दिव्यांग श्रीनाथला मारहाणसह जिवे मारण्याची धमकी गंभिर जख्मी दिव्यांग पुढिल ऊपचारासाठी अकोल्यात भर्ती नांदुरा (सुरेश खानचंदाणी) नांदुरा पो.स्टे. नांदुरा दि.11/09/2024येथे कांता श्रीनाथ वय 48 वर्षे व्यवसाय घरकाम जात- भोई. पोलीस वसाहत जवळ नांदुरा ता. नांदुरा पोलीस स्टेशनला पती प्रल्हाद नारायण श्रीनाथ व मुलगा विवेक प्रल्हाद श्रीनाथ यांचेसह येवून तोडी रिपोर्ट दिली की मी वरील प्रमाणे माझे कुटुंबासह राहते. दि.11/09/2024 थे सायंकाळी 04.45 चे सुमारास मी घरी हजर असतांना मोहल्ल्यातील लहान मुले धावत माझे घरी आले त्यांनी मला सांगितले की प्रल्हाद आबांना दुकानदाराने फावड्याने मारले आहे अशी माहिती मिळताथ भी लगबगीने छत्रपती कृषी केंद्राजवळ गेली असता कृषी केंद्रासमोर माझे पती प्रल्हाद नारायण श्रीनाथ हे मला जखमी असस्थेत दिसून आले. त्यावेळी छत्रपती कृषी केंद्राचा मालक विशाल गजानन धूळे हा मला पाहून दुकानातून घाई-पाईने निघून गेला. त्यावेळी माझे पती यांनी मला सांगितले की छत्रपती कृषी केंद्राचा मालक विशाल गजानन धुळे याने विनाकारण फावडयाने डावे पायाचे घुटण्याखाली मारल्यामुळे जखम होवून खूप रक्तं निधाले आहे तसेच त्याने बुक्कीने तोंडावर मारल्यामुळे ओठ फुटून रक्त निघाले आहे. त्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही सर्व घटना गजानन झाल्टें रा. नांदुरा याने पाहिली आहे. या दरम्यान माझा मुलगा विवेक श्रीनाथ हा तेथे आला असता त्याला सुध्दा माझ्या पति धडलेली घटना सांगितली आहे. माझे पती यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचार करून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे रेफर केले आहे. विशाल गजानन धुळे वय अंदाजे 32 वर्ष रा. वार्ड क्र.02 नांदुरा याने माझे पतीला विनाकारण पावडयाने पायावर मारून जखमी केले. तोडावर बुक्का मारून जखमी केलें व शिवीगाळ करून जीवे मारण्यावी धमकी दिली, असे सर्व माझे पतीने मला सांगितले आहे. माझ्या पतीला सामान्य रुग्णालय खामगाव येथे रेफर केलेले असल्याने मी पोलीस स्टेशनला येवून रिपोर्ट देत आहे. तरी विशाल गजानन धुळेयाच्यावर कार्यवाही करण्याची तक्रार भारतीय न्याय संहिता११८-१,११५-२,३५१-२,३५१-३ व ३५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे,पुढिल तपास हेड काॅन्सटेबल भिमराव वानखेडे हे करित आहे,तर सदर तक्रार परिस्थितीची जाण पाहता संबधित प्रल्हाद श्रीनाथ हा दिव्यांग असल्यामुळे दिव्यांग सुरक्षा कायदा २०१६ नुसार कलम ९२ नुसार गुन्हा नोंदविणार असल्याची माहिती तक्रारदाराचे आप्तेष्ठाकळुन मिळाली आहे त्यामुळे या कयद्यानुसारही गुन्हा दाखल होणार असे दिसत आहे
byदिव्यांग शक्ती
-
0