आहे तरी कृपया ज्यांचे बायोमेट्रिक बाकी आहे त्यांनी येण्याचे टाळावे ही नम्र विनंती.सर्व पात्र लाभार्थ्यांना किट वाटपासाठी आम्ही कटीबद्ध असून सर्व पात्र कामगार बंधू -भगिनींना किटचें वाटप करण्यात येणार आहे. सुपो जिनिंग जळगांव जामोद येथे सकाळी 9 वाजता ज्या कामगार बांधवांचे बायोमॅट्रिक झाले असतील त्याच कामगार बांधवांनी किचन सेट साठी उपस्थित राहावे ऊर्वरित पात्र कामगार बांधवाना ३०/९/२०२४ च्या पुढे नियमित बायो मॅट्रिक सुरू राहील आणि किट वाटप सुद्धा हातोहात होणार आहे त्यामुळे उर्वरित कामगार बांधवानी उद्या विनाकारण गर्दी करण्याचे काही कारण नाही सर्वाना किट मिळणार असल्याचे कळविले आहे.

श्री नवदुर्गा उत्सव मंडळ बारादरी येथील कार्यकारणी ची बैठक आज श्री राहुल जाधव,गोलू आळशी व पवन गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ सदस्य: पवन चिंचोलकर, अक्षय नागेश्वर अनमोल पोपली, यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली अध्यक्ष- विशाल सुरंगे (मामा ) उपाध्यक्ष- अनंता अंजोडे सचिव- चेतन नागेश्वर कोषाध्यक्ष - हर्षल जाधव,सहकोषाध्यक्ष - यश शर्मा ( छोटू) आखाडा प्रमुख - चेतन देवगिरीकर. (सदस्य)- कौशल नागेश्वर,आकाश नागेश्वर, हर्षित खत्री, अमन सलुजा , लखन बुंदले, अक्षय मस्के,गोपाल देवगिरीकर, प्रवीण शेलार, शेखर थोरात,रोहन जाधव, गोविंदा शर्मा, शिवाजी सुरंगे, प्रशांत सुरोशे, गोलू बारस्कर, सुरज साबळे, अर्जुन चोपडे, सुरज जाधव, चिंतामणी जाधव, हर्ष शर्मा, आशिष गुप्ता, अंकित प्रधानकर, कृष्णा गुप्ता, गणेश शर्मा, लकी शर्मा, अखिल सुराणा, शिवम अग्रवाल, आदित्य राजपूत, आदेश सुराणा, बंटी पिंपळे, तरुण अग्रवाल, अल्विन इर्शीद , सर्वेश शर्मा, अंशुल बजाज, सुनील शर्मा, राज जाधव, सोनू ढाले, आशिष मार्कंड, ईशान शहा, ईशान पटेल, उमेश बँड, अभिजीत सुरडकर, आदित्य आंधळे, रोशन बल्लावी, वैभव बोरकर, कौशल ढोले, कुणाल जगदाळे, नकुल शर्मा, सूरज वाघ गुलाब वानखडे, यश झांबड, पवनदीपसिंग पोपली,अक्षय परदेशी, प्रतीक जोशी, वैभव बोरकर, तेजस मूलिक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते

*शासनाच्या विविध विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गुलाब खरात यांनी घेतला पंचायत समिती खामगाव येथील कामांचा आढावा*जिल्हा परिषद बुलढाणा येथे नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद स्तरावरील विविध खाते प्रमुखांच्या उपस्थितीत दिनांक 25.09.2024 रोजी शासनाच्या विविध विकास कामांच्या प्रगती बाबत पंचायत समिती खामगाव येथील विविध विभागांचे खाते प्रमुख तसेच ग्राम पंचायत अधिकारी व इतर क्षेत्रिय अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा सभा स्थानिक महात्मा गांधी सभागृहात घेण्यात आली.सभेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर सर्वात जास्त अर्ज संकलन केलेल्या पंचायत समिती खामगाव चे त्यांनी अभिनंदन केले. सदर योजनेअंतर्गत अर्जांची ऑनलाईन तपासणीची युद्धपातळीवर कार्यवाही करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका , अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कर वसुली मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.विविध आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा त्वरित लाभ मिळावा यासाठी स्वामालकीची जागा नसलेल्या लाभार्थींची अतिक्रमणे नियमानुकुल करणे, पं.दिनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रा.पं. कडे अखर्चित असलेला निधी तातडीने खर्च करून निवडणूक आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. सातत्याने उपयोगात येत असलेल्या पॉलिथिन व प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे व त्यामुळे पर्यावरणास धोका संभवत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने आठवड्यातून एक दिवस उपयोगात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे संकलन करून सदर प्लास्टिकचा कचरा शासनाच्या घाटपुरी येथील प्लास्टिक पुनर्वापर केंद्रावर त्यावरील प्रक्रियेसाठी पाठवण्याचे निर्देशित केले. वैयक्तिक शौचालयाची बांधकामे व त्यांचा वापर, कचरा सांडपाणी व्यवस्थापन, पेयजल योजनांसाठी जागा उपलब्धता तसेच ग्रामपंचायतीस संबंधित अधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहण्यासाठी व गावातील नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी कर्तव्यात दक्ष राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. खामगाव येथील आढावा सभेपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायती वरणा येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व जिल्हा परिषद शाळेतील शौचालयाचे भूमिपूजन केले. आढावा सभा कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात यांचे सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी.एम.मोहन, प्रकल्प संचालक श्री. राजेश इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री.आशिष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)श्री.संजय इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) श्री भारसाकळे आधी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समारोप प्रसंगी गटविकास अधिकारी श्री.चंदनसिंग राजपूत यांनी सर्वांचे आभार मानले.चौकटीतप्रधान मंत्री, रमाई शबरी आवस योजनेच्या प्रतीक्षा यादीतील भूमिहीन लाभार्थीना जागा उपलब्ध करून देण्यासाठी ल्यांडबँक तयार करण्यासाठी गावाजवळील शेती बाजार भावाने विकण्यास तयार असणाऱ्या शेतकऱ्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी यांनी संकलित करावी,उपविभागीय अधिकारी यांचे कडे अतिक्रमित(गायारान जमीन सोडून)जागेत राहत असलेल्या चें नियमनुकुल करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे

*दिव्यांगांच्या आक्रोश मोर्चाने आमदार निवास हादरले...**आमदार बच्चु भाऊ कडु च्या नेतृत्वाखाली हजारो दिव्यांगांची मंत्रालयावर धडक*मुंबई..दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बच्चु भाऊ कडु यांच्या सह राज्यातील हजारो दिव्यांग मंत्रालय समोर सकाळी जमा होऊन मंत्रालय परीसर धनानुण सोडला पोलीस प्रशासनाची वाद झाल्यानंतर दिव्यांगांनी थेट आमदार निवास गाठले आमदार निवासाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली आमदार निवासाचे द्वार बंद केले संभाजी नगर येथे झालेल्या विराट दिव्यांग आक्रोस मोर्चात दिव्यांगांच्या विविध समस्या सोडविण्य्याच्या आश्वासन राज्य सरकारने दिले होते.परंतु दिड महीन्याचा कालावधी उलटून नहीं मागण्या मान्य होत नसल्याने दिव्यांगांनी मुंबई यावे लागले असल्याचे नामदार बचचु कडु यांनी सांगितले.दिव्यांगांना दरमहा सहा हजार व घरकुल योजनेची अडीच लाखांपर्यंत करावी.दिव्यांगाना रोजगार उपलब्ध करून द्यावा.पाच टक्के राखीव दिव्यांग निधी दर वर्षी खर्च करण्यात यावा.आदी मागण्या मान्य करण्यात याव्या सकाळी दहा पासुन ते संध्याकाळी सहा वाजे पर्यंत दिंव्यांगांनी ठिय्या मांडला होता संध्याकाळी उशिरा अल्पसंख्याक मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी आमदार बच्चु कडु व दिव्यांगांची भेट घेऊन दिव्यांगाच्या सर्व मागण्या संदर्भात येत्या तिन दिवसांत केबीनेट मिटीग बोलवण्यात येऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल...या वलेश रामदास खोत, मोहीन आली धर्मेंद्र सातव ,ललित पवार, संध्या जाधव, सुरेश मोकळं, बबलु मिर्झा, रुपेश परदेशी ,बापु जाधव, चंद्रभान गांगुर्डे , सुरेखा ढवळे, लक्ष्मी देशमुख, ज्योसना सोनार, कैलास चव्हाण, शिवाजी गाडे, नितिन गव्हाणे, अरुण पाचोरे, न्यानेश्वर मुकुंद, अरुण जाधव, जेकब पिल्ले, विलास कानकट, राज्यातील दिव्यांग पदाधिकारी व शेकडो दिव्यांग बांधव हजर होते

