जळगाव येथे दिव्यांगांचे निवेदन मुबईं आंन्दोलनासाठी जळगाव जामोद (विनायक भगत)प्रहार अपंग संस्था जळगाव संग्रामपुर येथिल दिव्यांगांनी मुबई येथे जाणे शक्य नसल्याने नारायण महाले प्रहार तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जळगाव जामोद मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब मुंबई यांनाअपंगांच्या विविध मागण्या मा.प्रहार संघटनेचे नेते बच्चुभाऊ कडू यांनी आज मुंबई येथे गांधी पुतळ्यासमोर अपंगांच्या विविध मागण्यासाठी हजारोंच्या संख्येने एल्गार मोर्चा काढलेला आहे एल्गार मोर्चामध्ये अपंगाच्या विविध मागण्या केलेल्या आहे आज महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार सुदृढ व्यक्तीना विविध योजना पारित करते आणि अपंग बांधवांना ज्यांना हात पाय नाही डोळे नाही जे चालू शकत नाही त्यांच्या उदरनिर्वाह दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे अशा अपंगा बांधवांना केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार हिनवत आहे अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी अपंगांच्या विविध योजना राबविल्या पाहिजे पण तसे आढळत नाही त्यामुळे माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे अपंगाचा बुलंद आवाजचा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला वेठीस धरण्यासाठी खालील मागण्या घेऊन सरकारच्या दरबारी मांडत आहे. १) दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे २) दिव्यांगाना घरकुल मिळालेच पाहिजे ३) दिव्यांगांची कर्जमाफी झालीच पाहिजे ४) दिव्यांगाने व्यवसायासाठी कर्ज व जागा उपलब्ध करून दिले पाहिजे ५) दिव्यांगांना अंतोदय कार्ड मिळालेच पाहिजे ६) दिव्यांकांचा नोकरीतील कोठा वाढवला पाहिजे ७) दिव्यांगांची वर्गवारी न करता सरसकट अंतोदय कार्ड देण्यात यावे ८) लाडका भाऊ योजनेमध्ये दिव्यांग बांधवांना समाविष्ट करून घेण्यात यावे ९) अपंगांचा कायदा कोणता 2016 ची अंमलबजावणी झालीच पाहिजे विविध मागण्यासह होत असलेल्या मोर्चाला जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटनाच्या वतीने जाहीर पाठिंबानिवेदनाच्याप्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा मा. समाज कल्याण अधिकारी साहेब समाज कल्याण विभाग बुलढाणा बुलढाणा मा. उपविभागीय अधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद यांना पाठविण्यात आल्या आहेत यावेळी प्रहार तालुकाध्यक्ष नारायण महाले प्रहार तालुका सचिव:-सरदार अवासे प्रकाश प्रकाश जवंजाळ संतोष काशिनाथ राऊत नारायण तुकाराम खंडारे देवकन्या गिरधर सोळंकी हिरामण श्रीराम सुरडकर तेजराव पाटील साक्षी गोपाल मंगेश देशमुख आदी यावेळी हजर होते
byदिव्यांग शक्ती
-
0