युग धर्म पब्लिक स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीखामगाव. (का.प्र.)प्रजास्त्तक गणतंत्र भारत देश निर्मितीचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जी भीम जयंती किंवा समता दिवस साजरी केली जाते . त्यांनी भारताचे पहिले कायदापंडित ,न्यायतज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ आणि थोर समाज सुधारक म्हणून त्यांनी काम पाहिले व सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी संविधान रुपी महान मार्गदर्शक पुस्तक भारतीयांना भेट दिले असे मूल्यवान विचार वक्त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांमध्ये शाळेचे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल सर , सचिव श्री मधुर जी अग्रवाल सर , प्राचार्य सौ मंगला महाजन मॅम तसेच सपकाळ सर आणि पालक वर्गामधून पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ पडोळे मॅम , व. सौ.वाकोडे मॅम हे मान्यवर व्यापीठाची शोभा वाढवित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,माता सरस्वती यांच्या तैलचित्रास माल्यार्पण करून तसेच मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले .तसेच सर्व शिक्षकांनी पुष्प अर्पण करूनअभिवादन केले. आलेल्या मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक मध्ये सौ . स्वाती मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर सखोल प्रकाश टाकला .तसेच शालेय अध्यक्ष गोपाल सरांनी मुलांना सांगितले की बाबासाहेबांसारखी जिद्द अंगी बाळगूळ आपला सर्वांगीण विकास करावा तसेच शाळेच्या प्राचार्या सौ मंगल महाजन मॅडम यांनी मुलांना अनमोल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या सौ .अस्मिता पडोळे मॅम वाकोडे मॅम यांनी सुद्धा बाबासाहेबांविषयी आपले मनोगत व्यक्त केले व मुलांना प्रोत्साहन देत कौतुकाची थाप पाठीवर व आशीर्वादाचा हात मस्तकी ठेवला.अशा प्रकारे शाळेत विविध उपक्रम राबविल्यामुळे मुलांचा सर्वांगीण व बौद्धिक विकास होतो असे ही आवर्जून सांगितले . या प्रसंगी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या ज्यात प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा, ड्रॉईंग ,कोलाज ,निबंध स्पर्धा इत्यादी समावेश होतो.निबंध स्पर्धेमध्ये प्रामुख्याने कृष्णा, हर्षित, यादवी ,प्रणव, अनुष्का, ऋतुजा, सेजल, अजिंक्य शौर्य यांनी बाबासाहेबांबद्दल माहिती सांगितली. बाबासाहेब आणि रमाबाई यांच्या वेशभूषेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ज्यात प्रथम क्रमांक रेयांश ,द्वितीय क्रमांक शिवण्या ,तृतीय क्रमांक नूतन यांनी पटकावला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हर्षित ,द्वितीय क्रमांक अनुष्का ,तृतीय क्रमांक रिया तर बाबासाहेबांच्या जीवन पटावर आधारित कोलाज स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सानवी तर द्वितीय क्रमांक अद्ववेत हा राहिला.ड्रॉइंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक धैर्यशील , द्वितीय अद्वित आणि तृतीय आनंदी टिकार तसेच निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुष्का, द्वितीय क्रमांक हर्षी त, तृतीय क्रमांक यादवी,कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सौ पायल मॅम यांनी आभार प्रदर्शन श्री लोणेसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या सौ. मंगला महाजन मॅम यांच्या नियोजना खाली सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचारी वर्ग, यांनी आपापली भूमिका पार पाडली अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता ही गोड आठवणीच्या रूपात संग्रहित छायाचित्र व चलचित्र स्वरुपात करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post