Showing posts from April, 2024

मलकापूर विधानसभा क्षेत्रातील13 मे रोजीचा आठवडी बाजार रद्दबुलडाणा, दि. 30 : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी दि. 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा क्षेत्रातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्या मतदान होणार असल्याने सोमवार, दि. 13 मेचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या क्षेत्रात कोणताही कायदा भंग होऊ नये, आचारसंहितेचे पालन होण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी संबंधीत गाव, शहरामध्ये मुख्य मार्गावर रस्त्यावर आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक बाजार खरेदी करण्यासाठी येत असतात. तसेच आजुबाजूचे गावातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होण्याची, तसेच मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जिल्हादंडाधिकारी यांना बाजार व जत्रा अधिनियम, 1862 च्या कलम 5 नुसार मलकापूर विधानसभा मतदारसंघाममध्ये दि. 13 मे 2024 रोजी कायदा व सुव्यवस्था, तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही यासाठी आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे. सदर आठवडी बाजार त्या पुढील दिवशी भरविण्याची मुभा देण्यात आली आहे.

1 मे रोजी ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन औचित्य माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे दिवशी खामगांव : - ऑल इंडिया कौमी तंजीम व काँग्रेस अल्पसंख्याक सेल खामगावच्या वतीने कर्मयोध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमारजी सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजात जातीय सलोखा राहावा व शांतता प्रस्तापित व्हावी या उदद्ेशाने दरवर्ष्ाी प्रमाणे यंदाही सोमवार दि.01 मे 2024 रोजी जातीय सलोख्यावर आध्ाारित ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दि.01 मे 2024 रोजी सायं.6 वाजता पासुन ते रात्री 12 वाजेपर्यंत खामगांव येथील मस्तान चौक भागातील मरहुम जिया उलहक खान साहेब नगर परिष्ाद उर्दु शाळेच्या भव्य प्रांगणावर हा ऑल इंडिया मुशायरा आयोजित केलेला आहे. या ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमात भारतातील नामवंत शायर,कवी सहभागी होणार आहे. यामध्ये मेराज आफरिदी (उतराखंड),हामीद भुसावली,हाशीम फीरोज़ाबादी(उतर प्रदेश),सतलज राहत इन्देरी (मध्य प्रदेश),वाहीद अन्साारी (मध्य प्रदेश), नईम फराज़,अलतमश तालीब (नांदेड), नम्रीता श्रीवास्तव. (भोपाल),अकील साहीर,अनीस शोक,मतीन तालीब, खुबैब ताबीशसह नामवंत शायर आपली शायरी सादर करणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरीता मुशायरा समीतीचे गठन करण्यात आले असुन या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु झाली आहे.तरी या ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ऑल इंडिया कौमी तंजीमचे शहर अध्यक्ष आबीद उलहक, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष नावेद अथहर उर्फ बबलु पठान यांनी केले आहे.

दिव्यांगांनो यादिवशी हे होणार नाही खामगाव ( का.प्र.)आपल्या दिव्यांगांना युडिआयडी प्रणालीचे प्रमाणपञ दर बुधवारी विविध रुग्णालयात आपल्या राज्यात घेण्यात येतेपरंतु १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस ,मराठी राजभाषा दिवस व आंतरराष्ट्रीय कामगार दिवस या बुधवारी येत असल्याने दिव्यांग तपासणी बोर्डे रुग्णालयात बंद राहणार आहे याची नोंद दिव्यांग व दिव्यांगत्व आलेल्यांनी घ्यावीतर शुक्रवारी असलेले बुलढाणा व ईतर ठिकाणी असलेले बोर्डे आपल्या वेळेवर राहिल

पत्रकार संजय वर्मा यांच्यावरील खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावाखामगाव शहरातील पत्रकार बांधवांची मागणी ः राज्‍यपाल, निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदनखामगाव ः १०६ मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वरिष्ठ नागरीकांना मतदान करण्यासाठी मदत केल्यामुळे मदतकर्त्या पत्रकाराला मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तात्काळ या प्रकरणी चौकशी कमिटी नेमुन घटनेची चौकशी करावी व संजय वर्मा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी खामगावातील पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज दि. २९ एप्रिल राेजी उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्‍वर पुरी यांच्या मार्फत राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये नमुद आहे की, पत्रकार संजय वर्मा यांच्या शेजारचे वयोवृध्द डॉ. सुधाकर तांबट, वय ८० व सौ. अलका तांबट ह मतदानासाठी पायी जात असतांना त्यांना संजय वर्मा यांनी चारचाकी वाहनाने मतदानासाठी पाठविले व मागन संजय वर्मा हे स्वतः मतदानासाठी गेले. येथे मतदान करण्यासाठी संजय वर्मा यांच्या अगोदर गेलेले डॉ. तांबट है. परत पायी येत असतांना त्यांना दिसले. संजय वर्मा यांनी त्यांची गाडी डॉ. तांबट यांना घेण्यासाठी मतदान केंद्र परिसरात बोलाविली असता पवन रतन शेगोकार नामक होमगार्ड ने गाडी आतमध्ये घेण्यास मज्जाव केला संजय वर्मा यांनी पवन शेगोकार यांना विनंती केली असता शेगोकार यांनी संजय वर्मा यांचेसोबत वाद घातम्या त्यानंतर वर्मा यांनी ड्रायव्हरला सांगुन वयोवृध्द मतदारांना घरी रवाना केले. संजय वर्मा या घटनेनंतर आतमध्ये मतदानासाठी गेलो असता आतमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचारी सुनिता कश्यप मॅडम या आल्या व त्यांनी घडलेल्या घटनेचा जाब विचारला. संजय वर्मा यांनी त्यांना वृत्तांत सांगत असतांनाच त्यांनी कारवाई करण्याची धमकी देत बाहेर निघुन जाण्याचे सांगीतले संजय वर्मा यांनी त्यांना मतदान करण्यासाठी आलो आहे असे सांगितले असतांना सुध्दा त्यांनी संजय वर्मा यांना बाहेर जाण्यास सांगितले. असे करून पोलीस कर्मचारी सुनिता कश्यप यांनी संजय वर्मा यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाकामुळे ते मतदान न करता निघून येत असतांना पाटे नावाचे पिएसआय तेथे पोहोचले त्यांनी त्यांना घटनेबद्दल विचारले असता त्यांना घटना सांगितली तेव्हा त्यांनी तुम्ही येथे जास्त वेळ थांबू नका अथवा कारवाई करावी लागेल असे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार संजय वर्मा हे मतदान न करना निघून गेले. त्यानंतर ते परत मतदानासाठी हिम्मत करून जात असतांना तेथे पंकज सातव हे आले, त्यांनी सदर महिला कर्मचाऱ्यास म्हटले की, हा पत्रकार पत्रकार याला घाबरू नका, याला मतदान करू देवु नका मी तुमच्या पाठीशी आहे असे बोलून एक प्रकारे आचार संहितेचा भंग केलेला आहे. यानंतर सदर घटनेची रितसर तक्रार संजय वर्मा यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.रामेश्‍वर पुरी यांच्याकडे दिली. तक्रारीची पोचही घेतली. कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत प्रविण नाचनकर शहर ठाणेदार खामगांव पो.स्टे. यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधुन संजय वर्मा यांना मतदान देण्यासाठी स्वतः संरक्षण द्यावे असे आदेश दिले. त्यानंतर संजय वर्मा हे मतदान केंद्र, जि.प.मुलींची शाळा नांदूरा राड खामगांवच्या बाहेर थांबले, तेथे शहर ठाणेदार हे आले तेथे उपस्थित पत्रकारांनी घटनेची शुटींग करीत होते त्यावेळी त्यांनी आल्याबरोबर पत्रकारांना धमकावत शुटींग न काढण्याचे सांगितले. त्यानंतर संजय वर्मा त्यांच्यासोबत मतदानाला गेले, मतदान करून परत आले. डॉ. रामेश्वर पुरी, सहाय्यक निवडणूक अधिकारी ५ यांनी संजय वर्मा यांची तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे यांना चौकशी व कार्यवाहीसाठी पाठविली, ही तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी चौकशी साठी व अहवाल सादर करण्यासाठी शहर ठाणेदार प्रविण नाचणकर यांच्याकडे तातडीने पाठविली. ही तक्रार बघितल्याबरोबर नाचणकर हे चिडले, त्यांनी होमगार्ड पवन रतन शेगोकार याला बोलावुन संजय वर्मा यांच्या विरूध्द फिर्याद द्यायला लावली. त्यानंतर प्रविण नाचणकर यांनी संजय वर्मा यांचेवर गुन्हा नं. २३६ दि.२६ एप्रिल रोजी रात्री १०.३८ वाजता कलम भादवि १८६० कलम ३५३, १८६, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५०, १९५१, १९८९ कलम १३१, १३२ नुसार गुन्हा दाखल केला. एका मतदारावर व जेष्ठ नागरीकांना मतदानासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीवर अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करून निवडणूकीला काळीमा फासला आहे. पोलीस कर्मचारी सुनिता कश्यप यांच्या विरूध्द यापुर्वीही अनेक तक्रारी आलेल्या असुन त्या वादग्रस्त आहेत. अशा या वादग्रस्त कर्मचाऱ्याविरूध्द कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. घटना स्थळी होमगार्ड पेक्षा वरिष्ठ कर्मचारी उपस्थित असतांना त्यांची तक्रार न घेता एका होमगार्डला तक्रार द्यायला लावुन गुन्हे दाखल केले आहे. या घटनेमुळे खामगांव शहरातील मतदारांना धक्का बसला असुन पुढे येणाऱ्या विधानसभा व नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये मतदान टक्केवारीवर याचा परिणाम निश्चीत दिसून येईल. शासन कोट्यावधी रूपये खर्च करून नागरीकांना मतदान करण्याचे आव्हान करते, मात्र अधिकाऱ्यांच्या अशा या वागणुकीमुळे मतदारांवर परिणाम होत आहे. मतदारांना मदत करणारे संजय वर्मा या पत्रकारावर गुन्हे दाखल केले, मात्र घटनास्थळी वाद करणाऱ्या वादग्रस्त कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले नाही व पत्रकाराचा अपमान करणाऱ्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तात्काळ या प्रकरणी चौकशी कमिटी नेमुन घटनेची चौकशी करावी व संजय वर्मा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना किशोर भोसले, अनिल खाेडके, किरण मोरे, शरद देशमुख, संजय वर्मा, मो.फारूख, मो.रियाज, राहुल खंडारे, अनुप गवळी, नितेश मानकर, मोहन हिवाळे, विनोद भोकरे, संतोष धुरंधर, नितीन इंगळे, गजानन सुशिर, आनंद गायगोळ, शिवाजी भोसले, पंकज ताठे, सुधिर टिकार, देवेंद्र ठाकरे, संभाजीराव टाले, मुकेश हेलोडे, गणेश पानझाडे, सिध्दांत उंबरकार यांच्यासह खामगाव तालुक्यातील असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

