दखल दिव्यांग शक्तीची MPSC च्या पाञार्थीपासुन झाली सुरवात दिव्यांग प्रमाणपत्रे तपासणार ! मुंबई (अशोक चव्हाण): कृषी विभागासह ईतर विभागात २०२३-२४ या वर्षात दिव्यांग कोट्यातून भरती झालेल्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे एम पी एस सी विभाग तपासणार असून, त्यादृष्टीने तयारी सुरू केल्याची माहिती विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या भरतीत दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या उमेदवारांची सखोल चौकशी करावी, असे पत्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघटनेने मंञी महोदयासह सर्वांना दिले होते. नुकत्याच झालेल्या कृषी सेवक पदभरती परीक्षेत दिव्यांग आरक्षणांमधून भरती झालेल्या उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक केल्याचा उल्लेख या तक्रारीत होता २०१८-२०१९ मध्ये झालेल्या कृषी सेवक पदभरतीत दिव्यांग कोट्यातून बोगस प्रमाणपत्र वापरून उमेदवार निवडले गेलेले आहेत, असा संशय असल्याचेही या तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे जे मूळ दिव्यांग आहेत त्यांना न्याय देण्यासाठी २०१६ पासून कृषी विभागासह एम पी ऐस सी ऊत्तीर्ण झालेल्या सर्व भरतीमध्ये निवड झालेल्या दिव्यांग कोट्यातील उमेदवारांची सखोल चौकशी करण्याचे आदेशित झाले आहे, ९-१ प्रमाणे यांची सक्षम अधिकार्याच्या माध्यमातुन तपासणी होणार आहे तर मिळालेल्या सुञानुसार शिक्षक वर्गासह ईतर विभागातील अधिकारी कर्मचारी हे बनावट अपंग असल्याचे प्रमाणपञ मिळवुन शासनाच्या एच्छिक बदलीसह प्रवास सवलतीचा व,ईतर लाभ घेत आहेअश्याची चौकशी करुन दिव्यांग सुरक्षा हमी कायद्यान्वैय कार्यवाही करण्याच्या मागणीने जोर धरला आहे
byदिव्यांग शक्ती
-
0