Showing posts from June, 2024

महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेला मोठे यशराज्यातील सर्व जिल्हा परिषदेत कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळणार सहाय्यक उपकरणे बीड - (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेला मोठे यश प्राप्त झाले असून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना यापुढे स्कूटर विथ अॕडप्शन व सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील व राज्य सचिव परमेश्वर बाबर यांनी गेल्या दहा वर्षापासून मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केलेल्या रीट याचीका 6630 / 2018 च्या निकालाच्या अनुषंगाने दिनांक 28 / 6 / 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित केला. ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी सामाजिक न्याय विभाग व वित्त विभाग यांच्या संमतीने शासन निर्णय निर्गमित केला असून जिल्हा परिषदेत कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्कूटर विथ अॕडप्शन व सहाय्यक उपकरणे मंजूर करण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही व लेखाशीर्ष मंजूर करून दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र लोटन पाटील यांनी परमेश्वर बाबर अव्वरसचिव, मंत्रालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाने गेल्या दहा वर्षापासून औरंगाबाद येथे रीट याचिका दाखल करून पाठपुरावा करून माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत कार्यरत सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्कूटर विथ अॕडप्शन व सहाय्यक तंत्रज्ञान, उपकरणे मिळणार आहेत. याबाबत दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील यांनी न्यायालयाच्या निकालाबाबत सांगितले की, गेल्या दहा वर्षापासून मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे पाठपुरावा करून दिव्यांग कायदा 1995 व दिव्यांग अधिनियम 2016 च्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे जाणे सोयीचे जावे तसेच त्यांना सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे असा निकाल मा. उच्च न्यायालय यांनी दिला. सदर निकालाच्या अनुषंगाने आता जिल्हा परिषदेत कार्यरत सर्व विभागाच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना राज्यात सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे यापुढे उपलब्ध होणार आहेत. दिव्यांग कर्मचारी संघटनेला मिळालेले हे यश फक्त संघटनेचे यश नसून प्रत्येक दिव्यांग कर्मचाऱ्यांचे, प्रत्येक तालुकाध्यक्षांचे, प्रत्येक जिल्हाध्यक्षांचे यश असून त्यात विशेष बाब म्हणून विशाल शिंपी तालुकाध्यक्ष पारोळा यांचे सहकार्य लाभले असे दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी शेवटी म्हटले आहे.

*दिव्यांग तपासणी आता खालच्यामजल्यावर*हिंगोलीहिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात मध्ये दि . 28/06/2020 रोजी सी एस डाॅ नितीन तडस यांच्याशी दिव्यांगाच्या मेडिकल सर्टिफिकेट चे जे बोर्ड ऑफिस वरच्या मजल्यावर आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना वर खाली जाण्यासाठी खूप त्रास होत आहे म्हणून त्यांना एका चर्चेच्या माध्यमातुन विनंती केली की ते दिव्यांग बोर्ड ऑफिस खालच्या मजल्यावर किंवा ग्राउंड फ्लोअरवर करण्यात यावे ही चर्चा झाली त्यांनी लगेच यासाठी तत्काळ दखल घेऊ समोरचे रोडचे काम संपले की लगेच ऑफिस मी खाली घेण्याची व्यवस्था करून द्यायला तयार आहे त्यावेळी उपस्थित दिव्यांग भव्य क्रांती संघटना मराठवाडा विभागीय प्रमुख व हिंगोली जिल्हा अध्यक्ष रंगनाथराव मुटकुळे व दिव्यांग भव्य क्रांती संघटना जिल्हा संपर्कप्रमुख विजय घोडेकर श्री रणवीर साहेब व आदी यावेळी उपस्थित होते

हरी नामाच्या गजरात दिव्यांगाची वारीमनोज भगतअकोला जि प्रश्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट श्रद्धासागर येथून निघालेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर कडे जात असलेल्या वारीमध्ये जिल्हा परिषद नगर खडकी बु. अकोला महाराष्ट्र राज्य दिव्यांग बेरोजगार संघटनाखडकी शाखा अध्यक्ष येथील दिव्यांग पांडुरंगाचे भक्त वारकरी दिव्यांग रवी बोचे हे वारी मध्ये सहभागी झाले असून पंढरपूर पर्यंतचा प्रवास ते आपल्या दिव्यांग गाडीने करीत आहे. त्यांचे सहभागाबद्दल संपूर्ण वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वत्र कौतुक होत आहे. दोन्ही पायाने दिव्यांग असलेले आपल्या संघटनेचे रविभाऊ बोचे हे पंढरपूर पर्यंतचा प्रवास सुखमय जावो .अश्या शुभेच्छा दिव्यांग शक्ती परिवाराच्यावतिने देण्यात आल्या आहेत

हातगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवांनी दिली दिव्यांगांना अपमानास्प वागणुक *** अकोला** मनोज भगत —. मुर्तिजापूर तालुक्यातील सर्वात उत्पन्नाने मोठी असलेली ग्रामपंचायत म्हणजे हातगाव ग्रामपंचायत व ही ग्रामपंचायत विस्ताराने क्षेत्रफळाने ही खूप मोठी ग्रामपंचायत म्हणून मुर्तिजापूर तालुक्यात गणली जाते व या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एमआयडीसी परिसर , पेट्रोल पंप, हॉटेल व इतरही व्यावसायिक संकुलं याच हातगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात या ग्रामपंचायत चा कार्यभार कशा पद्धतीने चालतो याचा विषय आज गटविकास अधिकारी पंचायत समिती मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदना मधून आपल्यासमोर दिसून येत आहे विषय असा की दरवर्षी शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत मधून दिव्यांगांना ५./. टक्के निधी वितरित करण्यात येतो त्या अनुषंगाने ग्रामपंचायत हातगाव कडून गावातील दिव्यांगांना ५./. टक्के निधी मिळावा यासाठी हातगाव येथील दिव्यांग ग्रामपंचायत मध्ये निवेदन देण्याकरता गेले असता त्यावेळी मासिक सभा सुरू होती , सचिवांनी दिव्यांगांना सभागृहात बोलावून दिव्यांगाना तुम्ही आता लेखी निवेदन दिले आहे, तुम्हाला मिळणारा निधी आता मी अकोला येथे वरिष्ठां कडे पाठवतो यापुढे माझ्या कार्यालयात येऊ नका तुम्हाला काय करायचे असेल ते तिकडे करा येथे येऊ नका असे सर्वांसमोर बोलून सचिवांनी निवेदन देणाऱ्या दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक दिली आहे, त्यामुळे दिव्यांगाच्या भावना दुखावल्या असून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या ग्रामसचिवास आपल्या स्तरावरून योग्य समज देण्यात यावा, तसेच हातगाव ग्रामपंचायत मधून दिव्यांगांना मिळणारा ५% टक्के निधी तुटपूंजा न देता नियमानुसार सर्व दिव्यांगाना देण्यात बाबत आज सोमवार दिनांक २४ जून २०२४ रोजी गटविकास अधिकारी मुर्तिजापूर पंचायत समिती यांना निवेदन देतांना लेखी स्वरूपात दिले आहे यावेळी उपस्थित प्रवीण खंडारे, चेतन सातिंगे ,अभिजीत वाघ ,मयुरी कैलास गोपकर ,ओमप्रकाश सराफ, सुधीर कडू ,देवानंद भोरकडे ,मालुबाई सोळंके ,नंदाबाई तेलमोरे ,सुनीता भोरकडे ,लंका बाई इंगळे, शालिग्राम इंगळे ,राजू वानरे ,सुरज वाघमारे ,मायाबाई गोपकर, तुकाराम गोपकर यश गोपकर,, मनीष ढाकूलकर, किशोर सावळे, मालू दाते ,घनश्याम राऊत ,इत्यादींनी या निवेदनावर स्वाक्षरी करून आपले निवेदन मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे.चौकट.मुर्तिजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सचिवांना दिव्यांगाचा ५./. टक्के निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यांनी या कामात हलगर्जीपणा केला असेल त्या ग्रामपंचायत सचिवावर कार्यवाही करण्यात येणार आहे. अशोक बांगर गटविकास अधिकारी यांनी माहिती दीली आहे

