सणवार सुसाट तर साखर नाही ताटात *सहा महापासुन अंतोदय लाभार्थींना साखरचे वाटत रखडले*बुलढाणा (शेखर तायडे)अन्न पुरवठाविभागा अंतर्गत प्रथम लाभार्थी कुटुंब असलेल्या कार्ड धारकांना प्रति कार्ड एक किलो साखर वाटप पस्तिस कीलो धान्यासोबत देण्यात येतेपरंतु मागिल एप्रील महिन्यापासुन ते आजतागत म्हणजे सहा महिन्यापर्यन्त साखरेचे वाटपच न झाल्याने पुरवठा विभागात सावळा गोंधळ पहावयास मिळत आहेयाविषयी अन्न पुरवठा विभागाविषयी रोष निर्माण होत आहेतर या विषयी तहसिल अंतर्गत असलेल्या पुरवठा विभागातुन माहिती घेतली असता एप्रिल महिन्याची साखर वितरणाची पुर्तता झाली आहे वरिष्ठकार्यलयातुन ऊर्वरित साखर आल्यास ते रेशन दुकानदारांना देण्यात येऊन त्याचे वाटप होईल तर याविषयी बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे यांचेशी संपर्क साधला असता एप्रिल मे जुनची डिमांड केलेली ती आल्यावर लगेच वाटप करण्यात येईलतब्बल सहावा महिना पुर्ण झाला तरी अजुनही साखरेमुळे तोंड गोड होत नाही अशी ओरड होत असतांना गहु बंद करुन ज्वारी वाटप होत आहे.आता सणवार चालु आहेत त्यामुळे नियमीत वाटप होत असलेल्या धान्यासाठी आता सणावारापर्यन्त गोडधोडसाठी साखर देणे तसेच संपुर्ण धान्य पुरवठा वितरणासाठी याचा विचार संबधित विभागाने करणे गरजेचे आहे
byदिव्यांग शक्ती
-
0