पाकिस्तान जिंदाबाद नारे देणाऱ्या गुन्हा दाखल झालेल्या देशद्रोह्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे-विहिंप बजरंग दल नांदुरानांदुरा- तालुक्यातील वडणेर भोलजी येथे काही देशविघातक प्रवृत्तीनी देशविरोधी घोषणा दिल्याचे निदर्शनात आले त्यात त्यांनी "पाकिस्तान जिंदाबाद च्या" घोषणा दिल्या आहेत.म्हणून नांदुरा येथे बजरंग दल जिल्हा संयोजक सुशील कोल्हे यांनी दखल घेत पोलीस स्टेशन नांदुरा यांना विश्व हिंदु परिषद.बजरंग दल कडून तक्रार देत या देश विरोधी लोकांवर कडक कारवाई करत भारतात राहून भारताच्या सुख सुविधा उपभोगून जर पाकिस्तान बद्दल आपुलकी वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानला जावे, देश विघातक घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली त्यानुसार सदर घटनेतील ४ च व्यक्तीवर पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्यांनासुद्धा अद्याप अटक करण्यात आली नाही करीता आज विहिंप विदर्भ प्रांत सहमंत्री ऍड अमोलजी अंधारे यांनी नांदुरा येथे पत्रकार परिषद घेत पोलिस प्रशासनास ८ दिवसात ह्या घटनेतील सर्व आरोपीना शोधून प्रसारित व्हिडीओ ची तपासणी करून नारे देणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करत ताबडतोब अटक करण्याची मागणी केली असून अटक न झाल्यास १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका केंद्रावर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.या पत्रकार परिषदेत बजरंग दल विभाग संयोजक गजानन धोरण, विभाग मंत्री उद्धव सातव,जिल्हा संयोजक सुशील कोल्हे विहिंप बजरंग दल नांदुरा प्रखंडाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
byदिव्यांग शक्ती
-
0