*तेल्हारा तेली समाजाची कार्यकारणी जाहीर! , तेल्हारा तेली समाजाच्या अध्यक्षपदी अरुण अकोटकर यांची नियुक्ती!*तेल्हारा (संध्या ताथोड) दि.१० मे ; तेल्यांचं तेल्हारा अशी वेगळी एक ओळख असलेलं अकोला जिल्ह्यातील तेल्हारा हे शहर असून हे एक तालुक्याचे ठिकाण आहे .या वर्षी शुक्रवार दि.१० मे रोजी , दरवर्षीप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या पावन पर्वावर आयोजीत असलेल्या तेली समाजाच्या कार्यकारिणीची वार्षिक आमसभा होती या आमसभेच्या दिनी जुन्या कार्यकारणीची तेली समाज बांधवांच्या उपस्थितीत राठोड तेली पंच बंगला येथे बरखास्ती करण्यात आली असून नवीन कार्यकारणीची तात्काळ नियुक्ती आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजव्लन करुन संताजी महाराज जगनाडे व समाजाच्या विकासाकरिता शेतजमीन दान करणारे थोर व्यक्तिमत्व स्व.रामभाऊ सोनटक्के यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये तेल्हारा तेली समाजाच्या अध्यक्षपदी तेल्हारा शहरातील तेली समाजाचे प्रतिष्ठित नागरिक , पेशाने व्यावसायिक असलेले सय्यमी आणि शांतता प्रिय असलेले अरुणभाऊ अकोटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच योगेशभाऊ ईचे यांची उपाध्यक्षपदी , तर गोपालभाऊ भुजबले सचिव, गंगाधरराव खोडे सहसचिव, डॉ.महेश साकरकार कोषाध्यक्ष तर अनिल धनभर , गोपाल खोपाले ,अमित काकड, विठ्ठल वानखडे ,अजय राठोड ,आनंद भुजबले , सतिष चहाजगुणे , प्रशांत भागवत , रविंद्र वासनकर , निलेश विजय धनभर यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.तसेच भावी काळात होऊ घातलेल्या सामाजाच्या विकासाकरिता होणाऱ्या कार्यावर निरिक्षण ठेवण्याकरीता पाच सदस्यीय एका समितीचे गठणहि या बैठकीमध्ये करण्यात आले .या समितीमध्ये वासुदेवराव गोदे, दिपकभाऊ पोहने , वासुदेवराव वानखडे , पप्पुसेठ सोनटक्के व राजेंद्र भुजबले यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या नव्या कार्यकारणीचे समाजातील सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आहे. त्यांच्यावर जोरदार शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे. या बैठकीला असंख्य समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
byदिव्यांग शक्ती
-
0