*4 ऑक्टोबर रोजी राज्यातील हजारो दिव्यांग करणार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर आंदोलन...*(छञपती संभाजीनगर)बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालय वर आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी प्रहार प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दिव्यांगांचे आंदोलन झाले होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तब्बल पाच तास धो धो पावसामध्ये सुरू होते. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना पुढाकार घेऊन दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान वाढवून देण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आमदार बच्चू कडू यांना व दिव्यांगांना भर पावसात जाहीर आश्वासन दिले होते की सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांगांचे मासिक मानधन वाढविण्यात येईल. इतर मागण्या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील. याच वेळी बच्चुभाऊंनी मंत्री अब्दुल सत्तार यांना इशारा दिला होता की आम्हाला खोटे आश्वासन दिल्यावर तुमच्या घरावर आंदोलन करू. परंतु झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात दिव्यांगांचे मानधन एक रुपयाने देखील वाढविण्यात आले नाही. त्यासोबतच दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक देखील बोलविण्यात आली नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरडे आश्वासन दिल्यामुळे राज्यातील लाखो दिव्यांग नाराज झाले असून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 4 ऑक्टोबर रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील घरावर हजारो दिव्यांग आंदोलन करणार असल्याचे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी जाहीर केले आहे..दिव्यांगांच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यासाठी राज्यातील हजारो दिव्यांगांनी सिल्लोड येथे निषेध आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.या आंदोलनाला स्वतः बच्चुभाऊ उपस्थित राहणार आहेत..
byदिव्यांग शक्ती
-
0