आज पर्यटन दिवस 'पर्यटन आणि शांतता' या थीमसह जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जात आहे, जाणून घ्या या दिवसाशी संबंधित खास गोष्ट म्हणजे पर्यटन हे एक माध्यम आहे जे लोकांना जगाच्या कानाकोपऱ्यातील वैशिष्ट्यांची ओळख करून देते. जगभरातील पर्यटन आणि प्रवासाला चालना देण्यासाठी आज २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात आहे. wona Tourism Day 2024: याला पर्यटन म्हणा किंवा प्रवासाला जीवनात एक वेगळे स्थान आहे, त्यातून आपण सर्व चिंता विसरून निसर्गाच्या कुशीत डुंबतो. पर्यटन हे एक माध्यम आहे जे लोकांना जगाच्या कानाकोपऱ्यातील वैशिष्ट्यांची ओळख करून देते. जगभरातील पर्यटन आणि प्रवासाला चालना देण्यासाठी आज २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात आहे. पर्यटन, जे सहसा आर्थिक विकासात योगदान देते, ते शांततेला चालना देण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते एवढेच नव्हे तर पर्यटन हे केवळ एका भागापुरते मर्यादित नसून जागतिक स्तरावर त्याचे वेगळे स्थान आहे. या दिवसाचा इतिहास जाणून घेऊया.. 1980 पासून आतापर्यंतचा पर्यटनाचा प्रवास जगामध्ये पर्यटन दिनाची सुरुवात किंवा प्रवास याबद्दल बोलायचे झाले तर 1980 पासून दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. ही तारीख विशेषतः संयुक्त राष्ट्र पर्यटन कायदा स्वीकारल्याच्या वर्धापन दिनानिमित्त निवडण्यात आली होती. याआधी, होम फोटो नवराष्ट्राविषयी बोलायचे झाल्यास, हे कायदे जागतिक पर्यटनात मैलाचा दगड मानले जातात. हा दिवस उत्तर गोलार्धात उच्च हंगामाचा शेवट आणि दक्षिण गोलार्धात उच्च हंगामाची सुरूवात देखील दर्शवितो. ऑक्टोबर 1997 मध्ये, UN WTO जनरल असेंब्लीने जागतिक पर्यटन दिनाच्या उत्सवात संयुक्त राष्ट्रांचे भागीदार म्हणून काम करण्यासाठी दरवर्षी एका यजमान देशाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दरवर्षी एक देश यजमान म्हणून निवडला जातो. यावर्षी, जॉर्जियाला 2024 साठी यजमान देश म्हणून ठेवण्यात आले आहे. हे देखील ईथे लक्षात घ्या कि आपण आपल्या शेजारी पाजारी कोण आहेत याची माहिती ठेवतो त्याच प्रमाणे आपण ज्या भागात राहतो त्याची ईंतीभुत माहिती आपणाकडे असणे गरजेचे आहे जेणे करुन आपल्या पिढीला त्याचे ज्ञान होईल नाही तर राज्यात वैष्णवांची काशी म्हणुन पंढरपुर जग भरात लौकिक असतांना आपण ते पाहत नाही आणि जातो पर राज्यात म्हणुनच आधी आपला परिसर ज्यातील धार्मिकस्थळे वनराई,जलाशय,ईतीहासीक स्थळे पहा आनंद लुटा मग बाहेरचे पाऊल ऊचला आपली संक्रुती आपलाच परिसर आहे हे लक्षात ठेवा भ्रमणतीच्या म्हणजे travel tourism च्या सर्वांना शुभेच्छा... मनोज नगरनाईक खामगाव✒️7770010084 travel tourism

हिवरखेड येथे ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे हरिकीर्तन संपन्न मनोज भगततेल्हारा ग्रामिणस्वर्गीय श्री गजाननराव रामचंद्र तराळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त हिवरखेड येथील विघ्नहर्ता मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात ह भ प श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा हरी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गायनाचार्य ह भ प नागेश महाराज आगलावे , ह भ प सागर महाराज राऊत , तर मृदुंगाचार्य ह भ प भगवान महाराज ठाकरे यांनी साथ दिली. श्री. संतोष गजाननराव तराळे , श्री . रामप्रभू गजाननराव तराळे , श्री उद्धव गजाननराव तराळे , डॉक्टर श्री. गणेश गजाननराव तराळे व समस्त तराळे परिवार एदलापूर यांनी सदरहू कार्यक्रम आयोजित केला होता त्यात हजारोच्या संखेत उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर प्रीतीभोज ने कार्यक्रमाची सांगता झाली.

शिवसेना ठाकरे ऊपशहर प्रमुखपदी पल्लवी पाटिलखामगाव = बुलढाणा येथे शिवसेनेचा महिला संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्याला शिवसेनेच्या नेत्या रंजनाताई नेवाळकर शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख महिला चंदाताई बढे या ऊपस्थित होत्या या कार्यक्रमादरम्यान शहर प्रमुख श्रुतीताई पतंगे यांच्या सुचनेवरुन खामगाव शहराच्या शिवाजीनगर परिसरातील पल्लवीताई पाटिल यांना शिवसेना महिला आधाडीच्या खामगाव ऊपशहरप्रमुखपदी नियुक्ती चंदाताई बढे यांच्याहस्ते करण्यात आली यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातुन ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचवित पक्षाची पाळेमुळे घट्ट करणार असे पल्लवी पाटील यांनी आपले विचार मांडले तर यावेळी बबिताताई हट्टेल,गंग्बाई भट्टड सपनाताई आदी यावेळी ऊपस्थित होत्या

