*मातंगपुरी पुनर्वसन संबंधित प्रलंबित मागणीचा विचार करूनच मतदान करा.: गोपाल तायडे.**शेगाव मातंग समाजाच्या मागण्यांना भावी खासदार न्याय देतील का.?* बुलढाणा लोकसभाची निवडणूक होऊ घातली आहे. अनेक आजी माजी उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.अनेक पक्ष अपक्षाचे भावी खासदारांनी आपले वचनामे, जाहीरनामे मतदारांन पुढे ठेवले आहेत. शेतकऱ्यांचे व जणसामान्याचे बुलढाणा जिल्ह्यातील न झालेले काम निवडून आल्या नंतर पूर्ण करण्याची ग्वाही लोकसभाचे उमेदवार देत आहे . बुलढाणा जिल्ह्यातील श्री. संत गजानन महाराज पुण्य भूमी शेगाव येथील विकास आराखडा अंतर्गत करण्यात आलेल्या मांगपुरी पुनर्वसन समस्या कोणत्याही राजकीय पक्षा किंवा नेते पासून लपली नाही.कोणते भावी खाजदार मातंपुरी पुनर्वसन संबंधी ब्र शब्द ही बोलले नाही.शेगाव शहरात मातंग समाजाचा मोठा मतदाता वर्ग आहे.पाच वर्षा अगोदर पासून मातंगपुरी पुनर्वसन या गोळ नवा खाली मातंग समजला शहरातील केंद्र स्तन असलेल्या श्री. गजानन महाराज मंदिरा जवळ असलेल्या जागेतून कट कारस्थान करून( दीडशे वर्षांपासून राहत असलेला मातंग समाजाला अतिक्रन धारक. ) करून गावा कुसा भायेर तुटपुंज्या सदनिका बांधून देण्यात आले ज्या जागेतून मातंग समजला अतिक्रमन धारक म्हणून उठून देण्यात आले त्या जागेची किंमत मुबईच्या नरिमन पॉईंट, मंत्रालय परिसरातील जागे सामान आहे.मातगंपुरी पुनर्वसीत कुटुंबीयांना अत्यंत निष्कृष्ट दरज्याचे सदनिका पाचशे स्केअर फुट एवढ्या जागेत देण्यात आले. पुनर्वसित ठिकाणी सुविधाचा मोठा अभाव आहे. सदनिकेचा (7/12, 8अ ) अजून पर्यंत देण्यात आलेला नाही.,सदनेकेची नोद नजुल कार्यलयात नाही.काही मालकी धारकांना जागेचा मोबदला देण्यात आला नाही.पुनर्वसन कायद्यानुसार प्रकल्प ग्रस्त प्रमाण पत्र नाही, निकृष्ट दर्जाच्या सदनिकेची झालेल्या पळझळीची दुरुस्ती नाही. तपसनी नाही., शासन प्रशासननाला सहकार्य केल्याने घरपट्टी, पाणी पाणी पट्टी माफी नाही, मागणी नुसार दोन लाख.सहानुग्रह मदत नाही.पूर्वसित कुटूंबीयांना रोजगार नाही.मातंगपुरीत काही कुटीबियांना घरे असूनसिद्धा त्यांना अजून पर्यंत घेरे नाही.पुनर्वसित जागेत प्राथमिक शाळा, अंगणवाळी, नाल्या, चेंबर स्ट्रेट लाईट, गार्डन, सभागृहाची दुरुस्ती या सर्व सुविधा पूर्ण नाहीत. डॉ. अण्णाभाऊ साठे सौंदर्यकरण करण्यात आले नाही , लहुजी वस्ताद साळवे पुतळा असवीण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला नाही. मातंगपुरी पुनर्वसीत कुटुंबीयांच्या या प्रलंबित मागण्यांना भावी खासदार न्याय देतील का.? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोपाल तायडे यांनी उपस्तित केला असून. मातंगपुरी पुनर्वसित कुटुंबीय या प्रलंबित मागण्या चा विचार करूनच मतदान करतील.असे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0