*क्षारयुक्त पाणी पिल्याने मृत्यूचे तांडव सुरुच तर कित्येकांना आजाराची लागण.**तत्काळ पाणिपुरवठा सुरू करा अन्यथा आंदोलन!प्रशांत डिक्कर.*जळगाव जामोद/ खारपानपट्टयात येत असलेल्या जळगाव संग्रामपूर तालुक्यात क्षारयुक्त पाणी पिल्याने अनेक लोकांना किडणीचे आजार होऊन मृत्यू झाले आहेत. तर कित्येक जण उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने मंजूर केलेल्या १४० गाव पाणीपुरवठा योजनेतुन होत असलेला पाणिपुरवठा जीवन प्राधिकरण विभागाने बऱ्याच गावातील बंद केला असल्याने लोकांना विषारी पाणी प्यावे लागत आहे. बंद केलेला पाणी पुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा ज्या गावातील पाणी पुरवठा बंद केला. त्याच गावातील किडणीग्रस्त रुग्णांना घेऊन बेमुदत आंदोलन करणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी म.जी.प्रा.विभागाचे उप अभियंता आय एच राठोड यांची भेट घेऊन निवेदनातुन दिला आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे होत असलेल्या आजाराला आळा घालण्यासाठी शासनाने १४० गाव पाणीपुरवठा योजना मंजूर करून पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू केला. पंरतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जळगाव जा. यांनी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयांची बिले काढून करोडो रुपयांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी स्वतःचे चांगभलं करुन घेतले आहे. आणि खारपानपट्ट्यात येत असलेल्या कित्येक गाव ग्रामपंचायतीकडे अव्वा चे सव्वा बिले काढून जाणिव पुर्वक पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा बंद केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावापोटी बंद केलेल्या पाणी पुरवठा प्रश्नावर संग्रामपूर जळगाव तालुक्यातील सरपंच किंवा नेते मंडळी समोर येत नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याने अनेक गावात अजुनही लोकांना क्षाराचे विषारी पाणी प्यावे लागत आहे. त्याच झपाट्याने किडणी आजार वाढत असल्याने संग्रामपूर जळगाव तालुक्यातील जणता भयभीत व त्रस्त झाली आहे. करीता बंद केलेला पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा व पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली हडपलेली रक्कम शासन जमा करण्यात यावी. अन्यथा किडणीग्रस्त रुग्णांना घेऊन कोणत्याहीक्षणी बेमुदत आंदोलन करणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जीवन प्राधिकरण विभागाचे उप अभियंता आय एच राठोड यांची भेट घेऊन लेखी निवेदनातून दिला आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0