रेती चे टॅक्टर ए एसपी भरारी पथकाने पकडलेजळगाव (वि.प्र.)महसूल विभाग कडुन रेतीमाफियावर होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे. जिल्हात जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शाखाली एएसपी पथकाने 28 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव जामोद गस्तीवर असताना पोलीस पथकास मडाखेड शिवारातएक लाल रंगाचे ट्रॅक्टर ट्रालीसह मडाखेड गावाकडे येतांना दिसल्याने पोलिसांनी त्या ट्रक्टरला थांबविले. आणि पाहणी केली असता ट्रक्टरचे ट्राली मध्ये अवैध्यरित्या विना परवाना गौण खनिज रेती 1 ब्रास मिळुन आली. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विठ्ठल रमेश थेरोकार वय 24 व रा. माऊली पोष्ट भेंडवळ ता. जळगांव जामोद जि बुलडाणा असे सांगितले. तसेच ट्रक्टर चालकाकडे गौण खनिज रेतीची रॉयल्टी नसल्याने त्याचे ताब्यातील लाल रंगाचे SWARAJ 744 XT कंपनीचे ट्रक्टर विना नंबरचे व ट्राली सुध्दा लाल रंगाची त्या ट्राली मध्ये अंदाजे 01 ब्रास रेती किंमती अंदाजे 1 हजार रुपयेची भरलेली मिळून आली. ट्रक्टर चालक याचे कडे रेतीची रॉयल्टी व ड्रायव्हीग लासयन्स तसेच ट्रॅक्टर व ट्रालीचे कागदपत्र नसल्याने ट्रक्टर कि. 5 लाख रुपये, ट्राला किंमत अंदाजे 50 हजार रुपये व ट्रॉलीतील अंदाजे 01 ब्रास रेती किंमती अंदाजे 4 हजार रुपये. असा एकुण 5 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोहेकॉ सुधाकर थोरात यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चालक विठ्ठल थेरोकार याच्या विरुद्ध कलम 379 भा.द.वि. सहक. 158/177 3(1)/181 5/180, 50/177 मो.वा. का. प्रमाणे पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील कडासाने यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुधाकर थोरात, पोकॉ शिवशंकर वायाळ व पोका. हिरा परसुवाले यांनी केली.

निकाल येण्यापुर्वी शासकीय कागदपत्रांची जुळवाजुळव करा खामगाव : आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानुषंगाने लागणारी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे. पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाले आहे. आपले सरकार केंद्र, सेतू सुविधा केंद्र सि एस सी मार्फत ऑनलाइन अर्ज तहसील स्तरावर सादर करण्यासाठी केंद्रावर गर्दी होत आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र यासह इतर कागदपत्र काढून ठेवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जात आहे. यासाठी आपले व आपल्या पाल्याचे आधार कार्ड,रेशनकार्ड,शाळेची टिसी,फोटो,पॅन,ओळखपञ,आवश्यकता असल्यास प्रतिज्ञा लेख ओरिजनल व झेराॅक्स प्रतसह प्रवेशावेळी अडचण नको म्हणून आतापासूनच कागदपत्रे काढून ठेवणे गरजेचे आहे आधिच ऊन्हाचा तडाखा वाढल्याने वेळ असल्यामुळे आपली कागदपञे तयार ठेवावीत.

*महाराष्ट्रात कुठे ही #रसवंती गृहात ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्यावर तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का...??? की या बहुतांश रसवंती गृहांची नावे ' नवनाथ किंवा कानिफनाथ ' का असतात...????**आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागलाय... अमृततुल्यवर होणाऱ्या चाय पे चर्चावाल्या गरम चर्चाचे फड नवनाथ रसवंती गृहावर बसू लागले आहेत. ऊसपट्ट्यातलं कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली असो की दुष्काळात रमलेल नांदेड लातूर, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो की आडमार्गावरचं जांभूळगाव. *प्रत्येक गावातल्या स्टँडवर आठवडीबाजाराच्या ठिकाणी नवनाथ रसवंतीगृह असतेच, कधी कधी कानिफनाथ रसवंतीगृह असं नाव असतं.* *स्वच्छ टापटीप हे या रसवंतीगृहाचं वैशिष्ट्य असते. आत मध्ये नवनाथांचे चित्र लावलेले असते. टिपिकल पांढरी टोपी विजारशर्ट घातलेले काका ऊसाचा रस काढत असतात. घुंगराच्या मधुर सुरातल्या छुमछुम अशा लयीत मशीनचा गोल फिरणारा चरखा, त्यातून आतबाहेर फिरणारा ऊस आणि मग चिपाड बाजूला जाऊन आपल्या हातात येतो मस्त आलं लिंबू टाकलेला थंड उसाचा रस. समोर ठळक अक्षरात लिहिलेलं असत,* *“देशबंधूनो विचार करा चहा पेक्षा रस बरा” चांद्या पासून बांद्यापर्यंत कुठेही जा. पूर्ण महाराष्ट्रभर रसवंतीगृहामध्ये फार पूर्वीपासून हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं.**🔺घामाने डबडबलेले थकले भागले कष्टकरी असो वा एसी कारमधून फिरणारे मोठया कंपनीचे सीइओ अशा सगळ्यांची क्षुधाशांती या उसाच्या रसानेच होते.**पण ही एकाच नावाची नवनाथ रसवंतीगृह पाहिल्यावर आताच्या पिढीतल्या कुणाला वाटतं की..... ही सगळी रसवंतीगृह एकाच माणसाच्या मालकीची आहेत की काय...??? तर कुणाला वाटत की मॅकडोनाल्ड, के एफ सी चे जसे फ्रँचाइजी देतात तसे नवनाथ रसवंती गृहाची देखील फ्रँचाइजी असते की काय...???**🔺नवनाथ रसवंती गृहामागची कथा...**तर गोष्ट आहे साधारण सत्तर ऐंशी वर्षा पूर्वीची. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका गाव बोपगाव. पश्चिम महाराष्ट्राच्या मानान दुष्काळी पट्टा. पण इथला शेतकरी जिद्दी. जवळ असणाऱ्या थोड्याथोडक्या पाण्यावर शेती जगवत होता. त्याकाळात साखर कारखान्यांच पेव फुटलेलं नव्हत. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला हक्काचं मार्केट नव्हत. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता.**अशातच गावातला कोणीतरी खटपट्या तरुण रोजगार शोधायला मुंबईला गेला. तिथ गेल्यावर त्याला कळाल की इथ आपल्या उसाला इथ भरपूर मागणी आहे. त्याकाळात देशी उस असायचे. लहानमुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा. या उसाचे छोटे छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले. नंतर कोणाच्यातरी लक्षात आलं असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथ हे रस काढून विकावं. पुरंदरच्या गोड उसाच्या रसाने मुंबईत जादू केली. हळूहळू बोपगाव, गराडे, चांबळी, भिवरी अशा गावातली जगदाळे, शेंडकर,कटके, फडतरे,वाडकर ही आडनावे असलेली आणि बंडी विजार घालणारे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले. जिथ जातील तिथ दुधात साखर विरघळावी तसे तिथल्या माणसांच्यात विरघळून गेले. धंद्यात सचोटी ठेवली. आपल्या रसवंतीला त्यांनी ब्रँड बनवलं.**🔺मग रसवंतीला नवनाथ हेच नाव का दिल गेल..???**तर बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपैकी एक कानिफनाथस्वामी येथे तपश्चर्येला बसले होते. आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे. अख्खा पुरंदरतालुका या कानिफनाथांचा भक्त आहे. इथली माणस जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव श्रद्धेनं कुणी नवनाथ तर कुणी काफ़िनाथ ठेवलं.**“ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली आहे ! अशी लोककथा आहे.. त्यामुळे भाव तिथे देव या न्यायाने कनिफनाथाना ऊस , रस , गूळ आवडतो ! इतका सिंपल अर्थ आहे ! दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे ,त्यामुळे नवनाथ रसवंती , कानिफनाथ रसवंती ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला आणि तो जनमानसात रुळला**कानिफनाथ गड बोपगाव**पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं जायचं. पुढे लोखंडी मशीन आले. बैल गेले. पण या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी विसरू दिली नाही. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्यावर छुमछुम आवाज करत आहे. नवनाथ / कानिफनाथ रसवंतीगृहाचं यश बघून इतर रसवंतीगृह वाले सुद्धा तेच नाव वापरू लागले.* *_कोक पेप्सी सारखे कित्येक कोल्ड्रिंक आले तरी उसाचं रसासारख्या पारंपारिक पेयाची लोकप्रियता कमी होत नाही. कावीळ सारख्या रोगावर हमखास गुणकारी कोणत्याही सिझन मध्ये चालणारा आरोग्यदायी उत्साहवर्धक विशेष म्हणजे खिशाला परवडणारा उसाचा रस प्यावाच आणि तो ही नवनाथ रसवंतीगृहाचा हेच गोड सत्य उरते...**#nk* 🪷🪷🪷

