*ना ना मुंदडा विद्यालय पतसंस्थेच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन* मालेगाव (नरेश अग्रवाल) दि 13/04/2023 रोजी ना. ना. मुंदडा विद्यालय पगारदार सेवकांच्या पतसंस्थेच्या वतीने गांधी चौक, मालेगाव येथे पाणपाईचे उद्धाटन ना. ना. मुंदडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री आशिषजी मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. *जल म्हणजे जीवन* या उक्ती प्रमाणे तहानलेल्या प्रवाशांना शीतल जल देवून तृप्त करण्याचा मानस मनासी बाळगून पाणपोईचे उद्धाटन करण्यात आले. 'पाणपोई' म्हणजे शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. ऊन्हाळ्याच्या दिवसात ऊन्हातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तहान भागविण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे सामाजिक जाणीव जीवंत असल्याचे लक्षण आहे. 'पाणपोई' हा एक सामाजिक उपक्रम असून तहानलेल्या वाटसरूंना पाणी पाजणे हे एक सामाजिक काम आहे. पाणपोईचे उद्धाटन प्रसंगी ना. ना. मुंदडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री आशिषजी मुंदडा, संचालक श्री अभिषेकजी मुंदडा, प्राचार्य श्री दिनेशजी उंटवाल, माजी उपप्राचार्य श्री श्रीकिसनजी मानधने सर, प्रतिष्ठित नागरिक श्री प्रेमरतनजी भुतडा, श्री प्रवीणजी काबरा, जेष्ठ शिक्षक श्री श्रीरामजी रोडे, प्रा अनंतराव गायकवाड, श्री राजेश कराळे, पतसंस्था अध्यक्ष प्रा. अनिल काळे, उपाध्यक्ष श्री संदीप सावले, प्रा अरविंद पिंपळकर आणि प्रा अंकुश सोमाणी श्री आशिष तिवारी असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post