*श्री सुर्याजी मालुसरे जगदंबा उत्सव मंडळची कार्यकारणी गठीत खमगाव -स्थानिक शिवाजीनगर, नवा फैल भागातील श्री सूर्याजी मालुसरे जगदंबा उत्सव मंडळाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये*अध्यक्ष :- सोमेश शिंदे**उपाध्यक्ष :- रणजित भोसले**कोषाध्यक्ष :- अनिकेत पवार* *उपकोषाध्यक्ष :- संकेत वखरे**सचिव :- गौरव रासकर* *सहसचिव :- शुभम चौधरी**इलेक्ट्रिशियन :- गोलू गुंजाळ* *सल्लगार :- रोहित शिरसाट, पियुश शेजाळ, शिव महाडिक, प्रथमेश चौधरी, शिवम शिंदे, निखिल अतकरे, विनोद चोथवे, पंकज सपकाळ, गौरव आवटे,आनंद पवार तर मार्गदरक्षक म्हणुन प्रवीण कदम, संजय शिंदे, रवी शिंदे, अविनाश घोडके हे होते.तर *सदस्य*तानाजी सुरोशे, कपिल घोडकेनितीन शिंदे , देविदास मुळीक, विनोद शिंदे, विशाल मोरे, अविनाश जानभरे, प्रफुल पवार, अमोल सरोदे ,स्वप्निल बोचरे, बाळू कोडलिंगे, आकाश खरपाडे, , सचिन जोगदंड, अभिषेक चव्हाण,कमलेश तनपुरे, राज जगताप, अनिकेत पवार, शुभम वाघ, ,भावेश पवार, विजय खंडागळे, गौरव आवटे, शुभम चौधरी, दूशांत पवार, अनिकेत शेळके, शिवम शिंदे, महादेव खरपाडे, गौरव सारसकर, राजेश पन्हाळकर, शुभम झिटे, वैभव पवार, गणेश पवार, रवी चव्हाण, प्रफुल अतकरे, प्रशांत गावंडे, सुहास वखरे गोलू कदम, प्रथमेश चौधरी, अमोल पवार, गौरव चव्हाण, पवन घोगरे, आदित्य मोरे, गोविंद पवार, दादू अवताडे, , पियुष लबडे, संदीप मुळीक, आदर्श मोरे, विक्रांत माने, आनंद आवटे, ओम जोगदंड, आकाश हातमोडे, सुजल अतकरे, अक्षय शिरसाठ , ओम शिंदे, ,यश शिंदे, पंकज सपकाळ, समर्थ शिंदे, दिनेश लबडे, शुभम चोथवे, योगेश बिंगले, साहिल मोरे, निलेश बिंगले, अभिषेक बागडे, वैभव अवलकार, गोलू वडतकर, स्वप्निल वाघ, राम पवार, अनिकेत लबडे, मॉन्टी मुळीक, श्याम शेजाळ, विनोद महाडिक, आदींची निवड करण्यात आली.

*अखेर शेती साहित्य चोरी प्रकरणातील ट्रॅक्टर जप्त* खामगांव - घाटपुरी शिवारातील शेतीतील साहित्य चोरी प्रकरणी शिवाजी नगर पोलीसांनी काल 24 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर जप्त केले आहे. घाटपुरी शिवारात पत्रकार गणेश रामेश्वर भेरडे (रा. गोपाळनगर) यांचे शेत आहे. या शेतामधून 22 मे 2024 रोजी अज्ञात चोरटयाने ट्रॅक्टर मधून शेतातील पाईप (किंमत 3250 रु.) लंपास केले होते. याप्रकरणी गणेश भेरडे यांनी 23 मे रोजी शिवाजी नगर पो. स्टे. ला तक्रार दिली होती. परंतु गुन्हा दाखल न करता प्रकरण थंड बस्त्यात टाकण्यात आले होते. याबाबत गणेश भेरडे यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्यामुळे अखेर 9 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपी मोहन उर्फ बाळू श्यामराव भोवरे (रा. गोपाळनगर) याला 16 ऑगस्ट रोजी अटक करुन समजपत्र देऊन सोडण्यात आले परंतु आरोपीने गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे गणेश भेरडे यांना परत पाठपुरावा करावा लागला. अखेर शिवाजी नगर पोलीसांनी 24 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.19 पी 3947 जप्त केले असून नंबर प्लेट मध्ये खोडतोड केल्याचे दिसून येत आहे. तर हे ट्रॅक्टर जळगांव खांदेश जिल्ह्यातील असून गौण खनिज चोरी प्रकरणात सुध्दा या ट्रॅक्टरचा वापर करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणाची तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक थोरात साहेब, एसडीपीओ विनोद ठाकरे, ठाणेदार पितांबर जाधव, पोहेकाँ देवेंद्र शेळके यांचे सहकार्य लाभल्याने गणेश भेरडे यांनी आभार व्यक्त केले आहे.

🚩जय महाराष्ट्र 🚩 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगांव तालुका शहर याचे वतीने खामगांव तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे मदत व शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करून पीक विमा 2023 ची रक्कम विना अट सर्वाना मिळावी यासाठी शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्या साठी विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी खामगांव यांना देण्याकरिता गुरवार दि 26..9..2024 रोजी वेळ 12.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे सर्व शिवसैनिक व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी यांनी वेळेवर हजर राहावे ही विनंती आपल्या मागण्या पुढील प्रमाणे.. 1 ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत द्यावी व 2023 ची पिक विमा रक्कम कुठलीही अट न ठेवता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी 2. खामगाव जिल्हा लवकरात लवकर घोषित करण्यात यावा व राष्ट्रीय महामार्ग खामगाव बायपास येथील रस्त्यात गेलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला लवकरात लवकर मिळावा 3. शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन व स्पीकलऱ वरील तीन वर्षापासून राखलेली सबसिडीची रक्कम ताबडतोब जमा करावी 4. शेतकरी कार्डधारकांना रेशन कार्ड वरील बंद केलेला धान्य माल ताबडतोब सुरू करावा 5. ग्रामीण व शहरी भागातील जनतेला घरकुलाचे रखडलेले चेक ताबडतोब देण्यात यावे 6 वृद्ध अपंग निराधार विधवा महिला यांच्या पगाराची रखडलेली रक्कम ताबडतोब त्याच्या खात्यात जमा करावी 7. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील तुटलेल्या विद्युत तारा व जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने जोडणी करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात यावा 8. खामगाव तालुका कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी यांची नेमणूक करावी 9. बी बियाणे रासायनिक खते कीटक नाशके वाढलेल्या महागाईमुळे उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे हमी भाव जाहीर करून सोयाबीनला आठ हजार रु कापसाला दहा हजार रु व तुरीला बारा हजार रु हमीभाव द्यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन शेतकरी शेतमजूर व सर्व सामान्य जनतेसाठी शिवसेनेच्या वतीने देण्यात येणार आहे त्याकरिता सर्वांनी वेळेवर हजर राहावे असे श्रीराम खेलदार तालुका प्रमुख शिवसेना संदीप वर्मा शहर प्रमुख शिवसेना यांनी केले आहे

कोल्हापूर जिल्हा व शहर कृती समितीच्या अध्यक्ष पदी श्री. संजयसिंह जाधव यांची निवड ....कोल्हापूर.. जिल्हयातील शहरासह जवळपास २१ दिव्यांग संस्था आणि संघटना एकत्र येवून जिल्हा पातळीवर कोल्हापूर जिल्हा व शहर कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हयातील तळागाळातील दुर्लक्षीत व गरीब दिव्यांगांना शासकीय योजनेची माहिती व लाभ मिळावा या प्रमुख उद्देशाने दिव्यांग कृती समितीची स्थापना करण्यात आली असून प्रशासनाच्या गलथान कारभार आणि दिरंगाईमुळे दिव्यांगाना शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागते अशा दिव्यांगाना लाभ मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हयातील २१ संस्था व संघटनांनी जिल्हा परिषद कोल्हापूर येथील दिव्यांग कक्ष हॉल मध्ये दि. २३/०९/२०२४ रोजी एकत्र येवून चर्चा करुन सर्वानुमते कोल्हापूर जिल्हा व शहर दिव्यांग कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच कृती समितीच्या अध्यक्ष पदी श्री. संजयसिंह जाधव यांची तसेच उपाध्यक्ष पदी श्री. बाळासो गायकवाड यांची तसेच सचिव पदी श्री. संजय पोवार (बापू) आणि खजानीस पदी श्री. सुमिल शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.भविष्यात दिव्यांग बांधवांच्या समस्या कृती समितीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी नुतन पदाधिकारी यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हयातून विविध संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना कृती समितीचे अध्यक्ष संजयसिंह जाधव यांनी असे आवाहन केले की, कोल्हापूर जिल्हा व शहर कृती समिती ही सर्व दिव्यांगाना न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आली असून ज्या दिव्यांगाना शासकीय योजनेची अथवा कांही समस्यांची निराकरण करण्यासाठी आमचेशी संपर्क साधावा तसेच ज्या दिव्यांग संस्था व संघटना कृती समितीमध्ये सामिल होवू इच्छितात त्या सर्व संघटनांचेही स्वागत आहे.