नागोठाणेचे सुपुत्र संदीप गुरव यांची चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड बीच पॅरावॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड नागोठाणे रायगड (दिव्यांग शक्ती) :- ३० मे २०२४ ते B २ जून २०२४ रोजी दरम्यान चॉन्ग्किंग इन युन्यांग, चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड बीच पॅरावॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघामध्ये देशभरातील सहा खेळाडूंची निवड झाली असून यात महाराष्ट्रातील न छञपती शिवरायांची भुमी रायगड येथील नागोठण्याचे सुपुत्र शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त संदीप गुरव यांची निवड झाली आहे. यामुळे नागोठणे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वर्ल्ड बीच पॅरावॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघामध्ये संदीप गुरव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.संदीप गुरव यांनी आतापर्यंत जिद्दीच्या जोरावर तलवारबाजी खेळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सर्वोच्च असा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळविलेला आहे. व्हीलचेअर तलवारबाजी मध्ये हा पुरस्कार मिळवणारा महाराष्ट्राचा पहिला खेळाडू असल्याने नागोठणेसह रायगडच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला होता. आतापर्यंत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी तलवारबाजी व विविध खेळांमध्ये अनेक पदके संपादित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाकडून २०१२ सालातील गुणवंत खेळाडू म्हणून, तर रायगड जिल्हा परिषदे कडून मानाचा असा रायगड भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे

जेष्ठ पञकार जगदिश अग्रवाल यांच्या वाढदिवसानीमीत्य हाडांचे गर्भवती मातांचे शिबीर ......खामगाव ( मघुकर पाटिल)सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पञकार दिव्यांग बांधवासाठी सतत मार्गदर्शक असलेले जगदिशजी अग्रवाल यांच्यावाढदिवसाचे औचीत्य साधत २मे २०२४ गुरवार रोजी हाडांचे व गर्भवती मांतांच्या तपासणी व ईतर विकाराचे शिबीर आयोजित करण्यात आले आहेया शिबिरामध्ये अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करुन सल्ला व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये बी.एम.डी. टेस्ट म्हणजे हाडाच्या ठिसूळतेची मशीनद्वारे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच एक्स-रे आणि गर्भवती मातांची सोनोग्राफी तपासणी शुल्क मध्ये 50% सूट राहील. तरी संबंधित रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटल नांदुरा रोड डाॅ थेटे हाॅस्पिटलच्या बाजुला खामगाव येथे मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष व सर्व पत्रकार पदाधिकारी तसेच दिव्यांग शक्ती च्यावतिने करण्यात आले आहे

जेष्ठ पञकार जगदिश अग्रवाल यांच्या वाढदिवसानीमीत्य हाडांचे गर्भवती मातांचे शिबीर ......खामगाव ( मघुकर पाटिल)सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पञकार दिव्यांग बांधवासाठी सतत मार्गदर्शक असलेले जगदिशजी अग्रवाल यांच्यावाढदिवसाचे औचीत्य साधत २मे २०२४ गुरवार रोजी हाडांचे व गर्भवती मांतांच्या तपासणी व ईतर विकाराचे शिबीर आयोजित करण्यात आले आहेया शिबिरामध्ये अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करुन सल्ला व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये बी.एम.डी. टेस्ट म्हणजे हाडाच्या ठिसूळतेची मशीनद्वारे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच एक्स-रे आणि गर्भवती मातांची सोनोग्राफी तपासणी शुल्क मध्ये 50% सूट राहील. तरी संबंधित रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटल नांदुरा रोड डाॅ थेटे हाॅस्पिटलच्या बाजुला खामगाव येथे मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष व सर्व पत्रकार पदाधिकारी तसेच दिव्यांग शक्ती च्यावतिने करण्यात आले आहे

बुलढाणा लोकसभेमध्ये ५३%मतदान !खामगाव (मधुकर पाटिल ) बुलढाणा लोकसभा मतदानाची टक्केवारी घसरली याला कारणीभुत काल राञी झालेला पाऊस त्यातुन वाढलेली गर्मी याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारी वर पडल्याचे दिसुन येत आहेतर झालेल्या विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी खामगाव विधानसभा- 55.83 %, चिखली विधानसभा- 53.21 %, जळगाव जामोद विधानसभा - 49.55 %, बुलढाणा विधानसभा- 42.67 %, मेहकर विधानसभा- 58.72 % , सिंदखेड राजा विधानसभा -53 .31 % असे चिञ आजदुपारी 05.00 वाजेपर्यंत एकूण टक्केवारी 52.23% प्राप्त झाली आहे,तर बॅलेट मतदानाची टक्केवारी वेगळी आहे यामुळे विजय पराजयाचे गणित मांडणे कठिण झाल्याचे दिसुन येत आहे

*मतदान कक्षात फोटो काढण्यास मनाई असतांना फोटो सेशन*खामगाव (शेखर तायडे)आज मतदान प्रक्रिया सुरु आहे यासाठी मतदारामध्ये ऊत्साहाचे वातावरण प्रखर ऊन्हाच्या झळा असतांनाही दिसत आहे,या ठिकाणी मतदान केंद्राच्या कक्षामध्ये आपल्या ऊमेदवाराला मतदान केल्याचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असल्याने निवडणुक विभाग मोबाईल वापरण्यास आत मध्ये बंदी असतांना आपआपल्या ऊमेदवाराचे चिन्ह दर्शविणार्‍या मतदान यंञाचे मतदान केल्याचे फोटो व व्हिडीओ काढण्यासाठी केंद्रावर अलिखीत परवानगी दिली काय, अशी चर्चा खामगाव तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे,यावर निवडणुक विभाग काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागले आहे

*नवरदेवाचे लग्नाच्या आधी मतदान*खामगाव (शेखर तायडे) हिवरखेड ता खामगाव येथे लोकसभा मतदान होत असताना कोणीही मतदान चुकवू नये याची काळजी घेत हिवरखेड येथिल नवरदेव आज लग्न लागायला जात असताना नवरदेव अमर विश्वनाथ बावणे रा हिवरखेड यांना मतदान केंद्रावर नेऊन मतदान करवून घेताना स्वतः अशोकराव हटकर संचालक, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन,मुंबई यांनी बाईक वर बसवून नेऊन मतदान करून घेतले.यावेळी मंगेश काळे,महादेव हटकर,संदीप हटकर,महादेव टिकर,तलाठी आनंद वानखेडे इत्यादी.हजर होते

*नवरदेवाचे लग्नाच्या आधी केल मतदान*खामगाव (शेखर तायडे) हिवरखेड ता खामगाव येथे लोकसभा मतदान होत असताना कोणीही मतदान चुकवू नये याची काळजी घेत हिवरखेड येथिल नवरदेव आज लग्न लागायला जात असताना नवरदेव अमर विश्वनाथ बावणे रा हिवरखेड यांना मतदान केंद्रावर नेऊन मतदान करवून घेताना स्वतः अशोकराव हटकर संचालक, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन,मुंबई यांनी बाईक वर बसवून नेऊन मतदान करून घेतले.यावेळी मंगेश काळे,महादेव हटकर,संदीप हटकर,महादेव टिकर,तलाठी आनंद वानखेडे इत्यादी.हजर होते

*मातंगपुरी पुनर्वसन संबंधित प्रलंबित मागणीचा विचार करूनच मतदान करा.: गोपाल तायडे.**शेगाव मातंग समाजाच्या मागण्यांना भावी खासदार न्याय देतील का.?* बुलढाणा लोकसभाची निवडणूक होऊ घातली आहे. अनेक आजी माजी उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.अनेक पक्ष अपक्षाचे भावी खासदारांनी आपले वचनामे, जाहीरनामे मतदारांन पुढे ठेवले आहेत. शेतकऱ्यांचे व जणसामान्याचे बुलढाणा जिल्ह्यातील न झालेले काम निवडून आल्या नंतर पूर्ण करण्याची ग्वाही लोकसभाचे उमेदवार देत आहे . बुलढाणा जिल्ह्यातील श्री. संत गजानन महाराज पुण्य भूमी शेगाव येथील विकास आराखडा अंतर्गत करण्यात आलेल्या मांगपुरी पुनर्वसन समस्या कोणत्याही राजकीय पक्षा किंवा नेते पासून लपली नाही.कोणते भावी खाजदार मातंपुरी पुनर्वसन संबंधी ब्र शब्द ही बोलले नाही.शेगाव शहरात मातंग समाजाचा मोठा मतदाता वर्ग आहे.पाच वर्षा अगोदर पासून मातंगपुरी पुनर्वसन या गोळ नवा खाली मातंग समजला शहरातील केंद्र स्तन असलेल्या श्री. गजानन महाराज मंदिरा जवळ असलेल्या जागेतून कट कारस्थान करून( दीडशे वर्षांपासून राहत असलेला मातंग समाजाला अतिक्रन धारक. ) करून गावा कुसा भायेर तुटपुंज्या सदनिका बांधून देण्यात आले ज्या जागेतून मातंग समजला अतिक्रमन धारक म्हणून उठून देण्यात आले त्या जागेची किंमत मुबईच्या नरिमन पॉईंट, मंत्रालय परिसरातील जागे सामान आहे.मातगंपुरी पुनर्वसीत कुटुंबीयांना अत्यंत निष्कृष्ट दरज्याचे सदनिका पाचशे स्केअर फुट एवढ्या जागेत देण्यात आले. पुनर्वसित ठिकाणी सुविधाचा मोठा अभाव आहे. सदनिकेचा (7/12, 8अ ) अजून पर्यंत देण्यात आलेला नाही.,सदनेकेची नोद नजुल कार्यलयात नाही.काही मालकी धारकांना जागेचा मोबदला देण्यात आला नाही.पुनर्वसन कायद्यानुसार प्रकल्प ग्रस्त प्रमाण पत्र नाही, निकृष्ट दर्जाच्या सदनिकेची झालेल्या पळझळीची दुरुस्ती नाही. तपसनी नाही., शासन प्रशासननाला सहकार्य केल्याने घरपट्टी, पाणी पाणी पट्टी माफी नाही, मागणी नुसार दोन लाख.सहानुग्रह मदत नाही.पूर्वसित कुटूंबीयांना रोजगार नाही.मातंगपुरीत काही कुटीबियांना घरे असूनसिद्धा त्यांना अजून पर्यंत घेरे नाही.पुनर्वसित जागेत प्राथमिक शाळा, अंगणवाळी, नाल्या, चेंबर स्ट्रेट लाईट, गार्डन, सभागृहाची दुरुस्ती या सर्व सुविधा पूर्ण नाहीत. डॉ. अण्णाभाऊ साठे सौंदर्यकरण करण्यात आले नाही , लहुजी वस्ताद साळवे पुतळा असवीण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला नाही. मातंगपुरी पुनर्वसीत कुटुंबीयांच्या या प्रलंबित मागण्यांना भावी खासदार न्याय देतील का.? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोपाल तायडे यांनी उपस्तित केला असून. मातंगपुरी पुनर्वसित कुटुंबीय या प्रलंबित मागण्या चा विचार करूनच मतदान करतील.असे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.

