*जमाअत ए इस्लामी हिंद खामगाव शाखेच्या वतीने जिल्ह्यातील हज यात्रेकरुंसाठी प्रशिक्षण सत्र संपन्न* *खामगाव (का.प्र.) हज ची भावना आणि उद्देश काय आहे?*१६ मे २०२४ रोजी, जमात-ए-इस्लामी हिंद खामगाव च्या वतीने अंजुमन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विशाल हॉलमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हज यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात *उमर तनवीर अहमद* यांनी सूरह अल-बकराच्या (3) आयतांचे (158 ते 160) पठण आणि भाषांतराने झाली. जमात-ए-इस्लामी हिंद खामगाव चे जिल्हा व्यवस्थापक सोहेल फुरकान साहिब यांच्या शुभारंभाच्या भाषणाने हज यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण सत्र अधिकृतपणे सुरू झाले. त्यानंतर पिंपळगाव राजा येथील कमर अहमद खान साहेब यांनी हज यात्रेकरूंना अल्लाहचे पाहुणे म्हणून संबोधले आणि हज प्रवासादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना सांगितल्या. नंतर औरंगाबादहून आले (खुदाम हज कमिटी औरंगाबादचे ट्रेनर) मुफ्ती मोहम्मद मोहसीन कासमी साहब यांनी सुमारे २ तासांच्या उमरा, हज आणि सफर ए मदीना बद्दल सविस्तर माहिती दिली. जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र चे शरिया कौन्सिलचे सदस्य अब्दुल कवी सिद्दीकी फलाही साहब हे प्रमुख पाहुणे औरंगाबादहून आले होते. हजची भावना, हज चा उद्देश आणि हज नंतर अपेक्षित बदल आणि त्याचे जीवनावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपल्या अनोख्या आणि हृदयस्पर्शी शैलीने सर्व प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. स्थानिक अमीर जमात-ए-इस्लामी हिंद खामगाव उमैर अहमद खान साहब यांनी आभारप्रदर्शन केले. सत्राच्या शेवटी, सर्व सहभागींच्या सन्मानार्थ स्नेहभोजन देण्यात आले (महिलांसाठी पडद्याची विशेष व योग्य व्यवस्था करण्यात आली होती). कार्यक्रमाचे संचालन सलीम अख्तर यांनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post