*समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील शासन निर्णयानुसार 5% टक्के दिव्यांग कल्याण निधी वाटप करा.**येत्या सात दिवसात दिव्यांग निधी वाटप करा अन्यथा ठिय्या आंदोलन...**राष्ट्रवादी अपंग सेलचे गटविकास अधिकारी यांना निवेदन...*समुद्रपूर:- समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील शासन निर्णयानुसार 5% टक्के दिव्यांग कल्याण निधी वाटप येत्या सात दिवसात करा अन्यथा ठिय्या आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे गटविकास अधिकारी यांना निवेदन... शासन निर्णया नुसार दिव्यांगाच्या कल्याण व पुनर्वसनाकरीता अनेक फायदे व निर्णय घेत असतात परंतु अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे दिव्यांग समाज त्यांना मिळणाऱ्या सोई सवलती पासून वंचित राहत आहे अशाच प्रकार समुद्रपूर पंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत मध्ये घडताना दिसून येत थाहे ग्रामीण भागातील दिव्यांगाच्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेतत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलने त्यांची दखल घेऊन दिव्यांग कल्याण निधी येत्या सात दिवसात निधिचा वाटप करण्यात यावा अन्यथा पंचायत समिती कार्यालमात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल द्वारे देण्यात आले.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, समुद्रपूर तालुका अध्यक्ष अमोल कंडे, हिंगणघाट शहराध्यक्ष जगदीश देवतळे, चिंधु लोहांडे, हरिदास कोटकर, सुमेध भगत, राजू पोहने, शंकर काकडे, गजानन अंडरस्कर, संगीता चुनारकर, सुनंदा काटकर, व अन्य दिव्यांग बांधव उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post