आज पासुन कत्तल कि रात !ढाबे,बार,खाणावळी वर राहणार निर्णायक?चर्चा..........खामगाव(मधुकर पाटिल)बुलढाणा लोकसभेच्या प्रचार तोफा थंडावल्या,आता मुक प्रचारला सुरवात झाली आहेयामध्ये विजय पराजयाचे गणित मांडले जातील सौबतच बुथ कंट्रोल सिस्टीम ,आमिषे,हे देऊ ते देऊ च्या बाता सुरु झाल्यात आहेतयाता कठ्ठर समर्थक भाडेकरुंना म्हणजे बिनपगारी फुल जवाबदारींना सोबत घेऊन किंवा चंगळवादी शौकिनांना सोबत घेऊन दिवसाची राञ करुन आपल्या ऊमेदवाराला निवडुण आणण्यासाठी विविध शकले लढवित जागरण करण्यात धन्यता मांडतिलकत्तल कि रातयामध्ये मतदाराचे मतदान आपल्या पारड्यात पाडण्याकरिता आमिष ज्यामध्ये पैसा,साहित्य,कपडे आदींचा पुरवठा कुपन सिस्टीमने अथवा फोनद्वारे ठराविक दुकाने यांच्या संपर्कातुन मत विकाऊंच्या गरजापुर्ण करण्यासाठी आहे,यामध्ये दारुचा पुरवठा बेवड्या शौकिनासाठी मनसोक्त होतो यासाठी असल्याचे सर्वश्रुत आहेप्रशासन आणि पथकशहराच्या मुख्य चौकाला मोठ्या वाहतुकीच्या रस्त्यावर पोलिस महसुल प्रशासन यांच्या टीमची याठिकाणी नियुक्ती केली आहे यांची निगराणी तसेच फिरते पथक अनुचीत प्रकाराला आळा घालण्यासाठी तैनात करण्यात आले आहेया तैनातीचा फटका रेती माफियांना बसला आहे तो वेगळाच,असो निवडणुकीसाठी गब्बर असलेले कोटीच्या ऊड्डाणाला आळा घालण्यासाठी कि खर्चे करण्यासाठी ही कत्तल की रातच असल्याचे दिसत आहे

*हनुमान जन्मोत्सव निमित्त पहुरजीरा येथे हनुमान चालीसा पठण* खामगांव- हनुमान मंदिर पहुरजीरा येथे 23 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात आला. जन्मोत्सव निमित्त संध्याकाळी 7 वाजता हनुमान चालीसा पठण घेण्यात आला यावेळी उपस्थित धीरज फाटे, राहूल हिवराळे, स्वप्निल दिघडे, रवींद्र गावंडे, स्वप्निल हिवराळे, रोहन गावंडे आदर्श जैस्वाल, अजय ममतकर, यश सडतकार, ओम तायडे व सर्व गावकरी मंडळी यांची ऊपस्थिती होती,

*क्रुष्णजीवनी फाऊन्डेशन द्वारा आयोजित मोफत दंत तपासणी शिबिर वेडेवाकडे व बाहेर आलेले दात अत्याधुनिक पिनेच्याद्वारे सरळ करण्याची सुवर्ण संधी खामगाव.... "डॉ. पराग सुहास देशमुख" गोल्ड मेडलिस्ट BDS, MDS (नागपूर) माजी प्राध्यापक, शरद पवार डेंटल काॅलेज, सावंगी (मेघे)10 वर्षाचा अनुभव 3500+ रुग्णांचे दात सरळ व बरोबर करण्याचा अनुभव अमेरिका व लंडन मध्ये कामकरुन आल्याचा अनुभव हि ट्रिटमेंन्ट कोणी करावी? समोर आलेले दात,वेडेवाकडे दात,दातामध्ये फटा, चुकीच्या ठिकाणी दात येणे Braces/ पिन चे प्रकार मेटल पिन , सिरॅमिक पिन ,अलायर्नस पिन सेल्फ लागेटीन मेटलपिन तर ही तपासणी गुरुवार दि. 25 अप्रैल 2024 सकाळी 10 ते दु. 2 वाजेपर्यंत मानकर दातांचा दवाखाना पहिला माळा, नंद टॉवर्स, LIC आॅफिस जवळ, नांदुरा रोड, खामगांव 70288 22766 येथे होणार आहे तर या मोफत शिबीराकरिता जास्तित जास्त दातांच्या समस्या असलेल्यांनी लाभ घेण्याचे *डॉ. सम्राट अशोक मानकर BDS, MDS(Prosthodontics)पक्केदात,कवळी व डेंन्टल इम्लान्ट विशेषज्ञ, डाॅ. सोनिका सम्राट मानकर BDS, MDS (Prosthodontics) गोल्ड मेडलिस्ट पक्केदात,कवळी व डेंन्टल इम्लान्ट विशेषज्ञ यांनी केले आहे*

मैदानासाठी बच्चु कडु पोलिसांनवर संतापले .... अमरावती..नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्या सभेत प्रहारचे कार्यकर्ते संतप्त, पैसे आणि पावती भरुनही मैदान मिळत नाही बच्चू कडू यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीतील सभेसाठी अमरावतीचे सायन्स कोअर मैदान भाड्याने दिले होते आणि त्याची पावतीही घेतली होती, मात्र आता याच मैदानावर नवनीत राणा यांची सभा होणार आहे. मंत्री अमित शहा येणार आहेत. बच्चू कडू यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.अमरावती लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या पक्षाने दिनेश बुब च्या सभेसाठी सायन्स कोअर मैदान भाड्याने घेतले होते आणि त्याची पावतीही घेतली होती, मात्र आता नवनीत राणा यांची सभा होणार आहे ज्यासाठी देशाचे वर्तमान गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. बच्चू कडू यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.बच्चू कडू यांनी हे मैदान राखीव केले होते आणि त्याची पावतीही घेतली होती, मात्र आता येथे अमित शहांच्या सभेची तयारी सुरू आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी प्रशासनावर केला आहे. गृहमंत्र्यांच्या आगमनानिमित्त येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, वास्तविक अमरावती लोकसभेत काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होती, मात्र भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांना तिकीट दिल्याने बच्चू कडू यांचा पक्ष अडसुळ सह प्रहारही नाराज आहे. यासाठी प्रहारने आपला उमेदवार दिला आहे

*दिव्यांग व वृद्ध सन्मानाने करीत आहेत मतदान* खामगांव दि.२२: लोकशाही मूल्य प्रति बांधिलकी दर्शवित मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे पार पडावे तसेच देशात सर्वत्र लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना यात दिव्यांग व वृद्ध मतदारांना सन्मानाने मतदान करता यावे यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान करण्याचा हक्क मिळाला असून त्याची सुरुवात खामगांव येथून दि. २१ एप्रिल च्या सकाळी ७:३० वाजता पासून सुरू करण्यात आली असून यात विविध चमूकडून मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावेळी कोणत्याही कारणामुळे एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेत दि.२१ रोजी अती दुर्गम आणि वनांच्छादित असलेल्या कोंती या गावात ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदी पार करून मतदान अधिकारी,विजय रामकृष्ण निमकर्ड मायक्रो ऑब्झरर्वर सचिन क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल उमेश इंगळे व त्या गावचे केंद्रस्तरीय अधिकारी रामकृष्ण पानझडे यांनी श्री.गोपीचंद सदाशिव मोहिते वय ८६ यांना घरपोच मतदान करण्याचा हक्क मिळवून देण्यात आला. खामगाव मतदार संघात खामगाव व शेगाव तालुका येत असून १२० जेष्ठ नागरिक ८३ दिव्यांग असे २०३ असून मतदारांसाठी २१ ते २३ एप्रिल दरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १० पथके तयार करण्यात आली आहेत या पथकामध्ये मतदान केंद्र अध्यक्ष,मतदान अधिकारी,मायक्रो ऑब्झर्वर,पोलीस कर्मचारी,कॅमेरामन,व्हिडिओग्राफर तसेच एकूण १० वाहने कर्तव्य बजावत असून आज दि. २२ रोजी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी,रामेश्वर पुरी यांच्या उपस्थितीत सप्तशृंगी अपार्टमेंट खामगाव येथील शुभदा चिंतामण खेरडे नामक दिव्यांग महिला यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून यावेळी श्री.पुरी यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्यात.यावेळी पोस्टल टपाली नोडल अधिकारी तथा ना. तहसीलदार विजय पाटील ज्येष्ठ नागरिकाचे पोस्टल मतदान चमू क्रमांक ५ पथकातील केंद्रस्तरीय अधिकारी जयेश पुखराज जैन,राहुल दीपकराव पाठक मायक्रोऑब्झर्वर नामदेव प्रभाकर झांबरे व कर्मचारी उपस्थित होते.

खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ उद्या खामगावात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची महासभामहायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनखामगाव - बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भुमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार दि.23 एप्रिल रोजी खामगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी - रिपाई (आठवले) - रासप महायुतीकडून सलग चौथ्यांदा खासदार प्रतापराव जाधव बुलडाणा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवत आहेत. महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी दिवसरात्र झटत असून प्रचाराचा झंझावात सुरू आहे. तर मतदारांकडून खा.जाधव यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि.23 एप्रिल रोजी खामगाव येथील जे.व्ही.मेहता विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे, महेकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर, खामगाव मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर, बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड, चिखली मतदार संघाच्या आमदार सौ.श्‍वेताताई महाले, आमदार वसंतराव खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे, माजी आमदार सर्वश्री भारतभाऊ बोंद्रेख चैनसुख संचेती, विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, धृपतराव सावळे, शशीकांत खेडेकर आदी नेते उपस्थित राहणार आहेत. या महासभेला बुलडाणा लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पिरिपा, रयत क्रांती संघटना, रासप, प्रहार तसेच महायुतीतील मित्रपक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मतदार बंधुंनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे.

