*खा. जाधव व आ. अँड फुंडकर यांनी गुरुद्वारात प्रार्थना करून शिख बांधवांना दिल्या वैशाखीच्या शुभेच्छा* *खामगाव* ::- ( मधुकर पाटील) महायुतीचे बुलढाणा लोकसभेचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव व आ अँड आकाश फुंडकर यांनी गुरुद्वारा येथे प्रार्थना करून पवित्र वैशाखी सणाच्या शिख बांधवांना शुभेच्छा दिल्या. आज 13 एप्रिल शिख बांधवांच्या महत्त्वाचा सण म्हणजे वैशाखी. या दिवसापासून शिख शिख बांधवांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते .तसेच आज पासून पंजाबसह संपूर्ण भारतात रब्बी पिकाची कापणी केली जाते. ऋतू परिवर्तन म्हणून सुद्धा या दिवसाला महत्त्व आहे. यासह शिख बांधवांचे दहावे गुरु गोविंदसिंहजी यांनी सन 1699 ला शिख बांधवांसाठी महत्त्वाच्या अशा खालसा पंथची स्थापना केली होती. असे अनेक महत्त्व असलेल्या शिख बांधवांच्या या वैशाखी सणा निमित्त महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव व आ. अँड आकाश फुंडकर यांनी स्थानिक गुरुद्वारा येथे जाऊन माथा टेकून प्रार्थना करीत शिख बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच गुरुद्वारा येथे विशेष प्रार्थना म्हणजे अरदास चा लाभ सुद्धा दोन्ही नेत्यांनी मनोभावे घेतला. उपस्थित सर्व शिख बांधवांच्या भेटी घेऊन खासदार प्रतापराव जाधव व आ अँड आकाश फुंडकर यांनी त्यांना शुभेच्छा देत आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी खामगाव गुरुद्वारा सभेच्या वतीने खासदार प्रतापराव जाधव व आ अँड आकाश फुंडकर यांचा सत्कार करण्यात आला.
byदिव्यांग शक्ती
-
0