लाखोची रोकड पकडली,नोडल अधिकारी मुंडेच्या पथकानेचिखली .गणेश सोनुने.: आचार संहिता नियमावलीनुसार भारत भर लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र आचारसंहिता लागू आहे. या अनुषंगाने रोख, दारू, दागिने आणि इतर मोफत वस्तूंच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्तात स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले. याअनुषंगाने चिखली पोलिसांच्या हद्दीतील मेहकर फाटा येथे एक चेक पोस्ट तैनात आहे. या चेक पोस्टवर एका चारचाकी क्र ५२१२ या वाहनातून १० लाख ४८ हजार ६०० रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहकर फाटा पॉईंटवरील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात असलेल्या चेक पोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथकाने १२ एप्रिल रोजी एमएच-४४- एस-५२१२ या वाहनास थांबून तपासणीतपासणीत वाहनाच्या डिक्कीतील एका खाकी रंगाच्या बॅगमध्ये १० लाख ४८ हजार ६०० रुपये रोख आढळून आले. या रकमेबाबत वाहन चालक-मालक पांडूरंग बाजीराव जायभाये (रा. सोनुशी, ता. सिंदखेडराजा) यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व रोख रकमेबाबत कोणतेही आवश्यक दस्तऐवज सादर न केल्याने पथकाने पंचासमक्ष रक्कम जप्त केली आहे. दरम्यान, जप्त रक्कम सीलबंद पेटीमध्ये ठेवून नायब तहसीलदार तथा नोडल अधिकारी आचारसंहिता कक्ष संतोष मुंडे यांच्या निगराती ठेवण्यात आले आहे. मुंडे यांनी स्थिर सर्वेक्षण पथकाने जप्त केलेली रोख रक्कम जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे जमा करून घेण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0