बहुजन टायगर सामाजिक संघटनाचा नरेद्र खेडेकर यांनाजाहीर पाठींबाखामगावआम्ही बहुजन टायगर सामजिक संघटना महाराष्ट्र च्यावतीने महाविकास आघाडीला पाठींबा देत आहे. ते खालील मुद्द्यावरभारतीय संविधान आणि लोकशाही च्या संरक्षणासाठी महाविकास आघाडी चे उमेदवार नरेंद्र भाऊ खेडेकर यांना जाहीर पाठिंबाआम्ही जाहीर पाठिंबा देतो कीं, आपण सर्व जाणताच कीं मोदी शहा च्या जोड गोडी ने हिटलर शाही चालू केलेली आहे. अनेक वादग्रस्त निर्णय पाशवी बहुमताच्या जोरावर घेतले आहे. जे न्याय तत्वात बसत नाही. संविधानिक संस्थाची मोडतोड केली आहे. म्हणून मोदींना पायबंद घालणे आवश्यक आहे. इंडिया आघाडी देशात एकजुटीने लढते आहे. आणि राज्यात महाविकास आघाडीला बहुजन टायगर सामाजिक संघटना शेतकरी कष्टकऱ्यांची अशी स्वाभिमानी संघटना आहे. आमचा महाविकास आघाडीचे उमेदवार मा. नरेंद्र खेडेकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे जनतेने त्यांना निवडून द्यावे असे हीगणेश पंडित इंगळेजिल्हा अध्यक्ष बुलढाणातसेच संस्थापक अध्यक्ष - कैलास चंद्रभान सिरसाट यांनी पञात म्हटले आहे हे पञ त्यांनी आज शिवसेना तालुका प्रमुख विजय बंडु बोदडे खामगाव यांना हे पाठिंबा पञ दिले आहे

गद्दारांना गाडण्यासाठी ऊध्दव ठाकरेंची सभा जास्तित जास्त संख्येने ऊपस्थित रहावे शिवसेना तालुका प्रमुख बंडु बोदडे यांचे आव्हान खामगाव... लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नरेंद्र खेडेकर यांना विजयी करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंञी ऊध्दव ठाकरे यांची सभा खामगाव येथे जे व्हि मेहता शाळेच्या प्रागंणावर आज आयोजीत केली आहे यासभेला क्राॅग्रेस पक्ष नेते मुकुल वासनिक,यांच्यासह राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार संजय राऊत यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे महाविकास आधाडीचे ऊमेदवार प्रा.खेडेकर यांना खामगाव सह जळगाव जामोद विधानसभेतुन भरगच्च लिड मिळणार असुन खेडेकर यांना विजयी करत गद्दाराला या निवडणुकीत पराभावाचा सामना करावा लागणार आहे

*खामगावातुन तिन ऊमेदवार*खामगाव (मधुकर पाटिल)तुम्हाला माहित आहे का या लोकसभेच्या मैदानात आपल्या बुलढाणाा लोकसभेच्या निवडणुक रिंगणात खामगाव तालुक्यातुन तीन ऊमेदवार आपले नशिब आजमावित आहेत तर यातील ऐक ऊमेदवार प्रत्येक लोकसभेसाठी तत्पर असतोचऊमेदवार १) ऊध्वराव ओंकार आटोळे हे खामगाव शहराला लागुन असलेल्या घाटपुरी ग्रामपंचायत क्षेञातील रहिवाशी असुन किसन नगर भागात रहातात त्यांना समाजकार्याची अत्यंत आवड असल्याने त्यांनी अनैक निवडणुकीत भाग घेतला आहे परंतु विजयापर्यन्त पोहचु शकले नाहीततर ते २०२४ लोकसभेसाठी आपले नशिब आजमावित आहेतऊमेदवार २) संतोष ईंगळे मनमिळावु स्वभावाचे व्यक्तीमत्व नेहमी समाज कार्यासाठी तत्पर राहणारे यांचे मुबई स्थितीत निकाळजे कुटुंबाशी असलेले संबध सर्वश्रुत आहेत सध्या निकाळजेच रिपब्लिक पार्टी (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष असुन त्यांनी बुलढाणाा लोकसभेची ऊमेदवारी त्यांना दिली आहे ऊमेदवार३) तालुक्याचे भविष्यातिल ठिकाण असलेल्या पिंपळगाव राजा येथिल रहिवाशी असुन आतंकवाद नष्ट करण्यासाठी सर्व समाजात एकोपा रहावा याकरिता कार्यरत असतात त्यांना समाजकार्याची आवड असल्याने देशातील अनेकांशी त्यांचे संबध अहेत मायनाॅरेटिक डोमोक्रेटिक पार्टीने बुलढाणा लोकसभेसाठी ऊमेदवारी दिली आहे

प्रतापरावांनी दिव्यांग निधी खर्चे केला नाही नांदेड (विजय चौडेकर) नांदेड -दिव्यांगा साठी असलेल्या विविध शासकीय योजना राबविण्यात येतात, त्यापैकी खासदार निधीतून,लाखो रुपये निधी खर्च करणे बंधनकारक आहे,तो निधी दिव्यांगाना उपकरणे घेऊन वितरीत करणे आवश्यक आहे,तसे केले जात नाही प्रहार दिव्याऺग सऺगठना नांदेड जिल्हा यांच्यावतिने वा ईतरा संघटनेच्यावतिने बरेचं आंदोलन झाले मोर्चा निवेदन देण्यात आले,तरी फक्त आश्वासन दिले गेले ,बाकी काही नाही अंमलबजावणी झाली नाही, आता निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे, जागोजागी सभा,बैठका घेतल्या जात आहेत, आणि सांगतात,मी हे केल ते केल या गावात असा विकास केला, परंतु दिव्यांगाची अपंगांची फक्त थट्टा केली गेली, वित्तीय वर्षात लाखोच्या घरात असलेला निधी ची तरतूद केली आहे,दिव्यांगाना उपकरणे खरेदी करून वितरीत करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समीती गठित करून सार्वजनिक कार्यक्रमात उपकरणे वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, परंतु आज वर नांदेड जिल्हा तील दिव्यांगांवर खर्च झाले नाही अश्या लोकप्रतिनीधीला घरी बसवित जो दिव्यांग हितार्थ प्राधान्याने कार्य करेल अश्या लोकप्रतिधी ला प्रतिनीधीत्व देणे आता गरजेचे झाले आहे यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी एक होत आपल्या हक्काचा आपल्या साठी काम करणारा प्रतिनीधी निवडुन देण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.

*शिवसेना सुप्रीमोंचा दौरा**खामगाव अजाणच!*खामगाव...मधुकर पाटिलबुलढाणा लोकसभेकरिता २६एप्रिलला मतदान होणार आहे या मतदारसंधातील खामगाव ,चिखली,जळगाव जामोद तसेच अकोलााजिलौह्यातील बाळापुर मतदार संघ या मतदार संघाचे आमदार नितीनबाप्पु देशमुख हे आहेततसेच या दौर्‍याची धुरा महाविकास अधाडीकडुन देशमुख साहेबच संभाळत आहेतया प्रचारादरम्यान ईंडीया आधाडीचे नेते शिवसेनेची बुलंद तोफ माजी मुख्यमंञी ऊद्धव ठाकरे यांचा प्रचार दौरा या तीन्ही विधानसभेच्या माध्यमातुन ठेवला आहेऊद्धव ठाकरे यांच्या दौर्‍याचे फलित एकञीत शिवसेनेच्या त्या काळातील ऊमेदवाराला झाले आहेशिवसेना महाविकास आधाडीचे ऊमेदवार यांना विजयासाठी ही सभा लाभकारी असतांना अजुनही या विधानसभेतील मतदारांना माहितीच नसल्याची चर्चा आहेविरुध्द ऊमेदवारांचा घरघर प्रचार चालु असतांना कत्तल कि रात प्रमाणे या म्हणी प्रमाणे याकडेही महाविकास आधाडी शिवसेनापक्षाने लक्ष देण्याची वेळ येऊन पडली असल्याचे वयोव्रुध्द जेष्ठ शिवसैनिकांनी आपली प्रतीक्रीया व्यक्त केली आहे

