हिंगनी बु. येथे भर उन्हाळ्यात केळी पिकाची लागवड प्रयोगशील शेतकरी सचिन कोरडे यांचा नवीन प्रयोग (मनोज भगत) तेल्हारा प्रतिनीधीनेहमी वेगवेगळ्या पीक लागवड करिता जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या प्रयोगशील शेतकरी सचिन कोरडे पाटील यांनी आपल्या शेतात भर उन्हाळ्यात केळी पिकाची लागवड केली असून त्यांच्या या नवीन प्रयोगाला पाहण्याकरता तेल्हारा येथील तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत व राठी कृषी सेवा केंद्राचे संचालक विनयसेट राठी यांनी भेटी दिल्या आहेत.प्रत्येक फळाला एक विशिष्ट्य सिझन हा ठरलेला आहेच. पण केळी हे असे फळ आहे जे बाराही महिने बाजार पेठेत उपलब्ध असते. त्या तुलनेत आंबा, द्राक्षे, टरबूज, सीताफळ यांना एक विशिष्ट्य कालावधी आहे. त्यामुळे केळीची लागवड ही केव्हाही करता येते. यासाठी आवश्यक आहे ते बाजारपेठेचा अभ्यास करणे. सचिन कोरडे पाटील यांनी सांगितले की यासाठी टिश्युकल्चर हा प्रकार निवडावा ,जेणे करून खात्रीशीर कळ धारणा व झटपट उत्पन्न मिळते. तेल्हारा तालुका हा केळी पिकासाठी सर्वात आघाडीचे तालुका आहे. प्रत्येकांनी ठराविक एकाच सिझनला केळी पिकाची लागवड केल्यास सर्वांचा माल एकाच वेळी बाजारात विक्रीस दाखल होणार आहे. त्यामुळे योग्य दर मिळणार नाही. असे मनोगत सचिन कोरडे पाटील यांनी यावेळी मांडले. बाजारपेठेचे गणित कोलमडल्यावर शेतकऱ्यां चेच नुकसान होणार आहे. त्यामुळे केळी ही उन्हाळी हंगामातही लागवड केली तरी फायद्याचीच राहणार आहे.उपलब्ध पाणीसाठ्याच्या जोरावर या हंगामात केळीची लागवड केली जाते. त्यामुळे योग्य मशागत आणि लागवडीसाठी पुरेसा वेळही शेतकऱ्यांच्या हाती असतो. साधारण मार्च, एपिल , मे व जून हे चार महिन्यात लागवड करता येते. या महिन्यात तापमान हळूहळू वाढत असते. तसेच थोड्याफार प्रमाणात दमट हवामान असते जे रोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते व जमिनी लवकर वाफस्यामध्ये येतात. उन्हाळी लागवडीची बाग ही पुढच्या वर्षी उन्हाळयातच काढावयास येते व दुसरे कोणतेही फळ बाजारात विक्रीस नसल्या कारणाने बाजारभाव देखील चांगला मिळतो. तीन्ही हंगामात केळीची लागवड करता येत असली तरी बाजारपेठेत काय दर आहेत य़ावरही बरीच समीकरणे अवलंबून असतात.उन्हाळ्यात केळी पिकाची शेतात लागवड करावयाची असल्यास केळीचे रोपाचे उन्हापासून संरक्षण करण्याकरता हिरवळीचे खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने बोरू हिरवळीच्या पिकांची लागवड करायला हवी.हिरवळीची पिके फुलोरा येण्यापूर्वी जमिनीत गाडल्या पासून मुख्य अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय घटकांचा पुरवठा जमिनीस होतो. जमिनीचा पोत टिकविणे आणि उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीची खते,बोरू महत्त्वाची आहेत यामुळे केळीच्या आजूबाजूला सचिन कोरडे पाटील यांनी बोरू ची लागवड केली आहे. *उन्हाळ्यात केळी पिकाची लागवड 6 बाय 5 या अंतरावर तर बोरू लागवड केळी झाडापासून एक फूट लांबीवर करण्यात यावी. केळी या पिकाला उन्हापासून संरक्षणा साठी बोरू लागवड करण्यात येते. एप्रिल महिन्यात लागवडीचं कारण यावेळेस केळी पिकाला फार कमी पाणी लागते. व पुढील हंगामात केलेला चांगला भाव मिळतो*. *सचिन कोरडे पाटील* प्रयोगशील शेतकरी*तेल्हारा तालुक्यात केळी पीक अतिशय महत्त्वाचे, शेतकऱ्यां ना अधिक उत्पन्न देणारे पीक आहे. उन्हाळ्या त शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केल्यास कृषी विभागातर्फे त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल*.
byदिव्यांग शक्ती
-
0