खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्साह..... मानाच्या लाकडी गणपती मंडळाच्या विश्वस्त व सदस्यांचा राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केला सत्कार खामगाव :-(संतोष आटोळे) दि.17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन अय्याची कोठी येथील मानाच्या लाकडी गणपतीची जिल्हा पोलीस अध्ािक्षक विश्व पानसरे व मा.आमदार राणा दिलीपकुमार यांच्या हस्ते आरती करुन गणेश विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अध्ािक्षक विश्व पानसरे यांच्यासह मानाच्या लाकडी गणपती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ॲड.आर.बी.अग्रवाल,गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरज बी.अग्रवाल यांच्यासह सदस्यांचा भगवी टोपी व भगवा दुपटट्ा घ्ाालुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष ॲड.धनंजय भेरडे, सचिव चंद्रशेखर पुरोहित, कोषाध्यक्ष संजय झुनझुनवाला,सदस्य डॉ.अनिल चव्हाण,संजय अग्रवाल, ॲड.व्ही.वाय.देशमुख,मा.नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,मा.नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,राणा दिग्वीजयसिंह सानंदा,खामगाव शहर कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांच्यासह गणेश भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
byदिव्यांग शक्ती
-
0