भोपळे विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंती समारोहाचे आयोजन (मनोज भगत) तेल्हारा हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या समारोहाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, संस्थेचे हितचिंतक धैर्यशील भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे हे होते. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या जीवनकार्यावर भाषणे दिलीत. या दिनाचे औचित्य साधून नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या कु.आयुषी गजानन केदार तसेच NMMSE शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी चैताली श्रीकृष्ण काईगें, पायल सुनील शेगोकार,नमन जयानंद वानखडे,अजय रवींद्र पांडे,प्रज्वल प्रभुदास ताळे,दर्शन सुरेश इंगळे,गायत्री राजू ताळे,रोशन सिद्धार्थ वाकोडे व श्रद्धा रामा भोंडे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव पत्र देऊन कौतुक करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून श्यामशील भोपळे यांनी महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन शालेय जीवनात वाटचाल करावी,असा संदेश दिला. या समारोहाचे संचालन कु.उषा खंडेराव व कल्याणी उंबरकार ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत भोपळे यांनी केले. यावेळी शाळेचे जेष्ठ शिक्षक रंजित राठोड यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षक –शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी समारोहाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post