*पॅरा ओलंपिक क्रीडापटूचे सर्वोत्कृष्ट कामगिरी* 26 ऑगस्ट2024 ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत पॅरिसमध्ये पॅरा ओलंपिक स्पर्धा पार पडलेया या स्पर्धेमध्ये अनेक पॅरा खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताचे नाव जागतिक पातळीवर गाजवले आहे. या भारतीय पॅरा खेळाडूंनी भूतो ना भविष्य असे यश मिळवले आहे. पॅरा आर्चरी स्पर्धेमध्ये शितलदेवी देशासाठी व संपूर्ण जगासाठी एक प्रेरणा आहे. नैसर्गिक शक्तीचं उनिव असताना त्यावर मात करत उत्कृष्ट प्रदर्शन करणे हे ब्रीद वाक्य असणारे भारतीय पॅराखेळाडू सतत दुर्लक्षित राहिले आहे हे दुःख ने नमूद करावे लागेल.शारीरिक देवदत्त शक्तीचा उणीव असून सुद्धा त्यावर मात कर देशाला अनेक प्यरा खेळाडूंनी मेडल प्राप्त करून दिले. या सर्वांना माझा सॅल्यूट आहे माझ्या मते 1997 ते 2007 पर्यंत विदर्भात सुद्धा भरपूर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, पॅरा खेळाडू झालेले आहेत. त्यांना सुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भाचे नावलौकिक केलेले आहे. विदर्भाचे भीष्म पितामह अर्जुन पुरस्कार विजेते द्रोणाचार्य पुरस्कार विजेते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आदरणीय विजय मुनेश्वर सर यांचा फार मोठा वाटा आहे. अमरावती सुद्धा या काळात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर प्यरा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली यामध्ये विलास शिंदे, कांचनमाला पांडे सचिन काळे असे अनेक आंतरराष्ट्रीय पॅरा खेळाडू होते. आज अमरावती जिल्हा मध्ये पॅराखेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अमरावती जिल्हा मागे पडत आहे. भारतीय पॅरा खेळाडूंची पॅरिस ओलंपिक मध्ये शानदार कामगिरी केलेली आहे एकूण 29 पथकांची कमाई केलेली आहे . भारतीय खेळाडू सतत सर्वोच्च कामगिरी करत आहे. सर्व खेळाडूंना मानाचा मुजरा. *संत तुकोबाराया म्हटले "जे का रांजले गांजले तोच आपुले तो ची साधू ओळखावा देव तिथे जाणवा"* सर्व पॅरा खेळाडू हे देशासाठी देवदूत ठरले आहे . ( विलास शिंदे .मा आंतरराष्ट्रीय पॅरा खेळाडू अति. कार्यकारी अभियंता महावितरण शहर विभाग अमरावती.) तर खामगाव येथे अमरावती विभागिय पॅरा आॅलंपिक स्पर्धेचे आयोजन डिसेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपासुन करण्यात येणार असल्याची माहिती विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन या दिव्यांग संस्थेच्यावतिने मधुकर पाटिल यांनी दिली आहे

जळगाव येथे दिव्यांगांचे निवेदन मुबईं आंन्दोलनासाठी जळगाव जामोद (विनायक भगत)प्रहार अपंग संस्था जळगाव संग्रामपुर येथिल दिव्यांगांनी मुबई येथे जाणे शक्य नसल्याने नारायण महाले प्रहार तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जळगाव जामोद मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब मुंबई यांनाअपंगांच्या विविध मागण्या मा.प्रहार संघटनेचे नेते बच्चुभाऊ कडू यांनी आज मुंबई येथे गांधी पुतळ्यासमोर अपंगांच्या विविध मागण्यासाठी हजारोंच्या संख्येने एल्गार मोर्चा काढलेला आहे एल्गार मोर्चामध्ये अपंगाच्या विविध मागण्या केलेल्या आहे आज महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार सुदृढ व्यक्तीना विविध योजना पारित करते आणि अपंग बांधवांना ज्यांना हात पाय नाही डोळे नाही जे चालू शकत नाही त्यांच्या उदरनिर्वाह दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे अशा अपंगा बांधवांना केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार हिनवत आहे अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी अपंगांच्या विविध योजना राबविल्या पाहिजे पण तसे आढळत नाही त्यामुळे माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे अपंगाचा बुलंद आवाजचा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला वेठीस धरण्यासाठी खालील मागण्या घेऊन सरकारच्या दरबारी मांडत आहे. १) दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे २) दिव्यांगाना घरकुल मिळालेच पाहिजे ३) दिव्यांगांची कर्जमाफी झालीच पाहिजे ४) दिव्यांगाने व्यवसायासाठी कर्ज व जागा उपलब्ध करून दिले पाहिजे ५) दिव्यांगांना अंतोदय कार्ड मिळालेच पाहिजे ६) दिव्यांकांचा नोकरीतील कोठा वाढवला पाहिजे ७) दिव्यांगांची वर्गवारी न करता सरसकट अंतोदय कार्ड देण्यात यावे ८) लाडका भाऊ योजनेमध्ये दिव्यांग बांधवांना समाविष्ट करून घेण्यात यावे ९) अपंगांचा कायदा कोणता 2016 ची अंमलबजावणी झालीच पाहिजे विविध मागण्यासह होत असलेल्या मोर्चाला जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटनाच्या वतीने जाहीर पाठिंबानिवेदनाच्याप्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा मा. समाज कल्याण अधिकारी साहेब समाज कल्याण विभाग बुलढाणा बुलढाणा मा. उपविभागीय अधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद यांना पाठविण्यात आल्या आहेत यावेळी प्रहार तालुकाध्यक्ष नारायण महाले प्रहार तालुका सचिव:-सरदार अवासे प्रकाश प्रकाश जवंजाळ संतोष काशिनाथ राऊत नारायण तुकाराम खंडारे देवकन्या गिरधर सोळंकी हिरामण श्रीराम सुरडकर तेजराव पाटील साक्षी गोपाल मंगेश देशमुख आदी यावेळी हजर होते

पाकिस्तान जिंदाबाद नारे देणाऱ्या गुन्हा दाखल झालेल्या देशद्रोह्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे-विहिंप बजरंग दल नांदुरानांदुरा- तालुक्यातील वडणेर भोलजी येथे काही देशविघातक प्रवृत्तीनी देशविरोधी घोषणा दिल्याचे निदर्शनात आले त्यात त्यांनी "पाकिस्तान जिंदाबाद च्या" घोषणा दिल्या आहेत.म्हणून नांदुरा येथे बजरंग दल जिल्हा संयोजक सुशील कोल्हे यांनी दखल घेत पोलीस स्टेशन नांदुरा यांना विश्व हिंदु परिषद.बजरंग दल कडून तक्रार देत या देश विरोधी लोकांवर कडक कारवाई करत भारतात राहून भारताच्या सुख सुविधा उपभोगून जर पाकिस्तान बद्दल आपुलकी वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानला जावे, देश विघातक घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली त्यानुसार सदर घटनेतील ४ च व्यक्तीवर पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्यांनासुद्धा अद्याप अटक करण्यात आली नाही करीता आज विहिंप विदर्भ प्रांत सहमंत्री ऍड अमोलजी अंधारे यांनी नांदुरा येथे पत्रकार परिषद घेत पोलिस प्रशासनास ८ दिवसात ह्या घटनेतील सर्व आरोपीना शोधून प्रसारित व्हिडीओ ची तपासणी करून नारे देणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करत ताबडतोब अटक करण्याची मागणी केली असून अटक न झाल्यास १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका केंद्रावर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.या पत्रकार परिषदेत बजरंग दल विभाग संयोजक गजानन धोरण, विभाग मंत्री उद्धव सातव,जिल्हा संयोजक सुशील कोल्हे विहिंप बजरंग दल नांदुरा प्रखंडाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

*लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशनचा उपक्रम..**स्व.श्री.श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृती जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ जाहीर..*खामगांव : सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चारिटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकराव्या जिल्हास्तरीय स्व. श्र.स. बावस्कर गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ग्रामीण, शहरी, अंध, अपंग व कर्णबधीर, सेवानिवृत्त, वरिष्ठ महाविद्यालय या गटामध्ये प्रस्ताव मागविण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षक वृंदांनी प्रतिसाद देत सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी व्दारे प्रस्ताव पाठविले होते. ह्या प्राप्त प्रस्तावांचे मुल्यमापन करुन खालील प्रमाणे पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नांवे गटनिहाय जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्काराचे वितरण बुधवार दि. ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पीटल, नांदुरा रोड, खामगांव येथे प्रदान करण्यात येणार आहेत.यावेळी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक ग्रामीण विभागातून श्री. गणेश नामदेव सातव, सहा. अध्यापक (जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा. काजेगांव, ता. जळगांव जा.), प्राथमिक शहरी विभागातून सौ. संगिता जितेंद्रसिह चव्हाण, सहा. अध्यापक (श्री. पाई हायस्कूल, जलंब, ता. शेगांव), माध्यमिक शहरी विभागातून श्री. शरद दिगंबर देशपांडे, सहा. अध्यापक (श्री लिलाधर भोजराज चांडक विद्यालय मलकापूर), माध्यमिक ग्रामीण विभागातून श्री. काशिराम सखाराम बोरे, सहा. शिक्षक (श्री संभाजी राजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरखंडाळा, ता. बुलडाणा), अंध, अपंग, कर्णबधीर व आदिवासी विभागातून श्री. दिपक मुरलीधर उमाळे, सहा. अध्यापक (जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चारबन, ता. जळगांव जा.), सेवानृिवत्त विभागातून सेवानिवृत्तीनंतरही सदैव कार्य करणारे श्री. रामेश्वर रामचंद्र कापडे, सेवानिवृत्त उच्च श्रेणी शिक्षक (जि.प. मराठी उद्य प्राथमिक शाळा भंडारी, ता. खामगांव), तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक विभागातून प्रा. हरिदास प्रतापसिंग सोळंके, वरीष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक (श्री.ग.भी. मुरारका कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, शेगांव) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना रु. ५००१ रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.पुरस्कार वितरणाचा सोहळा बुधवार दि. ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १.०० वा. लॉयन्स आय हॉस्पीटल सभागृह, जीएसटी ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे मान्यवर व लॉयन्स पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकवृंदांना वैयक्तिकरित्या तसे कळविण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमास आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांनी सपत्नीक उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांव्दारे लॉयन्स क्लब खामगांचे अध्यक्ष लॉ. शंकर परदेशी, सचिव लॉ. डॉ. धंनजय तळवणकर, कोषाध्यक्ष लॉ. राहुल भट्टड व धंन्वतरी चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष माजी प्रांतपाल लॉ. डॉ. अशोक बावस्कर यांनी केले आहे असे लॉयन्स क्लब खामगांवचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे कळवले आहे.

हरे हरे नवरात्र उत्सव मंडळाची कार्यकारिणी अध्यक्षपदी अमर देशमुख तर सचिवपदी योगेश जाधवखामगाव ÷ दरवर्षी प्रमाणे यंदा ही हरे हरे नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहा ने साजरा करण्याचे ठरविले आहे, तसेच दि. ०८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी झालेल्या नियोजन बैठकीत मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सदस्यांच्या एकमताने मंडळाची २०२४ ची उत्सव कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. मंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे.अध्यक्ष :- अमर देशमुखउपाध्यक्षः पियुष काळोणेसचिव : योगेश जाधवसहसचिव : चैतन्य जाधवकोषाध्यक्ष : निलेश जाधवसहकोषाध्यक्ष : कृष्णा देशमुखकार्याध्यक्ष :- विक्कीभाऊ चौधरीसंयोजक :- पप्पूभाऊ तोडकरसल्लागारः- राजेश जाधव, मंगेश जाधव, किशोर बोरे, शिवाजी गायकवाड, गजानन नेमाने, अमोल राणा चिकाने, निर्मल जाधव, बबलू चौधरी, सोनू अग्रवाल, मुरली शेलकर, वासुदेव सोनोने, सनी चौधरी.विधी सल्लागार ऍड. नितीन सांगळे, ऍड. देवेंद्र टिकार, ऍड. राहुल पवारमंडळप्रमुख :- पांडुभाऊ मिसाळ, बंटीभाऊ चौधरी, श्याम गायकवाडसदस्य :-सुनील देशमुख, अनिकेत देशमुख, पंकज व्यास, शक्ती ओझा, सुशील ओझा, राहुल चौधरी, रितेश निमकर्डे, राम ठाकरे, भावेश पिवळटकर, सोनू कुळकर्णी, कपिल पुरोहित, कौशल बिस्सा, प्रणव बाहेकर, निलेश उंबरकर, अमोल जोशी, वैभव सोनोने, शैलेश जाधव, प्रसन्न घोडेराव, रवी थानवी, धनंजय कुळकर्णी, गणेश गायकवाड, शैलेश जाधव, अविनाश पवार, सागर बाजड, गिरीश शेवाळे, अमोल तेलंगडे, मयूर एकडे, गजानन शेलकर, मयूर जाधव, लखन चिकाने, गोलू चिकाने, शिवम बावणे, आदेश शेलकर, अजय बावणे, हर्षल चिकाने, प्रशांत सांगेले, जगदीश चिकाने, गोपाल टिकार, यश सोनोने, ऋषी सोनोने, यश जाधव, मंगेश टिकार, योगेश चिकाने, प्रद्युमन शेलकर, राम खरात, यश पिवळटकर, विनोद चोपडे, पंकज जैन, मयूर चिकाने, अजय आप्पा, साकेत दशोत्तर, विनोद जाधव, कैलास नेमाने, निखिल सपकाळ, उदय घोडेराव, लखन बजाज, कृष्णा सिद्धपुरा, अमोल जाधव, सुहास डिवरे, सागर पवार, शक्ती चौधरी, अन्नू टाक, देवा आढाव, जगदीश ठाकरे, भास्कर कडू, राजू देशमुख, संतोष जाधव, राजू मिरगे, शुभम देशमुख, मयूर टाले, अक्षय वारकडं, आशिष सुराणा, भिकमचंद जोशी, शिवाजी जोशी, पवन देशमुख, ललित डाहे, मुकिंद देशमुख, साहेबराव देशमुख, मंगेश येनकर, समीर दलाल, सनी थानवी, तेजस देशमुख, वैभव देशमुख, विशाल, योगेश देशमुख, तुषार देशमुख, अभिषेक पिंपळकर, प्रतीक निमकर्डे, भारत निमकर्डे, सोनू अतकरे, विशाल मात्रे, सागर देशमुख, पवन देशमुख, राहुल भोरे, अश्विन वणारे, सचिन सदावर्ते, सागर सदावर्ते, छोटू कुसुंबे, मंगेश चव्हाण, शुभम फेरंग, राहुल इटे, विशाल मात्रे, व समस्त हरे हरे मित्र मंडळ कार्यकर्ते ऊपस्थित होते

