निकाल येण्यापुर्वी शासकीय कागदपत्रांची जुळवाजुळव करा खामगाव : आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानुषंगाने लागणारी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे. पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाले आहे. आपले सरकार केंद्र, सेतू सुविधा केंद्र सि एस सी मार्फत ऑनलाइन अर्ज तहसील स्तरावर सादर करण्यासाठी केंद्रावर गर्दी होत आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र यासह इतर कागदपत्र काढून ठेवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जात आहे. यासाठी आपले व आपल्या पाल्याचे आधार कार्ड,रेशनकार्ड,शाळेची टिसी,फोटो,पॅन,ओळखपञ,आवश्यकता असल्यास प्रतिज्ञा लेख ओरिजनल व झेराॅक्स प्रतसह प्रवेशावेळी अडचण नको म्हणून आतापासूनच कागदपत्रे काढून ठेवणे गरजेचे आहे आधिच ऊन्हाचा तडाखा वाढल्याने वेळ असल्यामुळे आपली कागदपञे तयार ठेवावीत.
byदिव्यांग शक्ती
-
0