शिक्षण विभागात महत्वपुर्ण बदल ......कॅबिनेटने नवीन शिक्षण धोरणाला हिरवा कंदील दिला आहे. ३४ वर्षांनंतर शिक्षण धोरणात बदल झाला आहे. नवीन शिक्षण धोरणाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:**5 वर्ष मौलिक**1. नर्सरी @4 वर्षे2. ज्युनिअर केजी @5 वर्षे3. सीनियर केजी @6 वर्षे4. इयत्ता 1 @7 वर्षे5. इयत्ता 2 @8 वर्षे**3 वर्षे तयारी**6. इयत्ता 3 @9 वर्षे7. इयत्ता 4 @10 वर्षे8. इयत्ता 5 @11 वर्षे**3 वर्षे मध्य**9. इयत्ता 6 @12 वर्षे10. इयत्ता 7 @13 वर्षे11. इयत्ता 8 @14 वर्षे**4 वर्षे माध्यमिक**12. इयत्ता 9 @15 वर्षे13. स्टडी एसएससी @16 वर्षे14. स्टडी FYJC @17 वर्षे15. स्टडी SYJC @18 वर्षे**विशेष आणि महत्त्वाच्या बाबी:**- 12वी इयत्तेतच बोर्ड, एमफिल बंद, कॉलेजची पदवी 4 वर्षांची- 10वी बोर्ड परीक्षा संपली, एमफिलही बंद होणार,- आता 5वी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रभाषेतच शिकवले जाईल. बाकी विषय, जरी तो इंग्रजी असला तरी, एका विषयाच्या रूपात शिकवला जाईल.- आता फक्त 12वी बोर्ड परीक्षा देणे आवश्यक आहे. आधी 10वी बोर्ड परीक्षा अनिवार्य होती, जी आता नसेल.- 9वी ते 12वी इयत्तेपर्यंतच्या सेमेस्टरमध्ये परीक्षा होईल. शालेय शिक्षण 5+3+3+4 फॉर्म्युल्यानुसार शिकवले जाईल.- कॉलेजची पदवी 3 किंवा 4 वर्षांची असेल. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षी सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षी डिप्लोमा, तिसऱ्या वर्षी पदवी.- 3 वर्षांची पदवी त्यांच्यासाठी आहे जे उच्च शिक्षण घेऊ इच्छित नाहीत. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 4 वर्षांची पदवी घ्यावी लागेल. 4 वर्षांची पदवी घेणारे विद्यार्थी एक वर्षात एमए करू शकतील.- आता विद्यार्थ्यांना एमफिल करावे लागणार नाही. एमएचे विद्यार्थी थेट पीएचडी करू शकतील.- 10वीत बोर्ड परीक्षा नसेल.- विद्यार्थी मधल्या काळात अन्य कोर्सेस करू शकतील. उच्च शिक्षणातील सकल नावनोंदणी अनुपात 2035 पर्यंत 50 टक्के होईल. नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखादा विद्यार्थी एका कोर्सदरम्यान दुसरा कोर्स करू इच्छित असेल तर तो एक कोर्स घेऊन दुसरा कोर्स करू शकतो. पहिल्या कोर्समधून मर्यादित कालावधीसाठी ब्रेक घेऊ शकतो.- उच्च शिक्षणातही अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुधारण्यात श्रेणीबद्ध शैक्षणिक, प्रशासकीय आणि वित्तीय स्वायत्तता यांचा समावेश आहे. याशिवाय क्षेत्रीय भाषांमध्ये ई-पाठ्यक्रम सुरू केले जातील. व्हर्च्युअल लॅब्स विकसित केल्या जातील. एक राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू केला जाईल. देशात 45 हजार कॉलेज आहेत.- सरकारी, खासगी, डीम्ड सर्व संस्थांसाठी समान नियम असतील.*आदेशानुसार:शिक्षण मंत्री, भारत सरकार