*स्त्री शक्ति कायद्याची* *अंमलबजावणी व्हावी शिवसेना उबाठा महिला संवाद महिला मेळाव्यातून मागणी*- रंजनाताई नेवाळकर *शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केल्याबद्दल ऊर्मिलाताई ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार**बुलढाणा -* *दि. २१ सप्टेंबर २०२४ वेळ सकाळी ११. वाजता जन* *शिक्षण संस्था जांभरून रोड, बुलडाणा येथे आयोजक जिल्हा प्रमुख मा. श्री.जालिंदर भाऊ बुधवंत प्रमुख उपस्थितीत महिला संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी**शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र सचिव समन्वय मा.सौ. रंजनाताई नेवाळकर ह्या अध्यक्ष स्थानी होत्या.ताईंनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्त्री शक्ति कायद्याची अंमलबजावणी व्हावी शिवसेना उबाठा महिला संवाद महिला मेळाव्यातून मागणी केली* *तद्नंतर मा.सौ.शिल्पा* *ताई सरपोतदार, अध्यक्ष शिव सहकार सेना,महाराष्ट्र मा. सौ.प्राची पोतदार कोल्हापूर संपर्क संघटक,* *मा.सौ. सागरताई पुरी,पश्चिम विदर्भ संपर्क संघटक. मा.सौ. वैशालीताई घोरपडे,संपर्क* *संघटिका,शिवसेना महिला* *आघाडी. मा.सौ. सृष्टी* *वाघमारे, संपर्क प्रमुख,* *यवतमाळ यांची प्रमुख* *उपस्थिती होती.* *याप्रंसगी नुकताच मातोश्री मुंबई येथे* *पक्षप्रमुख मा.उदधव साहेब* *ठाकरे व पश्चिम विदर्भ प्रमुख मा.अरविंद सावंत साहेब* *यांचे शुभहस्ते वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे यांनी शिवबंधन बांधून शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला, त्याबद्दल ऊर्मिलाताईचा उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.* *सुरुवातीला मां जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.* *प्रास्ताविक सौ. चंदा ताई बढे व सौ. विजया ताई खडसान शिवसेना महिला जिल्हा प्रमुख यांनी केले.यावेळी सौ.जिजाताई राठोड उपस्थित होत्या.* *उपरोक्त सर्व प्रमुख मान्यवरांनी स्त्री शक्ति कायदा,बचत गट आदि महिला उन्नती साठी च्या योजना संदर्भात अतिशय मौलिक माहिती दिली.* *संचालन सौ.क्षिरसागर ताई व श्री लखन गाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा प्रमुख श्री. जालिंधर भाऊ बुधवंत यांनी केले.* *याप्रसंगी बुलढाणा* *जिल्ह्यातील सह संपर्क* *प्रमुख,तालुका प्रमुख, शहर प्रमुख, ग्रामीण प्रमुख....**संपूर्ण जिल्ह्यातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*

खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्साह..... मानाच्या लाकडी गणपती मंडळाच्या विश्वस्त व सदस्यांचा राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केला सत्कार खामगाव :-(संतोष आटोळे) दि.17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन अय्याची कोठी येथील मानाच्या लाकडी गणपतीची जिल्हा पोलीस अध्ािक्षक विश्व पानसरे व मा.आमदार राणा दिलीपकुमार यांच्या हस्ते आरती करुन गणेश विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अध्ािक्षक विश्व पानसरे यांच्यासह मानाच्या लाकडी गणपती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ॲड.आर.बी.अग्रवाल,गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरज बी.अग्रवाल यांच्यासह सदस्यांचा भगवी टोपी व भगवा दुपटट्ा घ्ाालुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष ॲड.धनंजय भेरडे, सचिव चंद्रशेखर पुरोहित, कोषाध्यक्ष संजय झुनझुनवाला,सदस्य डॉ.अनिल चव्हाण,संजय अग्रवाल, ॲड.व्ही.वाय.देशमुख,मा.नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,मा.नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,राणा दिग्वीजयसिंह सानंदा,खामगाव शहर कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांच्यासह गणेश भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

*अनोख्या पद्धतित गणपती विसर्जन**एका क्रिडा मंडळाचा ऊपक्रम*खामगाव ( संतोष आटोळे )गणपती विसर्जनाची लगबग लहान थोरांपासुन संपुर्ण देशात आपआपल्या तर्‍हेने विशेषता डिजे,ढोलताश्याच्या गजरात लेझिम पथकातुन मर्दानी खेळ दाखवित लाईटींगच्या डेकोरेशन व फिरत्याचिञातुन वाजत गाजत सुरु असतांना लोकमान्य टिळकांच्या एकता व अखंडतेला चाप लावण्यासारखा प्रकार खामगाव येथे एका मंडळाने अश्शिल हावभाव दाखविणार्‍या कलाकारांना आणुन महिलांची लज्जेस कुचंबना शरमेने मान खाली करणाच्या प्रकारामुळे संपुर्ण शहरात ते मंडळ गणेशभक्तांच्या रोषाशाला सामोरे जात असल्याचे पहावयास मिळत आहे तर त्यामंडळाविषयी नाराजी पसरली आहेआतापर्यन्त फिल्म मध्ये पाहिलेले चिञ या कलाकारांमधुन होत असल्याने आंबट शौकिनांच्या गजरेत चोली के पिछे आन चलती क्या यावरुन हे हावभाव दिसत असल्याने त्यांचा विरंगुळा होत असल्याचे पहावयास मिळत आहे तर या प्रकारामुळे महिला वर्गाने सरळ घरचा रस्ता विसर्जन मिरवणुक सोडुन धरला आहे

*राज्य दिव्यांग कल्याण व पुनर्वसन विभागला निताताई ढवाणसह लक्ष्मणराव भांबेरे यांची नियुक्ती*खामगाव महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी बारामतीच्या सौ.निताताई ढवाण पाटील यांची तसेच बुलढाण्यातुन लक्ष्मणराव भांबेरे यांच्यासह ईतर यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आणि पुनर्वसन विभाग येथे राज्य सल्लागार मंडळाचे अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आलीदिव्यांग चळवळीसाठी कार्यरत असलेल्या,त्यांना न्याय देण्यासाठी अविरत झटणार्‍या यांच्यांसहईतर सदस्यांची नियुक्ती करण्यात आलीराज्य सल्लागार मंडळातील अशासकीय सदस्यांच्याशासन निर्णय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ६६ च्या उपकलम २ (ई) मधील तरतूदीस अनुसरुन खाली नमूद सदस्यांची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.२. उक्त अधिनियमातील कलम ६६ च्या उपकलम २ (ई) (1) मधील तरतूदीनुसार दिव्यांग तसेच पुनर्वसन या क्षेत्रामधील तज्ञ व्यक्तींमधून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.१. श्रीमती निता देवळालकर, (ठाणे)२. श्रीमती निता धवन, (बारामती, पुणे)3. त्याचप्रमाणे कलम ६६-च्या उपकलम २ (ई) (i) मधील तरतूदीनुसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी नियुक्त करावयाचे अशासकीय सदस्य या गटातून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.१) श्री. जयसिंग कृष्णरावजी चव्हाण, नागपूर२) श्री. हेमंत उर्फ काकासाहेब प्रभाकर दीक्षित, नाशिक३) डॉ. भगवान स. चव्हाण, छत्रपती संभाजीनगर४) श्री. लक्ष्मणराव भांबेरे, बुलढाणा५) श्रीमती संगीता घोरपडे, कोल्हापूर६) श्री. सतीश चौरडिया, धुळे,४. त्याचप्रमाणे कलम ६६-च्या उपकलम २ (ई) (iv) मधील तरतूदीनुसार स्टेट चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचे प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी नियुक्त करावयाचे अशासकीय सदस्य या गटातून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.१) श्री. ललित गांधी२) श्री. रवींद्र मानगावे३) श्री. करणाकर शेट्टी५. उपरोक्त सदस्यांचा कालावधी व कार्ये याबाबतच्या अटी व शर्ती ह्या दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे लागू राहतील.

