नागोठाणेचे सुपुत्र संदीप गुरव यांची चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड बीच पॅरावॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड नागोठाणे रायगड (दिव्यांग शक्ती) :- ३० मे २०२४ ते B २ जून २०२४ रोजी दरम्यान चॉन्ग्किंग इन युन्यांग, चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड बीच पॅरावॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघामध्ये देशभरातील सहा खेळाडूंची निवड झाली असून यात महाराष्ट्रातील न छञपती शिवरायांची भुमी रायगड येथील नागोठण्याचे सुपुत्र शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त संदीप गुरव यांची निवड झाली आहे. यामुळे नागोठणे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वर्ल्ड बीच पॅरावॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघामध्ये संदीप गुरव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.संदीप गुरव यांनी आतापर्यंत जिद्दीच्या जोरावर तलवारबाजी खेळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सर्वोच्च असा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळविलेला आहे. व्हीलचेअर तलवारबाजी मध्ये हा पुरस्कार मिळवणारा महाराष्ट्राचा पहिला खेळाडू असल्याने नागोठणेसह रायगडच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला होता. आतापर्यंत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी तलवारबाजी व विविध खेळांमध्ये अनेक पदके संपादित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाकडून २०१२ सालातील गुणवंत खेळाडू म्हणून, तर रायगड जिल्हा परिषदे कडून मानाचा असा रायगड भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post