*शासनाच्या विविध विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गुलाब खरात यांनी घेतला पंचायत समिती खामगाव येथील कामांचा आढावा*जिल्हा परिषद बुलढाणा येथे नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद स्तरावरील विविध खाते प्रमुखांच्या उपस्थितीत दिनांक 25.09.2024 रोजी शासनाच्या विविध विकास कामांच्या प्रगती बाबत पंचायत समिती खामगाव येथील विविध विभागांचे खाते प्रमुख तसेच ग्राम पंचायत अधिकारी व इतर क्षेत्रिय अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा सभा स्थानिक महात्मा गांधी सभागृहात घेण्यात आली.सभेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर सर्वात जास्त अर्ज संकलन केलेल्या पंचायत समिती खामगाव चे त्यांनी अभिनंदन केले. सदर योजनेअंतर्गत अर्जांची ऑनलाईन तपासणीची युद्धपातळीवर कार्यवाही करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका , अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कर वसुली मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.विविध आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा त्वरित लाभ मिळावा यासाठी स्वामालकीची जागा नसलेल्या लाभार्थींची अतिक्रमणे नियमानुकुल करणे, पं.दिनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रा.पं. कडे अखर्चित असलेला निधी तातडीने खर्च करून निवडणूक आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. सातत्याने उपयोगात येत असलेल्या पॉलिथिन व प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे व त्यामुळे पर्यावरणास धोका संभवत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने आठवड्यातून एक दिवस उपयोगात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे संकलन करून सदर प्लास्टिकचा कचरा शासनाच्या घाटपुरी येथील प्लास्टिक पुनर्वापर केंद्रावर त्यावरील प्रक्रियेसाठी पाठवण्याचे निर्देशित केले. वैयक्तिक शौचालयाची बांधकामे व त्यांचा वापर, कचरा सांडपाणी व्यवस्थापन, पेयजल योजनांसाठी जागा उपलब्धता तसेच ग्रामपंचायतीस संबंधित अधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहण्यासाठी व गावातील नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी कर्तव्यात दक्ष राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. खामगाव येथील आढावा सभेपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायती वरणा येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व जिल्हा परिषद शाळेतील शौचालयाचे भूमिपूजन केले. आढावा सभा कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात यांचे सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी.एम.मोहन, प्रकल्प संचालक श्री. राजेश इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री.आशिष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)श्री.संजय इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) श्री भारसाकळे आधी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समारोप प्रसंगी गटविकास अधिकारी श्री.चंदनसिंग राजपूत यांनी सर्वांचे आभार मानले.चौकटीतप्रधान मंत्री, रमाई शबरी आवस योजनेच्या प्रतीक्षा यादीतील भूमिहीन लाभार्थीना जागा उपलब्ध करून देण्यासाठी ल्यांडबँक तयार करण्यासाठी गावाजवळील शेती बाजार भावाने विकण्यास तयार असणाऱ्या शेतकऱ्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी यांनी संकलित करावी,उपविभागीय अधिकारी यांचे कडे अतिक्रमित(गायारान जमीन सोडून)जागेत राहत असलेल्या चें नियमनुकुल करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे

Post a Comment

Previous Post Next Post