*दिव्यांग व वृद्ध सन्मानाने करीत आहेत मतदान* खामगांव दि.२२: लोकशाही मूल्य प्रति बांधिलकी दर्शवित मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे पार पडावे तसेच देशात सर्वत्र लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना यात दिव्यांग व वृद्ध मतदारांना सन्मानाने मतदान करता यावे यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान करण्याचा हक्क मिळाला असून त्याची सुरुवात खामगांव येथून दि. २१ एप्रिल च्या सकाळी ७:३० वाजता पासून सुरू करण्यात आली असून यात विविध चमूकडून मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावेळी कोणत्याही कारणामुळे एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेत दि.२१ रोजी अती दुर्गम आणि वनांच्छादित असलेल्या कोंती या गावात ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदी पार करून मतदान अधिकारी,विजय रामकृष्ण निमकर्ड मायक्रो ऑब्झरर्वर सचिन क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल उमेश इंगळे व त्या गावचे केंद्रस्तरीय अधिकारी रामकृष्ण पानझडे यांनी श्री.गोपीचंद सदाशिव मोहिते वय ८६ यांना घरपोच मतदान करण्याचा हक्क मिळवून देण्यात आला. खामगाव मतदार संघात खामगाव व शेगाव तालुका येत असून १२० जेष्ठ नागरिक ८३ दिव्यांग असे २०३ असून मतदारांसाठी २१ ते २३ एप्रिल दरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १० पथके तयार करण्यात आली आहेत या पथकामध्ये मतदान केंद्र अध्यक्ष,मतदान अधिकारी,मायक्रो ऑब्झर्वर,पोलीस कर्मचारी,कॅमेरामन,व्हिडिओग्राफर तसेच एकूण १० वाहने कर्तव्य बजावत असून आज दि. २२ रोजी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी,रामेश्वर पुरी यांच्या उपस्थितीत सप्तशृंगी अपार्टमेंट खामगाव येथील शुभदा चिंतामण खेरडे नामक दिव्यांग महिला यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून यावेळी श्री.पुरी यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्यात.यावेळी पोस्टल टपाली नोडल अधिकारी तथा ना. तहसीलदार विजय पाटील ज्येष्ठ नागरिकाचे पोस्टल मतदान चमू क्रमांक ५ पथकातील केंद्रस्तरीय अधिकारी जयेश पुखराज जैन,राहुल दीपकराव पाठक मायक्रोऑब्झर्वर नामदेव प्रभाकर झांबरे व कर्मचारी उपस्थित होते.
byदिव्यांग शक्ती
-
0