मोहम्मद फारुक सर ‘पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित · खामगाव :-(संतोष आटोळे) खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक यांचा पहाट फाउंडेशन तर्फे औरंगाबाद येथे पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलापहाट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे दरवर्षी समाजकार्य, पत्रकारिता, शैक्षणिक, युवा उद्योजक, क्रीडा, साहित्य, कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणीजणांना पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. १४ सप्टेंबर रोजी नांदापुरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, पैठण गेट, औरंगाबाद येथे पार पडलेल्या कार्यक्रमात चैत्राम पवार (महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ), डॉ.जीवन राजपूत (जे जे प्लस हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर), मारुती म्हस्के (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय छ.संभाजीनगर) आदी मान्यवर उपस्थित होते यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक यांना कोटा राजस्थान पुणे येथील विविध संघटना तर्फे सुद्धा सन्मानित करण्यात आले याप्रसंगी अंजुमन हायस्कूल खामगाव चे शिक्षक असलम परवेज खान व फजील अरशद खान यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार , माजिद खान अन्वर खान व मोहसीन खान अन्वर खान यांना राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार , अतहर अहमद खान अफसर खान बालापुर यांना महाराष्ट्र राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार , ईश्वर सिंग ठाकूर खामगाव व प्रा आताऊल्ला खान यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार , मोहम्मद इकबाल वडनेर भोलजी यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार , मोहम्मद अन्सार मोहम्मद युसुफ व मोहम्मद अजहर मोहम्मद युसुफ मंगरूळपीर यांना राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

निता पाटिल बारामती तर लक्ष्मरिव भांबेरे बुलढाण्यातुन अशासकिय दिव्यांग समितीवर .खामगाव (संतोष आटोळे).राज्य सल्लागार मंडळातील अशासकीय सदस्यांच्या शासन निर्णय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ६६ च्या उपकलम २ (ई) मधील तरतूदीस अनुसरुन खाली नमूद सदस्यांची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.२. उक्त अधिनियमातील कलम ६६ च्या उपकलम २ (ई) (1) मधील तरतूदीनुसार दिव्यांग तसेच पुनर्वसन या क्षेत्रामधील तज्ञ व्यक्तींमधून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.१. श्रीमती निता देवळालकर, (ठाणे)२. श्रीमती निता धवन, (बारामती, पुणे)3. त्याचप्रमाणे कलम ६६-च्या उपकलम २ (ई) (i) मधील तरतूदीनुसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी नियुक्त करावयाचे अशासकीय सदस्य या गटातून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.१) श्री. जयसिंग कृष्णरावजी चव्हाण, नागपूर२) श्री. हेमंत उर्फ काकासाहेब प्रभाकर दीक्षित, नाशिक३) डॉ. भगवान स. चव्हाण, छत्रपती संभाजीनगर४) श्री. लक्ष्मणराव भांबेरे, बुलढाणा५) श्रीमती संगीता घोरपडे, कोल्हापूर६) श्री. सतीश चौरडिया, धुळे,४. त्याचप्रमाणे कलम ६६-च्या उपकलम २ (ई) (iv) मधील तरतूदीनुसार स्टेट चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचे प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी नियुक्त करावयाचे अशासकीय सदस्य या गटातून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.१) श्री. ललित गांधी२) श्री. रवींद्र मानगावे३) श्री. करणाकर शेट्टी५. उपरोक्त सदस्यांचा कालावधी व कार्ये याबाबतच्या अटी व शर्ती ह्या दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे लागू राहतील.

मिस काल द्या आपले बॅलन्स पहा..............आता आपल्या बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक माहिती मिळवण्यासाठी फक्त एक मिस कॉल करावा लागेल. देशातील प्रमुख बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली आहे. खालीलप्रमाणे काही प्रमुख बँकांचे मिस कॉल नंबर दिले आहेत* *🌾डिजिटल शेतकरी🌾*स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 09223766666HDFC बँक: 18002703333ICICI बँक: 9594612612 किंवा 9215676766अ‍ॅक्सिस बँक: 18004195959पंजाब नॅशनल बँक (PNB): 18001802223बँक ऑफ बडोदा (BoB): 8468001111युनियन बँक ऑफ इंडिया: 09223008586कॅनरा बँक: 9015483483IDBI बँक: 18008431122बँक ऑफ इंडिया (BoI): 09015135135कोटक महिंद्रा बँक: 18002740110यस बँक: 09223920000इंडसइंड बँक: 18002741000सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 9555244442इंडियन बँक: 09289592895UCO बँक: 18002740123फेडरल बँक: 8431900900IDFC फर्स्ट बँक: 18002700720महाराष्ट्र ग्रामीण बँक : 7834888867इंडियन Post Bank (पोस्ट बँक) : 8424054994 / 8424046556 किंवा 7799022509 या नंबर वर फक्त Miss Call द्याBank of Maharashtra : 9222281818*लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही हे तुम्ही फक्त तुमच्या Register नंबर वरुण Miss Call करून चेक करु शकता सर्व नंबर दिलेले आहे.*ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून संबंधित बँकेच्या मिस कॉल नंबरवर कॉल करावा, आणि काही क्षणांतच त्यांना एसएमएसद्वारे त्यांच्या खात्यातील शिल्लक मिळेल.

दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या दृष्टी गणेशा उपक्रमाला प्रभातच्या बालगोपालांनी दिला भरभरून प्रतिसादमनोज भगतअकोला जिल्हा अकोला स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान ,नेत्रदान व अवयव दानाची दृष्टी गणेशा ही चळवळ संपूर्ण विदर्भात गणेश उत्सवाचे आकर्षण बनले आहे. दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रभात किड्स अकोला येथे दृष्टी गणेशा या सामाजिक उपक्रमाचे दिव्यांग बांधवांच्या सुरातून प्रस्तुती करण झाले. प्रभात किड्स चे संचालक डॉ. गजानन नारे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या वाद्य वृंदाला आपल्या विद्यालयात रक्तदान , नेत्रदान व अवयवदानाच्या प्रचार प्रसारासाठी आमंत्रित केले होते . प्रस्तुत कार्यक्रमात गणेश गीते ,बालगीते, संस्कार गीते व देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रमाला प्रभात च्या बालगोपालांनी भरभरून प्रतिसाद दिला . अवनी शेळके ची नृत्य प्रस्तुती, मंजिरी पांडे या बाल गायिकी ची संगीत प्रस्तुती, लक्ष्मी पानबुडे ची देशभक्तीपर गीते, प्रा.गजानन मानकर यांची बाल संस्कार गीते ,रोहित सूर्यवंशी चे शंखनाद प्रस्तुती, कैलास पाणबुडे ची तबला जुगलबंदी व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे विशाल कोरडे यांचे रक्तदान, नेत्रदान ,अवयव दानावर विशेष व्याख्यान व संगीत प्रस्तुती हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले . दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य राबवल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रभात किड्स अकोला चे संचालक डॉ. गजानन नारे यांनी सत्कार केला . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी संपूर्ण भारतभर विशेष व्यासपीठ उपलब्ध असून शाळा महाविद्यालय व विविध सामाजिक संस्थांनी या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आव्हान डॉ. गजानन नारे यांनी केले . ज्या दिव्यांग बांधवांना संस्थेच्या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती सदस्य अस्मिता मिश्रा यांनी दिली . कार्यक्रमाचे निवेदन सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे व आभार प्रदर्शन संचालिका सौ.वंदना नारे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका वृषाली वाघमारे ,धनश्री पांडे, अदिती वाडे, श्रीकांत कोरडे, विजय कोरडे ,संतोष शेळके ,नेहा पलन, अनामिका देशपांडे यांनी सहकार्य केले .

*एकनिष्ठा फाउंडेशन कडून गरजू रुग्णांना आर्थिक मदत**दिनांक 12/09/2024*खामगांव :-(संतोष आटोळे) येथील रुग्णसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन कडून रुग्णांना खामगांव आणि शेगांव येथे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन आर्थिक मदत करण्यात आली. रुग्ण विवेक कृष्णराव देशमुख राहणार मिरा नगर खामगांव यांची परिस्थिती नाजुक असल्यामुळे त्यांचा एक हात एक पाय काम निकामी झाल्याने त्यांना पुढच्या उपचारासाठी रोख 12,100 बारा हजार शंभर रुपयाची आर्थिक मदत औषधोपचार करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष देण्यात आली. तसेच अपघातात जखमी झालेले रुग्ण संतोष दिलीप भराटे राहणार शेगांव यांना चालणे खुप कठीण होत होते त्यांची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे 1,500 पंधराशे रुपये किमतीचे नवीन वाकर देऊन आर्थिक मदत शेगांव येथे जाऊन करण्यात आली. या सेवा मदत कार्यासाठी एकनिष्ठा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, हरीष पंजवानी, ज्ञानेश सेवक सर, किशोर वाघ, अनिल बिस्सा, सौ.लता गावडे, अनिरुद्ध पाटील, ऋषी तंबोले, सिद्धेश्वर निर्मळ, पंकज अंबारे, चि. समन्यू यादव आदि लोकांनी परिश्रम घेऊन एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे आर्थिक मदत केली.

