गारडगांव येथील बौध्द़ विहार साठी 1 कोटी निधी सहडॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत दलीत बांधवाच्या वस्तीच्या विकासासाठी रु.5 कोटी मंजूरआमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश खामगांव – खामगांव तालुक्यातील प्रसिध्द़ गारडगांव येथील बौध्द़ विहार येथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी विविध विकास कामांसाठी रु. 1 कोटी सह मतदार संघातील विविध दलीत वस्तीतील विकास कामांसाठी रु.5.00 कोटी निधी आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेले आहे. खामगांव मतदार संघाचा विकास आमदार ॲड आकाशदादा फुंडकर हे सबका साथ सबका विकास या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या धोरणानुसार करीत आहेत. गारडगांव येथील बौध्द़ विहार हे विदर्भात प्रसिध्द़ आहे बौध्द़ अनुयायी या ठिकाणी दसरा, बुध्द़ पौर्णिमा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती या कार्यक्रमानिमीत्य़ मोठया संख्येने भेट देतात. अनेक अनुयायी हे मुक्कामी असतात. त्यांच्या सोयीसाठी भक्त़ निवास व्हावे या ठिकाणी मोठे स्तुप उभे रहावे अशी मागणी अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. त्यासाठी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांनी रु 1.00 कोटी निधी विशेष प्रयत्नातून मंजूर करुन घेतला आहे. या कामाची लवकरच निविदा प्रक्रीया पुर्ण होऊन कामांना सुरुवात करण्याचा प्रयत्ऩ आहे. बौध्द़ धर्मियासाठी अतिशय महत्वाचे हे विकास काम मागील अनेक दशकांपासून प्रलंबीत होते. परंतु आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांनी पुढाकार घेत हे काम मार्गी लावले आहे यामुळे दलीत बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आमदार ॲड आकाश फुंडकर निधी मंजूर केल्याबद्दल आनंद व्यक्त़ केल्या जात आहे. या सोबतच खामगांव मतदार संघातील खामगांव व शेगांव तालुक्यातील दलीत बांधवांसाठी बौध्द़ विहा सौदर्यीकरण, स्मशानभूमी, सभामंडप, रस्ते, नाल्या या कामांसाठी देखील रु.4.00 कोटी मंजूर केले असून दलीत बांधवांसाठी एकुण 5.00 कोटी रु निधी मंजूर केला आहे. दलीत वस्तीतील जवळपास सर्वच् कामे पुर्ण झालेली असून येत्या काळात प्रलंबीत असलेली उर्वरीत कामे देखील पुर्ण केल्या जातील असे आमदार ॲड आकाश फुंडकर यावेळी बोलतांना म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post