निवडणूक विभाग मतदारराजाचे दारी…जिल्ह्यात 21 एप्रिलपासून घरून मतदानाला सुरूवात*मतदारांनी घरी थांबण्याचे आवाहनबुलडाणा, दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024मध्ये प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले दिव्यांग मतदारांनी विहीत मुदतीत केलेल्या मागणीनुसार त्यांना घरपोच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 2 हजार 171 ज्येष्ठ नागरिक आणि 692 दिव्यांग असे एकूण 2 हजार 863 मतदारांच्या घरी जाऊन मतदान पथकामार्फत मतदान करुन घेण्यात येणार आहे. हे मतदान टपाली मतपत्रिकेद्वारे होणार असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या कामासाठी 101 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात दि. 21 ते 23 एप्रिल 2024 दरम्यान सदर मतदान प्रक्रिया होणार आहे.बुलडाणा विधानसभा मतदारसंघात 112 ज्येष्ठ नागरिक, 84 दिव्यांग असे 196, चिखली विधानसभा मतदारसंघात 318 ज्येष्ठ नागरिक, 96 दिव्यांग असे 414, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात 539 ज्येष्ठ नागरिक, 89 दिव्यांग असे 628, मेहकर विधानसभा मतदारसंघात 820 ज्येष्ठ नागरिक, 283 दिव्यांग असे सर्वाधिक 1 हजार 103, खामगाव विधानसभा मतदारसंघात 120 ज्येष्ठ नागरिक, 83 दिव्यांग असे 203, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 262 ज्येष्ठ नागरिक, 57 दिव्यांग असे 319, असे 2 हजार 171 आणि दिव्यांग 692 असे एकूण 2 हजार 863 मतदारांना घरपोच मतदान सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे.85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघ येथे 196 मतदारांसाठी 10 पथक, चिखली येथे 414 मतदारांसाठी 20 पथक, सिंदखेड राजा येथे 628 मतदारांसाठी 19 पथक, मेहकर येथे 1 हजार 103 मतदारांसाठी 32 पथक, खामगाव येथे 203 मतदारांसाठी 10 पथक, जळगाव जामोद येथे 319 मतदारांसाठी 10 पथक, असे एकूण 101 पथक दि. 21 एप्रिलपासून घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया राबवणार आहे. सदर मतदान पथकांमध्ये 2 मतदान अधिकारी हे सुक्ष्म निरीक्षक, 1 व्हिडीओग्राफर, 1 पोलिस कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.सदर मतदान प्रक्रिया पारदर्शीपणे, तसेच मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी उमेदवार स्वत: अथवा आपला प्रतिनिधी नियुक्त करुन मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करु शकतात. याप्रक्रियेमध्ये मतदारांना टपाली मतपत्रिकेवर खुण करुन आपले मतदान नोंदविता येईल. तसेच मतदान नोंदविल्यानंतर मतदारांच्या बोटाला पक्की शाईची खुण करण्यात येणार आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचे टिमकडून चित्रीकरण केले जाणार आहे.अंध व्यक्तींसाठी मतदान करताना विशेष सोय करण्यात आली आहे. निवडणुकीत 21 उमेदवार आणि 1 नोटा असल्याने मतपत्रिकेचे दोन भाग असणार आहे. एका मतपत्रिकेवर 16 उमेदवार आणि उर्वरीत उमेदवार दुसऱ्या मतपत्रिकेवर असणार आहे. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका पुरविण्यात येणार आहे. तसेच अंध दिव्यांग व्यक्तींना सोबत्याची मदत घेऊन देखील मतदान करता येणार आहे. दररोज मतदान संपल्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सर्व पथकातील टपाली मतपत्रिकेचे एकत्रिकरण करण्यात येवून सर्व टपाली मतपत्रिकेचे पाकिटे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान पथकांचा तारखेनिहाय नियोजन केलेले असून त्यास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली आहे. याबाबत मतदार, तसेच उमेदवार यांनादेखील कळविण्यात आले आहे. तरी या कालावधीत उपरोक्त मतदारांनी बाहेरगावी जाऊ नये, अथवा गैरहजर राहू नये, तसेच सदर मतदान प्रक्रियेचा लाभ घेऊन सर्व मतदारांनी मतदान करावे व लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवून लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी या घटकाने पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.00000लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा-विभागीय आयुक्त निधी पाण्डेय*दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांशी संवाद*लोकसभा निवडणुकीचा आढावाबुलडाणा, दि. 18 : लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व घटकांनी सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, युवक, तृतीयपंथी यांच्या सर्व मतदारांनी मतदानासाठी समोर येऊन मतदान करावे, तसेच मतदानासाठी इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती पाण्डेय यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मतदान करण्यासाठी शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचरकर, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, समाज कल्याण सहायक आयुक्त अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या तयारी आढावा घेताना श्रीमती पाण्डेय यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास भेट दिली. त्यांनी मतदार हेल्पलाईन, सी-व्हिजील, सीसीटीव्ही यंत्रणा आदींची माहिती घेतली. मतदार हेल्‍पलाईनवर येणाऱ्या दूरध्वनीबाबत कॉलसेंटरप्रमाणे उपस्थित कर्मचारी यांनी आपली ओळख द्यावी. त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ही माहिती देताना नम्रपणे ही माहिती देण्यात यावी. निवडणुकीच्या कालावधीत नियंत्रण कक्ष महत्वाची भूमिका बजावित असते. या कक्षाने इतर नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. जिल्ह्याला इतर राज्याची सिमा आहे. याठिकाणी असलेल्या चेकपोस्टवरील यंत्रणा सक्षमपणे सुरू ठेवावी. निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिरत्या पथकांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यावेळी त्यांनी थांबलेल्या पथकांशी संपर्क साधून माहिती घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. महिला मतदारांची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे. ही‍ निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती पाण्डेय यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध घटकांशी संवाद साधून त्यांचा सहभाग नोंदवून घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज श्रीमती पाण्डेय यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांग मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर जाण्या-येण्याची व्यवस्था करण्याबाबत माहिती घेतली.

स*ुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा मालेगाव शहरांमध्ये प्रथमच कार्यक्रम* मालेगाव (नरेश अग्रवाल) वाशिम मालेगाव शहरामध्ये श्रीराम नवमी निमित्याने श्रीराम भजन संध्या चे आयोजन सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर याच्या मधूर वाणीतून करण्यात आला असून या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याची आव्हान अभिनव फाउंडेशन चा वतीने करण्यात आला आहे प्रभू श्रीराम नवमीच्या निमित्त येणाऱ्या 18 एप्रिल 2024 रोजी मालेगाव शहरामध्ये श्रीराम भजन संध्या चे आयोजन सुप्रसिद्ध गायिका शहनज अख्तर याच्या मधुर वाणीतून संतोषी माता ग्राउंडवर आयोजित केला आहे वेळ संध्याकाळी सहा वाजता पासून ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील पुरुष आणि महिला उपस्थित राहणार असून अतिशय सुंदर आणि भक्तीमय कार्यक्रम आपल्या मालेगाव शहराचा इतिहास पहिल्या वेळेस अतिशय नियोजनातक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या भजन संध्या कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहावे असे आव्हान अभिनव फाउंडेशन च्या वतीने केले आहे

युग धर्म पब्लिक स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीखामगाव. (का.प्र.)प्रजास्त्तक गणतंत्र भारत देश निर्मितीचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जी भीम जयंती किंवा समता दिवस साजरी केली जाते . त्यांनी भारताचे पहिले कायदापंडित ,न्यायतज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ आणि थोर समाज सुधारक म्हणून त्यांनी काम पाहिले व सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी संविधान रुपी महान मार्गदर्शक पुस्तक भारतीयांना भेट दिले असे मूल्यवान विचार वक्त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांमध्ये शाळेचे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल सर , सचिव श्री मधुर जी अग्रवाल सर , प्राचार्य सौ मंगला महाजन मॅम तसेच सपकाळ सर आणि पालक वर्गामधून पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ पडोळे मॅम , व. सौ.वाकोडे मॅम हे मान्यवर व्यापीठाची शोभा वाढवित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,माता सरस्वती यांच्या तैलचित्रास माल्यार्पण करून तसेच मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले .तसेच सर्व शिक्षकांनी पुष्प अर्पण करूनअभिवादन केले. आलेल्या मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक मध्ये सौ . स्वाती मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर सखोल प्रकाश टाकला .तसेच शालेय अध्यक्ष गोपाल सरांनी मुलांना सांगितले की बाबासाहेबांसारखी जिद्द अंगी बाळगूळ आपला सर्वांगीण विकास करावा तसेच शाळेच्या प्राचार्या सौ मंगल महाजन मॅडम यांनी मुलांना अनमोल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या सौ .अस्मिता पडोळे मॅम वाकोडे मॅम यांनी सुद्धा बाबासाहेबांविषयी आपले मनोगत व्यक्त केले व मुलांना प्रोत्साहन देत कौतुकाची थाप पाठीवर व आशीर्वादाचा हात मस्तकी ठेवला.अशा प्रकारे शाळेत विविध उपक्रम राबविल्यामुळे मुलांचा सर्वांगीण व बौद्धिक विकास होतो असे ही आवर्जून सांगितले . या प्रसंगी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या ज्यात प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा, ड्रॉईंग ,कोलाज ,निबंध स्पर्धा इत्यादी समावेश होतो.निबंध स्पर्धेमध्ये प्रामुख्याने कृष्णा, हर्षित, यादवी ,प्रणव, अनुष्का, ऋतुजा, सेजल, अजिंक्य शौर्य यांनी बाबासाहेबांबद्दल माहिती सांगितली. बाबासाहेब आणि रमाबाई यांच्या वेशभूषेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ज्यात प्रथम क्रमांक रेयांश ,द्वितीय क्रमांक शिवण्या ,तृतीय क्रमांक नूतन यांनी पटकावला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हर्षित ,द्वितीय क्रमांक अनुष्का ,तृतीय क्रमांक रिया तर बाबासाहेबांच्या जीवन पटावर आधारित कोलाज स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सानवी तर द्वितीय क्रमांक अद्ववेत हा राहिला.ड्रॉइंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक धैर्यशील , द्वितीय अद्वित आणि तृतीय आनंदी टिकार तसेच निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुष्का, द्वितीय क्रमांक हर्षी त, तृतीय क्रमांक यादवी,कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सौ पायल मॅम यांनी आभार प्रदर्शन श्री लोणेसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या सौ. मंगला महाजन मॅम यांच्या नियोजना खाली सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचारी वर्ग, यांनी आपापली भूमिका पार पाडली अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता ही गोड आठवणीच्या रूपात संग्रहित छायाचित्र व चलचित्र स्वरुपात करण्यात आली.

*मोदींची हवा असतांनाही मिच झाली खासदार*अमरावती (का.प्र.)अमरावती लोकसभेसाठी दिग्गज ऊमेदवारांची फौज ऊभी आहे काॅग्रेस कडुन बळवंत वानखेडे,प्रहार संधटनेकडुन दिनेश बुब,वंचितच्या पाठिंब्यावर आनंदराज आंबेडकर तर पुर्वाश्रमीच्या अपक्ष ऊमेदवारीवर शरद पवार यांच्या आशिर्वादाने खासदार झालेल्या आज पतीच्या घरचा असलेला स्वाभिमान सोडत भाजपामध्ये दाखल झालेल्या नवनित राणा यांच्याच चौरंगी लढत आहेयालढतीमध्ये प्रचारा दरम्यान नवनित राणांचा गर्विष्ठ अभिमान सारखे शब्द ऊच्चारणा करित २०१९च्या लोकसभेलाही मोदींची हवा होती तरीही आमचाच विजय झालाया त्यांच्या विधानाने कट्टर भाजपा समर्थक यांनी नवनित राणा यांच्यावर तिखट प्रतिक्रीया देत आगपाखड केली आहेत्यांच्या या गर्विष्ठ विधानाची दखल वरिष्ठांनी गंभिर दखल घेतली आहे,आधिच मतदार संधात महायुती सोबत असलेले बच्चु कडु,शिंदे सेनेचे आनंदराव अडसुळ तसेच भाजपाचे बंडखोर यांना आवरताआवरता नाकी दम येत असतांना या विधानाने अमरावती लोकसभा विदर्भाच्या गर्मीत गर्मी वाढविणारी ठरली आहे.

