कागदोपत्री नव्हे तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा....नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या... मा.आमदार विजयराज शिंदे यांची मागणीमोताळा: बुलढाणा जिल्ह्यात मागील चार दिवसांत काही ठिकाणी अकस्मात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अतोनात नुकसान झाले आहे व तोंडाशी आलेला रब्बी हंगामाचा घास हिरावला गेला आहे. मोताळा तालुक्यात देखील काल शुक्रवार रोजी अकस्मात जोरदार पाऊस व गारपीट होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तालुक्यातील कोथळी, वडगांव खं,अंत्री, पुन्हई,खरबडी, जनुना ई गावांत मका, ज्वारी,कांदा बी, भाजीपाला या उभ्यापिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची अंत्री गावात भाजपा लोकनेते मा.आमदार विजयराज शिंदे यांनी आज दि. १३ एप्रिल २०२४ रोजी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.झालेली गारपीट एवढी भयावह होती की लिंबूचा आकारीच्या गारांनी ढिगच्या ढीग साचल्या गेल्या गावातील विजेच्या तारा तुटल्याने गावे अंधारात आहे.गावातील अनेक घरावरचे टिनपत्रे उडाली असून संसार उघड्यावर आले आहे. या सर्व नुकसानीची विजयराज शिंदे यांनी पाहणी करून आढावा घेतला व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धिर दिलावडगांव खंडोपंत येथील शेतकरी व नुकसानग्रस्त गावकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी विजयराज शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. यावेळी महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी श्री हिंगे, ग्रामसेवक श्रीमती सपकाळ , कृषि सहाय्यक यांच्याशी चर्चा करून कार्यालयात बसून कागदोपत्री नव्हे तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. मा.आमदार विजयराज शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला."ज्वारी व मका पिकाचे नुकसान भयावह असून शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ या नुकसानीने आणली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत मिळावी" अशी मागणी सुद्धा प्रसिद्धी माध्यमाद्वारे विजयराज शिंदे यांनी शासनाकडे केली आहे. या पाहणीच्या वेळी भाजपा तालुका सरचिटणीस सचिन शेळके, गणेशभाई जवरे, ज्ञानेश्वर साबे, माजी सरपंच श्रीकृष्ण सुरडकर, बळीराम सातपुते, अनंता शिंदे, तानाजी जवरे यांसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
byदिव्यांग शक्ती
-
0