दिव्यांग श्रीनाथला मारहाणसह जिवे मारण्याची धमकी गंभिर जख्मी दिव्यांग पुढिल ऊपचारासाठी अकोल्यात भर्ती नांदुरा (सुरेश खानचंदाणी) नांदुरा पो.स्टे. नांदुरा दि.11/09/2024येथे कांता श्रीनाथ वय 48 वर्षे व्यवसाय घरकाम जात- भोई. पोलीस वसाहत जवळ नांदुरा ता. नांदुरा पोलीस स्टेशनला पती प्रल्हाद नारायण श्रीनाथ व मुलगा विवेक प्रल्हाद श्रीनाथ यांचेसह येवून तोडी रिपोर्ट दिली की मी वरील प्रमाणे माझे कुटुंबासह राहते. दि.11/09/2024 थे सायंकाळी 04.45 चे सुमारास मी घरी हजर असतांना मोहल्ल्यातील लहान मुले धावत माझे घरी आले त्यांनी मला सांगितले की प्रल्हाद आबांना दुकानदाराने फावड्याने मारले आहे अशी माहिती मिळताथ भी लगबगीने छत्रपती कृषी केंद्राजवळ गेली असता कृषी केंद्रासमोर माझे पती प्रल्हाद नारायण श्रीनाथ हे मला जखमी असस्थेत दिसून आले. त्यावेळी छत्रपती कृषी केंद्राचा मालक विशाल गजानन धूळे हा मला पाहून दुकानातून घाई-पाईने निघून गेला. त्यावेळी माझे पती यांनी मला सांगितले की छत्रपती कृषी केंद्राचा मालक विशाल गजानन धुळे याने विनाकारण फावडयाने डावे पायाचे घुटण्याखाली मारल्यामुळे जखम होवून खूप रक्तं निधाले आहे तसेच त्याने बुक्कीने तोंडावर मारल्यामुळे ओठ फुटून रक्त निघाले आहे. त्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही सर्व घटना गजानन झाल्टें रा. नांदुरा याने पाहिली आहे. या दरम्यान माझा मुलगा विवेक श्रीनाथ हा तेथे आला असता त्याला सुध्दा माझ्या पति धडलेली घटना सांगितली आहे. माझे पती यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचार करून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे रेफर केले आहे. विशाल गजानन धुळे वय अंदाजे 32 वर्ष रा. वार्ड क्र.02 नांदुरा याने माझे पतीला विनाकारण पावडयाने पायावर मारून जखमी केले. तोडावर बुक्का मारून जखमी केलें व शिवीगाळ करून जीवे मारण्यावी धमकी दिली, असे सर्व माझे पतीने मला सांगितले आहे. माझ्या पतीला सामान्य रुग्णालय खामगाव येथे रेफर केलेले असल्याने मी पोलीस स्टेशनला येवून रिपोर्ट देत आहे. तरी विशाल गजानन धुळेयाच्यावर कार्यवाही करण्याची तक्रार भारतीय न्याय संहिता११८-१,११५-२,३५१-२,३५१-३ व ३५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे,पुढिल तपास हेड काॅन्सटेबल भिमराव वानखेडे हे करित आहे,तर सदर तक्रार परिस्थितीची जाण पाहता संबधित प्रल्हाद श्रीनाथ हा दिव्यांग असल्यामुळे दिव्यांग सुरक्षा कायदा २०१६ नुसार कलम ९२ नुसार गुन्हा नोंदविणार असल्याची माहिती तक्रारदाराचे आप्तेष्ठाकळुन मिळाली आहे त्यामुळे या कयद्यानुसारही गुन्हा दाखल होणार असे दिसत आहे

दिव्यांग श्रीनाथला मारहाणसह जिवे मारण्याची धमकीगंभिर जख्मी दिव्यांग पुढिल ऊपचारासाठी अकोल्यात भर्तीनांदुर (सुरेश खानचंदाणी)नांदुरा पो.स्टे. नांदुरा दि.11/09/2024येथे कांता श्रीनाथ वय 48 वर्षे व्यवसाय घरकाम जात- भोई. पोलीस वसाहत जवळ नांदुरा ता. नांदुरा पोलीस स्टेशनला पती प्रल्हाद नारायण श्रीनाथ व मुलगा विवेक प्रल्हाद श्रीनाथ यांचेसह येवून तोडी रिपोर्ट दिली की मी वरील प्रमाणे माझे कुटुंबासह राहते. दि.11/09/2024 थे सायंकाळी 04.45 चे सुमारास मी घरी हजर असतांना मोहल्ल्यातील लहान मुले धावत माझे घरी आले त्यांनी मला सांगितले की प्रल्हाद आबांना दुकानदाराने फावड्याने मारले आहे अशी माहिती मिळताथ भी लगबगीने छत्रपती कृषी केंद्राजवळ गेली असता कृषी केंद्रासमोर माझे पती प्रल्हाद नारायण श्रीनाथ हे मला जखमी असस्थेत दिसून आले. त्यावेळी छत्रपती कृषी केंद्राचा मालक विशाल गजानन धूळे हा मला पाहून दुकानातून घाई-पाईने निघून गेला. त्यावेळी माझे पती यांनी मला सांगितले की छत्रपती कृषी केंद्राचा मालक विशाल गजानन धुळे याने विनाकारण फावडयाने डावे पायाचे घुटण्याखाली मारल्यामुळे जखम होवून खूप रक्तं निधाले आहे तसेच त्याने बुक्कीने तोंडावर मारल्यामुळे ओठ फुटून रक्त निघाले आहे. त्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही सर्व घटना गजानन झाल्टें रा. नांदुरा याने पाहिली आहे. या दरम्यान माझा मुलगा विवेक श्रीनाथ हा तेथे आला असता त्याला सुध्दा माझ्या पति धडलेली घटना सांगितली आहे. माझे पती यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचार करून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे रेफर केले आहे. विशाल गजानन धुळे वय अंदाजे 32 वर्ष रा. वार्ड क्र.02 नांदुरा याने माझे पतीला विनाकारण पावडयाने पायावर मारून जखमी केले. तोडावर बुक्का मारून जखमी केलें व शिवीगाळ करून जीवे मारण्यावी धमकी दिली, असे सर्व माझे पतीने मला सांगितले आहे. माझ्या पतीला सामान्य रुग्णालय खामगाव येथे रेफर केलेले असल्याने मी पोलीस स्टेशनला येवून रिपोर्ट देत आहे. तरी विशाल गजानन धुळेयाच्यावर कार्यवाही करण्याची तक्रार भारतीय न्याय संहिता११८-१,११५-२,३५१-२,३५१-३ व ३५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे,पुढिल तपास हेड काॅन्सटेबल भिमराव वानखेडे हे करित आहे,तर सदर तक्रार परिस्थितीची जाण पाहता संबधित प्रल्हाद श्रीनाथ हा दिव्यांग असल्यामुळे दिव्यांग सुरक्षा कायदा २०१६ नुसार कलम ९२ नुसार गुन्हा नोंदविणार असल्याची माहिती तक्रारदाराचे आप्तेष्ठाकळुन मिळाली आहे त्यामुळे या कयद्यानुसारही गुन्हा दाखल होणार असे दिसत आहे

Load More
That is All