दिव्यांगाचे पेंशन वाटप वेळेवर करा महिलाध्यक्ष सौ अरूणाताई काकड यांची मागणी मनोज भगत प्रतिनिधी, अकोलाअकोला : दिव्यांगाना शासनाकडुन दरमहा पंथराशे रुपये मानधन दिले जाते परंतु ते मानधन वेऴेवर मिऴत नाही ते वेऴेवर मिऴावे ही मागणी प्रहार अपंग संघटना अकोला महिलाध्यक्षा सौ अरूणाताई काकड यांनी शासनाकडे केली आहे समाजातील शेवटचा घटक म्हणजे दिव्यांग आहे तो अत्यंत हलाखीचे परिस्थिति मधे जीवन जगत असुन आणि शासना कडुन तुटपुंजे मानधन मिऴत असुन तें ही दोन तीन महिने मिऴत नाही. ज्यावेळेस तहसिल कार्यालयास विचारणा केली असता नायब तहसिलदार उडवा उडवीचे उत्तरे मिळतात.शासनाने आता मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना राबविली असुन लाडकी बहिन यांना पंधराशे रूपये मानधन देत आहे तेंही एका महिने मधे दोन महिने चे एकत्रित हप्ता टाकत असुन मात्र आमचे दिव्यांग बांधवांना मात्र तीन तीन महीने मानधन येत नाही ते नियमित वेऴेवर दयावे व जिल्ह्यातील दिंव्यागांची दखल घ्यावी अशी मागणी अकोला जिल्हा मधील दिव्यांग बांधव करित आहेत
byदिव्यांग शक्ती
-
0