भोपळे विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंती समारोहाचे आयोजन (मनोज भगत) तेल्हारा हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या समारोहाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, संस्थेचे हितचिंतक धैर्यशील भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे हे होते. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या जीवनकार्यावर भाषणे दिलीत. या दिनाचे औचित्य साधून नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या कु.आयुषी गजानन केदार तसेच NMMSE शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी चैताली श्रीकृष्ण काईगें, पायल सुनील शेगोकार,नमन जयानंद वानखडे,अजय रवींद्र पांडे,प्रज्वल प्रभुदास ताळे,दर्शन सुरेश इंगळे,गायत्री राजू ताळे,रोशन सिद्धार्थ वाकोडे व श्रद्धा रामा भोंडे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव पत्र देऊन कौतुक करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून श्यामशील भोपळे यांनी महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन शालेय जीवनात वाटचाल करावी,असा संदेश दिला. या समारोहाचे संचालन कु.उषा खंडेराव व कल्याणी उंबरकार ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत भोपळे यांनी केले. यावेळी शाळेचे जेष्ठ शिक्षक रंजित राठोड यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षक –शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी समारोहाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

आरटीईची नोंदणी आॅनलाईन आजपासुनखामगाव:( शेखर तायडे) बुलढाणा जिल्ह्यातील १४०० शाळांपैकी २२७ शाळांनी आरटीईची ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली. ती पूर्ण झाल्यानंतरही पालकांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख ठरली असून, १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वंचित व दुर्बल घटकांतील मुला मुलींसाठी शिक्षण हक्क कायदा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम २००९ अन्वये कलम १२ (एफ) (सी) नुसारप्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला- मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद शासनाने केली आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील आरटीई पात्र शाळांना नोंदणी बंधनकारक होती. आरटीई पात्र शाळांनी नोंदणी केली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याबाबतचे पत्र सोमवारीच पाठविले. त्यानुसार १६ एप्रिलपासून आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या २२७ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

*ना ना मुंदडा विद्यालय पतसंस्थेच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन* मालेगाव (नरेश अग्रवाल) दि 13/04/2023 रोजी ना. ना. मुंदडा विद्यालय पगारदार सेवकांच्या पतसंस्थेच्या वतीने गांधी चौक, मालेगाव येथे पाणपाईचे उद्धाटन ना. ना. मुंदडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री आशिषजी मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. *जल म्हणजे जीवन* या उक्ती प्रमाणे तहानलेल्या प्रवाशांना शीतल जल देवून तृप्त करण्याचा मानस मनासी बाळगून पाणपोईचे उद्धाटन करण्यात आले. 'पाणपोई' म्हणजे शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. ऊन्हाळ्याच्या दिवसात ऊन्हातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तहान भागविण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे सामाजिक जाणीव जीवंत असल्याचे लक्षण आहे. 'पाणपोई' हा एक सामाजिक उपक्रम असून तहानलेल्या वाटसरूंना पाणी पाजणे हे एक सामाजिक काम आहे. पाणपोईचे उद्धाटन प्रसंगी ना. ना. मुंदडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री आशिषजी मुंदडा, संचालक श्री अभिषेकजी मुंदडा, प्राचार्य श्री दिनेशजी उंटवाल, माजी उपप्राचार्य श्री श्रीकिसनजी मानधने सर, प्रतिष्ठित नागरिक श्री प्रेमरतनजी भुतडा, श्री प्रवीणजी काबरा, जेष्ठ शिक्षक श्री श्रीरामजी रोडे, प्रा अनंतराव गायकवाड, श्री राजेश कराळे, पतसंस्था अध्यक्ष प्रा. अनिल काळे, उपाध्यक्ष श्री संदीप सावले, प्रा अरविंद पिंपळकर आणि प्रा अंकुश सोमाणी श्री आशिष तिवारी असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी खामगाव.. भारतीय राजघटनेचे शिल्पकार आद्य पञकार दिनदलितांचे कैवारी दिनदुबळ्या शोषितांचे आधार महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन या दिव्यांग सेवा संस्थेच्या कार्यलयात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाल्यार्पण करुन साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक,तसेच एकनिष्ठा फाऊन्डेशनचे सुरज यादव यावेळी प्रमुख ऊपस्थित होते यावेळी डाॅ. आंबेडकर यांच्या जीवनावर ऊपस्थितांनी आपले विचार मांडलेसदर जयंती ऊत्सवाकरिता दिव्यांग शक्तीचे शेखर तायडे,महादेव पांडे,सिध्देश्वर निर्मळ वसंत चीखलकर,मधुकर पाटिल नारायणकाका जाधवसंतोष आटोळे,जगदिश रुपानी राजुभाऊ बोचरे,चेतन यादव ज्ञानेश्वर तायडे,दिलीप गांधी आदी यावेळी ऊपस्थित होते

लाखोची रोकड पकडली,नोडल अधिकारी मुंडेच्या पथकानेचिखली .गणेश सोनुने.: आचार संहिता नियमावलीनुसार भारत भर लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र आचारसंहिता लागू आहे. या अनुषंगाने रोख, दारू, दागिने आणि इतर मोफत वस्तूंच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्तात स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले. याअनुषंगाने चिखली पोलिसांच्या हद्दीतील मेहकर फाटा येथे एक चेक पोस्ट तैनात आहे. या चेक पोस्टवर एका चारचाकी क्र ५२१२ या वाहनातून १० लाख ४८ हजार ६०० रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहकर फाटा पॉईंटवरील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात असलेल्या चेक पोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथकाने १२ एप्रिल रोजी एमएच-४४- एस-५२१२ या वाहनास थांबून तपासणीतपासणीत वाहनाच्या डिक्कीतील एका खाकी रंगाच्या बॅगमध्ये १० लाख ४८ हजार ६०० रुपये रोख आढळून आले. या रकमेबाबत वाहन चालक-मालक पांडूरंग बाजीराव जायभाये (रा. सोनुशी, ता. सिंदखेडराजा) यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व रोख रकमेबाबत कोणतेही आवश्यक दस्तऐवज सादर न केल्याने पथकाने पंचासमक्ष रक्कम जप्त केली आहे. दरम्यान, जप्त रक्कम सीलबंद पेटीमध्ये ठेवून नायब तहसीलदार तथा नोडल अधिकारी आचारसंहिता कक्ष संतोष मुंडे यांच्या निगराती ठेवण्यात आले आहे. मुंडे यांनी स्थिर सर्वेक्षण पथकाने जप्त केलेली रोख रक्कम जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे जमा करून घेण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.

कागदोपत्री नव्हे तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा....नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या... मा.आमदार विजयराज शिंदे यांची मागणीमोताळा: बुलढाणा जिल्ह्यात मागील चार दिवसांत काही ठिकाणी अकस्मात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अतोनात नुकसान झाले आहे व तोंडाशी आलेला रब्बी हंगामाचा घास हिरावला गेला आहे. मोताळा तालुक्यात देखील काल शुक्रवार रोजी अकस्मात जोरदार पाऊस व गारपीट होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तालुक्यातील कोथळी, वडगांव खं,अंत्री, पुन्हई,खरबडी, जनुना ई गावांत मका, ज्वारी,कांदा बी, भाजीपाला या उभ्यापिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची अंत्री गावात भाजपा लोकनेते मा.आमदार विजयराज शिंदे यांनी आज दि. १३ एप्रिल २०२४ रोजी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.झालेली गारपीट एवढी भयावह होती की लिंबूचा आकारीच्या गारांनी ढिगच्या ढीग साचल्या गेल्या गावातील विजेच्या तारा तुटल्याने गावे अंधारात आहे.गावातील अनेक घरावरचे टिनपत्रे उडाली असून संसार उघड्यावर आले आहे. या सर्व नुकसानीची विजयराज शिंदे यांनी पाहणी करून आढावा घेतला व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धिर दिलावडगांव खंडोपंत येथील शेतकरी व नुकसानग्रस्त गावकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी विजयराज शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. यावेळी महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी श्री हिंगे, ग्रामसेवक श्रीमती सपकाळ , कृषि सहाय्यक यांच्याशी चर्चा करून कार्यालयात बसून कागदोपत्री नव्हे तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. मा.आमदार विजयराज शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला."ज्वारी व मका पिकाचे नुकसान भयावह असून शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ या नुकसानीने आणली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत मिळावी" अशी मागणी सुद्धा प्रसिद्धी माध्यमाद्वारे विजयराज शिंदे यांनी शासनाकडे केली आहे. या पाहणीच्या वेळी भाजपा तालुका सरचिटणीस सचिन शेळके, गणेशभाई जवरे, ज्ञानेश्वर साबे, माजी सरपंच श्रीकृष्ण सुरडकर, बळीराम सातपुते, अनंता शिंदे, तानाजी जवरे यांसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

*खा. जाधव व आ. अँड फुंडकर यांनी गुरुद्वारात प्रार्थना करून शिख बांधवांना दिल्या वैशाखीच्या शुभेच्छा* *खामगाव* ::- ( मधुकर पाटील) महायुतीचे बुलढाणा लोकसभेचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव व आ अँड आकाश फुंडकर यांनी गुरुद्वारा येथे प्रार्थना करून पवित्र वैशाखी सणाच्या शिख बांधवांना शुभेच्छा दिल्या. आज 13 एप्रिल शिख बांधवांच्या महत्त्वाचा सण म्हणजे वैशाखी. या दिवसापासून शिख शिख बांधवांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते .तसेच आज पासून पंजाबसह संपूर्ण भारतात रब्बी पिकाची कापणी केली जाते. ऋतू परिवर्तन म्हणून सुद्धा या दिवसाला महत्त्व आहे. यासह शिख बांधवांचे दहावे गुरु गोविंदसिंहजी यांनी सन 1699 ला शिख बांधवांसाठी महत्त्वाच्या अशा खालसा पंथची स्थापना केली होती. असे अनेक महत्त्व असलेल्या शिख बांधवांच्या या वैशाखी सणा निमित्त महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव व आ. अँड आकाश फुंडकर यांनी स्थानिक गुरुद्वारा येथे जाऊन माथा टेकून प्रार्थना करीत शिख बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच गुरुद्वारा येथे विशेष प्रार्थना म्हणजे अरदास चा लाभ सुद्धा दोन्ही नेत्यांनी मनोभावे घेतला. उपस्थित सर्व शिख बांधवांच्या भेटी घेऊन खासदार प्रतापराव जाधव व आ अँड आकाश फुंडकर यांनी त्यांना शुभेच्छा देत आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी खामगाव गुरुद्वारा सभेच्या वतीने खासदार प्रतापराव जाधव व आ अँड आकाश फुंडकर यांचा सत्कार करण्यात आला.

