०१०-०१-२०१९ते २०२४ या कालावधित लागलेल्या दिव्यांगाची चौकशी करण्याची मागणी बुलढाणा (गणेश सोनोने) काही वर्षात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून काही लोक सरकारी नौकरीवर रुजू होत आहेत. त्यामुळे खरोखर दिव्यांग असणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे. मागील वर्षांपासून जसे की, तलाठी / कृषीसेवक जलसंपदा/ पोलीस भरती / इत्यादी परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळून आलेला दिसतो . दिव्यांग उमेदवारांना स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी सरकारी नोकरी हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. जसे की इतर खाजगी नोकरी करणे दिव्यांग उमेदवारांना तुलनेने कठीण आहे. त्याचप्रमाणे बोगस खेळाडू प्रमाणपत्र काढून, जे व्यक्ती खेळाडू आहेत त्यांचे आरक्षण काही उमेदवार बळकावत असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. तरी वा विषयाच्या अनुसरुनदिनांक ०१/०१/२०१९ - ३१/०८/२०२४ पर्यंत शासकीय सेवेतते रुजू झालेल्या दिव्यांग व खेळाडू यांची कागदपत्राची फेरतपासणी व आरोग्य तपासणी करण्यात यावी. जेणेकरून या बोगस प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईहोईल, कोणीही दिव्यांग व जे व्यक्ती मूळ खेळाडू आहेत ते व्यांच्या हक्कापासून वंचित राहणार नाही. असे निवेदन शिवसेना विद्यार्थीसेना तालुका प्रमुखओमराजे गायकवाड व अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल इवरकर यांनी मा. जिल्हाधिकारी किरण पाटील यांना दिले.१० ऑक्टोंबर २०२४ वार गुरुवार या दिवसापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करण्यात बाच्या अन्यया तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
byदिव्यांग शक्ती
-
0