माजी कामगार मंञी तथा आमदार डॉ श्री संजय कुटे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांना मोफत किचन सेट वाटप .... जळगाव जा.(विनायक भगत) ऊद्या दि 28/9/2024 रोजी बायोमॅट्रीक नोंदणी करित पाञ ठरलेल्या बांधकाम कामगरांना घरगुती ऊपयोगी भांड्यांची किटचे वाटप जळगाव जामोद विधानसभेचे आमदार तथा राज्याचे माजी कामगार मंञी संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे ज्या कामगार बंधू भगिनींचे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे त्यांनीच खालील ठिकाणी उपस्थित राहावे.ज्यांचे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन बाकी असेल त्यांच्या साठी 30 तारखेनंतर बायोमेट्रिक होताच त्याच ठिकाणी किचन सेट किट चे वाटप होणार आहे तरी कृपया ज्यांचे बायोमेट्रिक बाकी आहे त्यांनी येण्याचे टाळावे ही नम्र विनंती.सर्व पात्र लाभार्थ्यांना किट वाटपासाठी आम्ही कटीबद्ध असून सर्व पात्र कामगार बंधू -भगिनींना किटचें वाटप करण्यात येणार आहे. सुपो जिनिंग जळगांव जामोद येथे सकाळी 9 वाजता ज्या कामगार बांधवांचे बायोमॅट्रिक झाले असतील त्याच कामगार बांधवांनी किचन सेट साठी उपस्थित राहावे ऊर्वरित पात्र कामगार बांधवाना ३०/९/२०२४ च्या पुढे नियमित बायो मॅट्रिक सुरू राहील आणि किट वाटप सुद्धा हातोहात होणार आहे त्यामुळे उर्वरित कामगार बांधवानी उद्या विनाकारण गर्दी करण्याचे काही कारण नाही सर्वाना किट मिळणार असल्याचे कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post