जय हो बळीराजा मित्र मंडळ पानपोईचा शुभारंभ---मालेगाव_ नरेश अग्रवाल....गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पान पोई चे उद्घाटन आमदार अमित झनक यांच् करण्यात आले आहे ऊन्हाची दहाकता पाहता पाणी पिणी जीव होतो यासाठी जयहो बळिराजा मीञ मंडळाच्यावतीने*माननीय आमदार अमित भाऊ झनक यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले तर यासाठी माननीय सरनाईक साहेब डॉक्टर निलेश भाऊ मानधने व काँग्रेस कमिटीचे पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उन्हाळ्याच्या तहानलेल्या लोकाला लोकांची तहान भागवण्याकरिता जय हो बळीराजा मित्र मंडळ मालेगाव यांच्या वतीने पाणपोई लावण्यात आली आहेनागरीकांची तहान भागणार - डॉ मानधनेसामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभागयाप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ श्याम गाभने पंचायत समिती सभापती मधुकर मामा काळे डॉ निलेश मानधने रविकुमार भुतडा सूर्यभान पाटील जोगदंड राजकुमार पाटील दहात्रे सुरेश शिंदे बबनराव चोपडे अरुण बळी खरेदी विक्री अध्यक्ष भगवानराव शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन शिंदे सुभाष वाझुळकर प्रवीण पाटील उत्तम सिंग नाईक यांच्यासह बळीराजा मित्र मंडळाच्या इतर सदस्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आमदार झनक यांच्या हस्ते फीत कापून या पानपोळीचे उ‌द्घाटन करण्यात आले या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या पाणपोई मुळे नागरिकांची ग्राहकांची व प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची सुविधा झाली आहे

आता सापडणार हरवलेली मुले.मुंबई (अशोक चव्हाण)प्रोजेक्ट चेतना या संस्थेचा शाळेशी करारगतीमंद दिव्यांग यांना कुठल्याच प्रकारचे सामाजंश्य नसते ते केव्हाही कुठेही नीधुन जातात असे प्रकार आपण नेहमीच एकतोयावर आता प्रोजेक्ट चेतना या संस्थेने गतीमंद शाळेसोबत करार केला असुन सर्व विद्यार्थ्यांना गळ्यात घालण्याचे लाॅकेट क्युआर कोडाअसलेले लाॅकेट दिले आहेतयामुळे गतीमंद मुले हरविले असल्यास शौधण्यास मदत होईलया लाॅकेट च्या माध्यमातुन नुकताच एका गतीमंद मूलाचा शोध घेण्यास मुंबई पोलिसांना मदत झाली आहेकुलाबा येथे एक गतिमंद मुल बेस्ट बस मध्ये एकटाच होता त्याला वाहकाने पोलिसांना दिले कुलाबा पोलिस स्टेशन चे ऊपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांच्या पथकामध्ये राहुल नीमीष्टे,दिपक देशमुख,यांनी विचारणा केली असता त्याला काहिच सांगता येत नव्हते ओळख पटविण्यासाठी काही आहे का? हे शोधत असता त्याच्या गळ्यातील लाॅकेट दिसले, त्या लाॅकेटमध्ये त्यांना क्युआर कोड दिसला व स्कॅन करताच प्रोजेक्ट चेतना या संस्थेचा तपशिल समोर आला यासंस्थेशी संपर्क करित त्याचा पासवर्ड आयडी च्या आधारे त्या मुलाची संपुर्ण माहिती ऊपलब्द झाले व तो मुलगा त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केला

हिंगनी बु. येथे भर उन्हाळ्यात केळी पिकाची लागवड प्रयोगशील शेतकरी सचिन कोरडे यांचा नवीन प्रयोग (मनोज भगत) तेल्हारा प्रतिनीधीनेहमी वेगवेगळ्या पीक लागवड करिता जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या प्रयोगशील शेतकरी सचिन कोरडे पाटील यांनी आपल्या शेतात भर उन्हाळ्यात केळी पिकाची लागवड केली असून त्यांच्या या नवीन प्रयोगाला पाहण्याकरता तेल्हारा येथील तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत व राठी कृषी सेवा केंद्राचे संचालक विनयसेट राठी यांनी भेटी दिल्या आहेत.प्रत्येक फळाला एक विशिष्ट्य सिझन हा ठरलेला आहेच. पण केळी हे असे फळ आहे जे बाराही महिने बाजार पेठेत उपलब्ध असते. त्या तुलनेत आंबा, द्राक्षे, टरबूज, सीताफळ यांना एक विशिष्ट्य कालावधी आहे. त्यामुळे केळीची लागवड ही केव्हाही करता येते. यासाठी आवश्यक आहे ते बाजारपेठेचा अभ्यास करणे. सचिन कोरडे पाटील यांनी सांगितले की यासाठी टिश्युकल्चर हा प्रकार निवडावा ,जेणे करून खात्रीशीर कळ धारणा व झटपट उत्पन्न मिळते. तेल्हारा तालुका हा केळी पिकासाठी सर्वात आघाडीचे तालुका आहे. प्रत्येकांनी ठराविक एकाच सिझनला केळी पिकाची लागवड केल्यास सर्वांचा माल एकाच वेळी बाजारात विक्रीस दाखल होणार आहे. त्यामुळे योग्य दर मिळणार नाही. असे मनोगत सचिन कोरडे पाटील यांनी यावेळी मांडले. बाजारपेठेचे गणित कोलमडल्यावर शेतकऱ्यां चेच नुकसान होणार आहे. त्यामुळे केळी ही उन्हाळी हंगामातही लागवड केली तरी फायद्याचीच राहणार आहे.उपलब्ध पाणीसाठ्याच्या जोरावर या हंगामात केळीची लागवड केली जाते. त्यामुळे योग्य मशागत आणि लागवडीसाठी पुरेसा वेळही शेतकऱ्यांच्या हाती असतो. साधारण मार्च, एपिल , मे व जून हे चार महिन्यात लागवड करता येते. या महिन्यात तापमान हळूहळू वाढत असते. तसेच थोड्याफार प्रमाणात दमट हवामान असते जे रोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते व जमिनी लवकर वाफस्यामध्ये येतात. उन्हाळी लागवडीची बाग ही पुढच्या वर्षी उन्हाळयातच काढावयास येते व दुसरे कोणतेही फळ बाजारात विक्रीस नसल्या कारणाने बाजारभाव देखील चांगला मिळतो. तीन्ही हंगामात केळीची लागवड करता येत असली तरी बाजारपेठेत काय दर आहेत य़ावरही बरीच समीकरणे अवलंबून असतात.उन्हाळ्यात केळी पिकाची शेतात लागवड करावयाची असल्यास केळीचे रोपाचे उन्हापासून संरक्षण करण्याकरता हिरवळीचे खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने बोरू हिरवळीच्या पिकांची लागवड करायला हवी.हिरवळीची पिके फुलोरा येण्यापूर्वी जमिनीत गाडल्या पासून मुख्य अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय घटकांचा पुरवठा जमिनीस होतो. जमिनीचा पोत टिकविणे आणि उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीची खते,बोरू महत्त्वाची आहेत यामुळे केळीच्या आजूबाजूला सचिन कोरडे पाटील यांनी बोरू ची लागवड केली आहे. *उन्हाळ्यात केळी पिकाची लागवड 6 बाय 5 या अंतरावर तर बोरू लागवड केळी झाडापासून एक फूट लांबीवर करण्यात यावी. केळी या पिकाला उन्हापासून संरक्षणा साठी बोरू लागवड करण्यात येते. एप्रिल महिन्यात लागवडीचं कारण यावेळेस केळी पिकाला फार कमी पाणी लागते. व पुढील हंगामात केलेला चांगला भाव मिळतो*. *सचिन कोरडे पाटील* प्रयोगशील शेतकरी*तेल्हारा तालुक्यात केळी पीक अतिशय महत्त्वाचे, शेतकऱ्यां ना अधिक उत्पन्न देणारे पीक आहे. उन्हाळ्या त शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केल्यास कृषी विभागातर्फे त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल*.

*तालुका रुग्णालयातील अस्थिव्यंग संबंधित दिव्यांग बोर्ड बुधवारी बंद राहणार* *खामगाव* (शेखर तायडे) दि.१२ खामगाव तालुक्यातील तसेच घाटाखालील सर्व शासकीय रुग्णालयातील प्रत्येक बुधवारी अस्थीव्यंग संबंधित दिव्यांग बोर्ड बुधवार दि.१७ एप्रिल २०२४ रोजी श्रीराम नवमी निमित्त शासकीय सुट्टी असल्याने बंद राहणार आहे. तसेच इतर प्रत्येक बुधवारी अस्थीव्यंग संबंधित दिव्यांग बोर्ड नियमित सुरू राहील.तरी अस्थीव्यंग संबंधित दिव्यांग तपासणीसाठी येऊ नये असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय खामगाव यांनी केले आहे.

Load More
That is All