कोल्हापूर जिल्हा व शहर कृती समितीच्या अध्यक्ष पदी श्री. संजयसिंह जाधव यांची निवड ....कोल्हापूर.. जिल्हयातील शहरासह जवळपास २१ दिव्यांग संस्था आणि संघटना एकत्र येवून जिल्हा पातळीवर कोल्हापूर जिल्हा व शहर कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हयातील तळागाळातील दुर्लक्षीत व गरीब दिव्यांगांना शासकीय योजनेची माहिती व लाभ मिळावा या प्रमुख उद्देशाने दिव्यांग कृती समितीची स्थापना करण्यात आली असून प्रशासनाच्या गलथान कारभार आणि दिरंगाईमुळे दिव्यांगाना शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागते अशा दिव्यांगाना लाभ मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हयातील २१ संस्था व संघटनांनी जिल्हा परिषद कोल्हापूर येथील दिव्यांग कक्ष हॉल मध्ये दि. २३/०९/२०२४ रोजी एकत्र येवून चर्चा करुन सर्वानुमते कोल्हापूर जिल्हा व शहर दिव्यांग कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच कृती समितीच्या अध्यक्ष पदी श्री. संजयसिंह जाधव यांची तसेच उपाध्यक्ष पदी श्री. बाळासो गायकवाड यांची तसेच सचिव पदी श्री. संजय पोवार (बापू) आणि खजानीस पदी श्री. सुमिल शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.भविष्यात दिव्यांग बांधवांच्या समस्या कृती समितीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी नुतन पदाधिकारी यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हयातून विविध संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना कृती समितीचे अध्यक्ष संजयसिंह जाधव यांनी असे आवाहन केले की, कोल्हापूर जिल्हा व शहर कृती समिती ही सर्व दिव्यांगाना न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आली असून ज्या दिव्यांगाना शासकीय योजनेची अथवा कांही समस्यांची निराकरण करण्यासाठी आमचेशी संपर्क साधावा तसेच ज्या दिव्यांग संस्था व संघटना कृती समितीमध्ये सामिल होवू इच्छितात त्या सर्व संघटनांचेही स्वागत आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0