५००/-₹१०००/-₹ मध्ये व्हा दिव्यांग!....बोगस अपंगची चौकशी व्हावी...चंद्रपुर (दिलीप मीश्रा)संपुर्ण - सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या अपंगांच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याची चौकशी करावी. या करिता जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांना दिव्यांग मित्र परिवार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या वतिने वरील संदर्भ म्हणजे बनावट अपंग प्रमाणपत्र बनवण्याचा घोटाळा सामान्य रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर व दलालांमार्फत सुरू आहे. अपंगत्व प्रमाणपत्र नोंदणी आणि UDID कार्ड बनवण्याच्या नावाखाली प्रत्येक अपंग व्यक्तीकडून रु. 500/- ते रु. 1000/- घेतले जातात. एका आठवड्यात 30 दिव्यांग रू. 304500 रू. 15000/- एका महिन्यात, 120 अपंग लोक 1204500 रुपये = 60,000/- कमावतात. डॉ.आंबटकर यांची भेट घेतल्यानंतर दलाल नेमून अपंगांना दिलेल्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या टक्केवारीत समायोजन केले जाते. अपंग असलेल्या सुबोध जुन्नवारला अपंग बनवून अपंग प्रमाणपत्र देण्यात आले. दलाल आणि डॉ. आंबटकर यांचे अप्रतिम कार्य, आजवर अशी किती बेकायदेशीर अपंगत्व प्रमाणपत्रे बनवली असतील?यावर खालिल मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये 1) डॉ. आंबटकर यांना निलंबित करून गुन्हा नोंदवा. 2) अपंगांच्या सर्व विभागातील डॉक्टरांनी दिलेल्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या टक्केवारीतील अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे.. ३) रूग्णालयाच्या आवारात बसून दलाल म्हणून काम करणाऱ्यांना व त्यांच्या साथीदारांना रूग्णालयाच्या आवारात व्यवसाय करण्याची परवानगी पत्रे दाखवावीत. या अपंगांच्या मागण्या १५ दिवसात पूर्ण न झाल्यास उन्हात बसून आंदोलन करण्यात येईल. कोणत्याही अपंग व्यक्तीचे काहीही झाले तर त्याला प्रशासन जबाबदार असेल.असे निवेदनात म्हटले आहे तर निवेदनाच्या प्रती संबधितांना दिल्या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post