MH - 56 खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन खामगाव(शेखर तायडे)महाराष्ट्र शासन गृह (परिवहन) विभाग शासन निर्णय क्रमांक एमव्हीडी ०७२४/प्र.क्र.१६५/परि-४ मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक : ०३ ऑक्टोबर, २०२४ च्या आदेशान्वेय गृह विभाग शासन निर्णय क्र. एमव्हीडी ०८१५/प्र.क्र. २३३/परि-४ दि. १८ जून, २०१८. २. परिवहन आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र. पआका/रवका/का.- १०/ / नवीन कार्यालय निर्मिती/खामगाव/२०२४/जा.क्र.६८३३, दि. १०.०६.२०२४ व जा.क्र.१०८६४, दि.२७.०९.२०२४.यानुसारखामगाव, जि. बुलढाणा येथील वाहन नोंदणी संख्या, एकूण लोकसंख्या यांचा विचार करता स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खामगाव, जि. बुलढाणा या कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यात येतील, तुर्तास सदर कार्यालयासाठी विहीत मानांकनानुसार आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नियमानुसार करावी. सदरील नवीन कार्यालय सुरु करण्यासाठी शासकीय/खाजगी मालकीची जागा भाडे तत्वावर घेण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्तांनी तात्काळ करावी. सदर नवनिर्मित कार्यालयासाठी १ इंटरसेप्टर वाहनास मंजूरी देण्यात येत आहे. तर यावर खामगावकरांची प्रतिक्रीया घेतली असता ५६ तर भेटलेच असतेच जर खामगाव जिल्हा झाला असता तरअसोबुलढाणाचे हेलपाडे वाहनाचा कामामुळे वाचणार याचे समाधान आहे

Post a Comment

Previous Post Next Post