*अखेर शेती साहित्य चोरी प्रकरणातील ट्रॅक्टर जप्त* खामगांव - घाटपुरी शिवारातील शेतीतील साहित्य चोरी प्रकरणी शिवाजी नगर पोलीसांनी काल 24 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर जप्त केले आहे. घाटपुरी शिवारात पत्रकार गणेश रामेश्वर भेरडे (रा. गोपाळनगर) यांचे शेत आहे. या शेतामधून 22 मे 2024 रोजी अज्ञात चोरटयाने ट्रॅक्टर मधून शेतातील पाईप (किंमत 3250 रु.) लंपास केले होते. याप्रकरणी गणेश भेरडे यांनी 23 मे रोजी शिवाजी नगर पो. स्टे. ला तक्रार दिली होती. परंतु गुन्हा दाखल न करता प्रकरण थंड बस्त्यात टाकण्यात आले होते. याबाबत गणेश भेरडे यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्यामुळे अखेर 9 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपी मोहन उर्फ बाळू श्यामराव भोवरे (रा. गोपाळनगर) याला 16 ऑगस्ट रोजी अटक करुन समजपत्र देऊन सोडण्यात आले परंतु आरोपीने गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे गणेश भेरडे यांना परत पाठपुरावा करावा लागला. अखेर शिवाजी नगर पोलीसांनी 24 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.19 पी 3947 जप्त केले असून नंबर प्लेट मध्ये खोडतोड केल्याचे दिसून येत आहे. तर हे ट्रॅक्टर जळगांव खांदेश जिल्ह्यातील असून गौण खनिज चोरी प्रकरणात सुध्दा या ट्रॅक्टरचा वापर करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणाची तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक थोरात साहेब, एसडीपीओ विनोद ठाकरे, ठाणेदार पितांबर जाधव, पोहेकाँ देवेंद्र शेळके यांचे सहकार्य लाभल्याने गणेश भेरडे यांनी आभार व्यक्त केले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0