आमचा कायदा नाही तर तुमचा फायदा नाही म्हणत जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांचे चले जाव आंदोलन : राहुल साळवे न नांदेड (माधव शिंदे) जिल्हा प्रतिनिधी :: नांदेड जिल्ह्यात अपंग दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ आणि दिव्यांग व्यक्तीसाठींचे महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१८ सह शासन निर्णयांची अंमलबजावणी न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडून ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करत आमचा कायदा नाही तर तुमचा फायदा नाही म्हणत चले जाव आंदोलन करणार असल्याची माहिती आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. शासन स्तरावरून दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी विविध शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत परंतु स्थानिक पातळीवर त्यांची अंमलबजावणी केली जात नाही. आमदार - खासदार निधीतूनही दिव्यांगांच्या कल्याणासाठी दरवर्षी 30 लाख रुपये विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे परंतु कार्यकाळ संपत आला तरी एकाही आमदार महोदयाने हा निधी खर्च केला नाही. तसेच खासदारानेही एम्पीलैड्समधील दिव्यांगांचा दरवर्षीचा ३० लाख रुपये निधी अखर्चितच ठेवत आपला कार्यकाळ पूर्ण केला असल्याचे साळवे म्हणाले.नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यात दिव्यांगांवरील वाढते अन्याय अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना जिल्ह्यात अपंग दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१८ ची अंमलबजावणी करण्यात आली नाही. शासनाने लाडकी बहिण योजना सुरू केली त्यातून दरमहा १५०० रूपये मानधन दिले जात आहे त्याच धर्तीवर लाडका दिव्यांग योजना राबवून प्रति दिव्यांग ६ हजार रुपये प्रति महिना संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगांना मानधन देण्यात यावे व आजवर दिव्यांगांसाठी निर्गमित करण्यात आलेल्या विविध विभागातील शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दिव्यांग दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढून काळा दिवस पाळत जिल्हा परिषद.महानगरपालिका. जिल्हाधिकारी कार्यालय. पोलिस प्रशासनसह संबंधित सर्वच शासकीय कार्यालयात जाऊन आमचा कायदा नाही तर तुमचा फायदा नाही म्हणत अधिका-यांच्या खुर्च्या जप्त करून चलेजाव आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात जास्तीत जास्त दिव्यांगांनी सहभागी होण्याचे आवाहन राहुल साळवेसह.देविदास बद्देवाड.फेरोज खान पठाण.प्रदिप हणवते.शेषेराव वाघमारे.विष्णु जायभाये.आनंदा माने.संतोष गज्जलवाड.कार्तिककुमार भरतीपुरम.राजु इराबत्तीन.सय्यद आरिफ.शिवाजी सुर्यवंशी.रवि कोकरे.नागनाथ कामजळगे. राजकुमार देवकर.परशुराम गायकवाड.प्रशांत हणमंते.अजय गोरे.शेख आतिक.मुंजाजी कावळे.संजय धुलधाणी.हसन खान.शेख माजिद.कमलाकर टाकळीकर.शेख आलिम.राज कदम.नागेश निरडी.धर्मेंद्र नालटे.किरणकुमार न्यालापल्ली.भाग्यश्री नागेश्वर. सविता गवते. कल्पना सप्ते.मनिषा पारधेसह मुकबधीर कर्णबधिर संघटना व ब्लाईंड संघटना यांच्याकडून आज करण्यात आले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0