प्रतापरावांनी दिव्यांग निधी खर्चे केला नाही नांदेड (विजय चौडेकर) नांदेड -दिव्यांगा साठी असलेल्या विविध शासकीय योजना राबविण्यात येतात, त्यापैकी खासदार निधीतून,लाखो रुपये निधी खर्च करणे बंधनकारक आहे,तो निधी दिव्यांगाना उपकरणे घेऊन वितरीत करणे आवश्यक आहे,तसे केले जात नाही प्रहार दिव्याऺग सऺगठना नांदेड जिल्हा यांच्यावतिने वा ईतरा संघटनेच्यावतिने बरेचं आंदोलन झाले मोर्चा निवेदन देण्यात आले,तरी फक्त आश्वासन दिले गेले ,बाकी काही नाही अंमलबजावणी झाली नाही, आता निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे, जागोजागी सभा,बैठका घेतल्या जात आहेत, आणि सांगतात,मी हे केल ते केल या गावात असा विकास केला, परंतु दिव्यांगाची अपंगांची फक्त थट्टा केली गेली, वित्तीय वर्षात लाखोच्या घरात असलेला निधी ची तरतूद केली आहे,दिव्यांगाना उपकरणे खरेदी करून वितरीत करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समीती गठित करून सार्वजनिक कार्यक्रमात उपकरणे वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, परंतु आज वर नांदेड जिल्हा तील दिव्यांगांवर खर्च झाले नाही अश्या लोकप्रतिनीधीला घरी बसवित जो दिव्यांग हितार्थ प्राधान्याने कार्य करेल अश्या लोकप्रतिधी ला प्रतिनीधीत्व देणे आता गरजेचे झाले आहे यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी एक होत आपल्या हक्काचा आपल्या साठी काम करणारा प्रतिनीधी निवडुन देण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0