हिवरखेड येथे ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे हरिकीर्तन संपन्न मनोज भगततेल्हारा ग्रामिणस्वर्गीय श्री गजाननराव रामचंद्र तराळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त हिवरखेड येथील विघ्नहर्ता मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात ह भ प श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा हरी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गायनाचार्य ह भ प नागेश महाराज आगलावे , ह भ प सागर महाराज राऊत , तर मृदुंगाचार्य ह भ प भगवान महाराज ठाकरे यांनी साथ दिली. श्री. संतोष गजाननराव तराळे , श्री . रामप्रभू गजाननराव तराळे , श्री उद्धव गजाननराव तराळे , डॉक्टर श्री. गणेश गजाननराव तराळे व समस्त तराळे परिवार एदलापूर यांनी सदरहू कार्यक्रम आयोजित केला होता त्यात हजारोच्या संखेत उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर प्रीतीभोज ने कार्यक्रमाची सांगता झाली.
byदिव्यांग शक्ती
-
0