जेष्ठ पञकार जगदिश अग्रवाल यांच्या वाढदिवसानीमीत्य हाडांचे गर्भवती मातांचे शिबीर ......खामगाव ( मघुकर पाटिल)सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पञकार दिव्यांग बांधवासाठी सतत मार्गदर्शक असलेले जगदिशजी अग्रवाल यांच्यावाढदिवसाचे औचीत्य साधत २मे २०२४ गुरवार रोजी हाडांचे व गर्भवती मांतांच्या तपासणी व ईतर विकाराचे शिबीर आयोजित करण्यात आले आहेया शिबिरामध्ये अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करुन सल्ला व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये बी.एम.डी. टेस्ट म्हणजे हाडाच्या ठिसूळतेची मशीनद्वारे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच एक्स-रे आणि गर्भवती मातांची सोनोग्राफी तपासणी शुल्क मध्ये 50% सूट राहील. तरी संबंधित रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटल नांदुरा रोड डाॅ थेटे हाॅस्पिटलच्या बाजुला खामगाव येथे मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष व सर्व पत्रकार पदाधिकारी तसेच दिव्यांग शक्ती च्यावतिने करण्यात आले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0