निता पाटिल बारामती तर लक्ष्मरिव भांबेरे बुलढाण्यातुन अशासकिय दिव्यांग समितीवर .खामगाव (संतोष आटोळे).राज्य सल्लागार मंडळातील अशासकीय सदस्यांच्या शासन निर्णय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ६६ च्या उपकलम २ (ई) मधील तरतूदीस अनुसरुन खाली नमूद सदस्यांची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.२. उक्त अधिनियमातील कलम ६६ च्या उपकलम २ (ई) (1) मधील तरतूदीनुसार दिव्यांग तसेच पुनर्वसन या क्षेत्रामधील तज्ञ व्यक्तींमधून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.१. श्रीमती निता देवळालकर, (ठाणे)२. श्रीमती निता धवन, (बारामती, पुणे)3. त्याचप्रमाणे कलम ६६-च्या उपकलम २ (ई) (i) मधील तरतूदीनुसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी नियुक्त करावयाचे अशासकीय सदस्य या गटातून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.१) श्री. जयसिंग कृष्णरावजी चव्हाण, नागपूर२) श्री. हेमंत उर्फ काकासाहेब प्रभाकर दीक्षित, नाशिक३) डॉ. भगवान स. चव्हाण, छत्रपती संभाजीनगर४) श्री. लक्ष्मणराव भांबेरे, बुलढाणा५) श्रीमती संगीता घोरपडे, कोल्हापूर६) श्री. सतीश चौरडिया, धुळे,४. त्याचप्रमाणे कलम ६६-च्या उपकलम २ (ई) (iv) मधील तरतूदीनुसार स्टेट चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचे प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी नियुक्त करावयाचे अशासकीय सदस्य या गटातून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे "अशासकीय सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.१) श्री. ललित गांधी२) श्री. रवींद्र मानगावे३) श्री. करणाकर शेट्टी५. उपरोक्त सदस्यांचा कालावधी व कार्ये याबाबतच्या अटी व शर्ती ह्या दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे लागू राहतील.

Post a Comment

Previous Post Next Post