*पॅरा ओलंपिक क्रीडापटूचे सर्वोत्कृष्ट कामगिरी* 26 ऑगस्ट2024 ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत पॅरिसमध्ये पॅरा ओलंपिक स्पर्धा पार पडलेया या स्पर्धेमध्ये अनेक पॅरा खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताचे नाव जागतिक पातळीवर गाजवले आहे. या भारतीय पॅरा खेळाडूंनी भूतो ना भविष्य असे यश मिळवले आहे. पॅरा आर्चरी स्पर्धेमध्ये शितलदेवी देशासाठी व संपूर्ण जगासाठी एक प्रेरणा आहे. नैसर्गिक शक्तीचं उनिव असताना त्यावर मात करत उत्कृष्ट प्रदर्शन करणे हे ब्रीद वाक्य असणारे भारतीय पॅराखेळाडू सतत दुर्लक्षित राहिले आहे हे दुःख ने नमूद करावे लागेल.शारीरिक देवदत्त शक्तीचा उणीव असून सुद्धा त्यावर मात कर देशाला अनेक प्यरा खेळाडूंनी मेडल प्राप्त करून दिले. या सर्वांना माझा सॅल्यूट आहे माझ्या मते 1997 ते 2007 पर्यंत विदर्भात सुद्धा भरपूर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, पॅरा खेळाडू झालेले आहेत. त्यांना सुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भाचे नावलौकिक केलेले आहे. विदर्भाचे भीष्म पितामह अर्जुन पुरस्कार विजेते द्रोणाचार्य पुरस्कार विजेते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आदरणीय विजय मुनेश्वर सर यांचा फार मोठा वाटा आहे. अमरावती सुद्धा या काळात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर प्यरा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली यामध्ये विलास शिंदे, कांचनमाला पांडे सचिन काळे असे अनेक आंतरराष्ट्रीय पॅरा खेळाडू होते. आज अमरावती जिल्हा मध्ये पॅराखेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अमरावती जिल्हा मागे पडत आहे. भारतीय पॅरा खेळाडूंची पॅरिस ओलंपिक मध्ये शानदार कामगिरी केलेली आहे एकूण 29 पथकांची कमाई केलेली आहे . भारतीय खेळाडू सतत सर्वोच्च कामगिरी करत आहे. सर्व खेळाडूंना मानाचा मुजरा. *संत तुकोबाराया म्हटले "जे का रांजले गांजले तोच आपुले तो ची साधू ओळखावा देव तिथे जाणवा"* सर्व पॅरा खेळाडू हे देशासाठी देवदूत ठरले आहे . ( विलास शिंदे .मा आंतरराष्ट्रीय पॅरा खेळाडू अति. कार्यकारी अभियंता महावितरण शहर विभाग अमरावती.) तर खामगाव येथे अमरावती विभागिय पॅरा आॅलंपिक स्पर्धेचे आयोजन डिसेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपासुन करण्यात येणार असल्याची माहिती विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन या दिव्यांग संस्थेच्यावतिने मधुकर पाटिल यांनी दिली आहे
byदिव्यांग शक्ती
-
0