आरटीईची नोंदणी आॅनलाईन आजपासुनखामगाव:( शेखर तायडे) बुलढाणा जिल्ह्यातील १४०० शाळांपैकी २२७ शाळांनी आरटीईची ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली. ती पूर्ण झाल्यानंतरही पालकांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख ठरली असून, १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वंचित व दुर्बल घटकांतील मुला मुलींसाठी शिक्षण हक्क कायदा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम २००९ अन्वये कलम १२ (एफ) (सी) नुसारप्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला- मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद शासनाने केली आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील आरटीई पात्र शाळांना नोंदणी बंधनकारक होती. आरटीई पात्र शाळांनी नोंदणी केली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याबाबतचे पत्र सोमवारीच पाठविले. त्यानुसार १६ एप्रिलपासून आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या २२७ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post