जिल्हाधिकारी यांच्या पुढकाराने ग्रीन अकोला अंतर्गत पहिले स्वस्तिक पॅटर्न तेल्हारा तहसील मध्ये*स्वस्तिक पॅटर्न अंतर्गत एक हजार झाडांची लागवड प्रतिनिधी तेल्हारा सौ संध्याताई ताथोड तेल्हारा- अकोला जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने अकोला पॅटर्न संपूर्ण जिल्हयात राबण्यात येत असून ग्रीन अकोला संकल्पनेतून तेल्हारा तहसील कार्यालयाच्या उपलब्ध असलेल्या दोनशे फुट जागेवर स्वस्तिक पॅटर्न राबवून किमान एक हजार वृक्षांचे रोपवन तयार करण्यात आले आहे.वृक्ष लागवडीचे स्वस्तिक पॅटर्न मॉडेल तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या पुढाकाराने वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक एस. एस. नाथण यांच्या संकल्पनेतून तयार झाले आहे. अकोला जिल्हातील प्रथम तेल्हारा तहसील कार्यालयात हा प्रयोग राबवण्यात येत आहे. तेल्हारा तहसील चे तहसीलदार यांच्या हस्ते दि. २१ रोजी वृक्षलागवडीला सुरुवात करण्यात आली .पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमान वाढत आहे. ही तापमान वाढ कमी करण्याच्या उद्देशाने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसीलच्या आवारात असलेल्या जागेवर तब्बल एक हजार - वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. सदर संकल्पना ही ऑक्सिजन मॅन ऐ. एस. नाथण यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. या मागचा प्रमुख उद्देश तहसील कार्यालयात आपल्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना भरपुर प्राणवायु व विविध औषधी वनस्पतींचा लाभ व्हावा हाच आहे तेल्हारा तहसील कार्यालयाची इमारत नव्याने बांधण्यात आली असून या ठिकाणी खुली जागा उपलब्ध असल्याने वृक्षलागवडीचे स्वस्तिक पॅटर्न मॉडेल तयार करण्याची संकल्पना आहे, याची सुरुवात येथून झाली आहे. ही झाडे जलसंधारण विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने पुरविली आहेत. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात तेल्हारा तहसील कार्यालय हे जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. या कार्यालयाने राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.यावेळी तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे नायब तहसीलदार विकास राणे मंडळ अधिकारी संजय साळवे शग्मुणा नाथन यांच्या सह तेल्हारा तहसील चे सर्व तलाठी कोतवाल व कर्मचारी उपस्थित होते*चौकट*स्वस्तिक पॅटर्न नेमके काययामध्ये पन्नास पन्नास फुटाच्या आठ बाजू एकमेकांना जोडून दोन फूट लांबीवर एक वृक्ष असे तब्बल वनौषधीं वृक्ष ऑक्सिजन देणारे एक हजार झाडांची लागवड करून स्वस्तिकचा आकार तयार केला जातो.या मॉडेलमध्ये कडूनिंब, शिसम, चिंच, कडु बदाम, सीताफळ, रामफळ, बदाम, अशोक अशा पंचवीस प्रजातीच्या वृक्षांचे रोपवन करण्यात आले आहे. एकाच प्रजातीचे झाडे जवळ जवळ नसतील याची काळजी घेतली आहे -ऐ एस नाथण, वृक्ष क्रांती मिशनजिल्हाधिकारी अकोला यांच्या ग्रीन अकोला इनीशीएटीव्ह या उपक्रमअंतर्गत संपूर्ण अकोला जिल्ह्यात स्वस्तिक पॅटर्न व मियावाकी अशा प्रकारचे वृक्षारोपण सुरू आहे. त्याअंतर्गतच तेल्हारा तहसिल कार्यालय येथे मोकळ्या जागेत स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी लागणारा खर्च हा कर्मचारी यांच्या वर्गणीतून करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन करतो.समाधान सोनोवणे तहसीलदार तेल्हारा यांनी केले आहे

*जिथे विषय गंभीर*.....*तिथे शिवसेना खंबीर* *विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेज संदर्भातल्या सर्व अडचणी सोडविण्याकरिता विद्यार्थी सेना कटीबद्ध असून एका विदयार्थी कडुन टि.सी परत देण्या करता 25000 हजार ची मागनी* करण्यात आली होती... काही दिवसा आधीच विद्यार्थी सेनेने कॉलेज वरती आंदोलन करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला होता. *शिवसेना विदयार्थी सेना शहर प्रमुख विकी कालिदास सारवान व तालुका प्रमुख विशाल देवीदास साटोटे,पकज अंबारे उपशहर प्रमुख यांना एक विदयार्थी नाव सुवेश एकनाथ झाडोकार ह्यानी सविस्तर माहाती दिली की व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ITI काँलेज खामगांव* येथे शिकक्ष टीसी परत मिळवण्याकरिता 25000 हजाराची मागणी करत असल्याचे सांगितले विद्यार्थी सेनेने तिथे जाऊन सरांसोबत बोलून विद्यार्थी गरीब असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर जिथे 25000 लागणार होते विद्यार्थी सेनेमुळे 25000 न भरता त्यांना टीसी परत देण्यात आले म्हणून विद्यार्थिने विद्यार्थी सेनेचे आभार मानले तसेच *शिवसेना कडुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ITI काँलेज खामगांव यांनी शिवसेनेचे विनंतीला मान देऊन टीसी परत केल्याबद्दल आभार मानले.*

*दिव्यांगांना मिळणार आता ६०००/-₹ चंद्रबाबुंंच्या आंध्र प्रदेश सरकार चा महत्वपुर्ण निर्णय**तर महाराष्ट्राच्या मानधनवाढीचा विषय आला समोर*खामगाव (शेखर तायडे) सत्तारुढ झालेले व केंद्रात किंगमेकर ठरलेले किंग चंद्राबाबु नायडु सरकाने महत्वपुर्ण आदेश पारित केले आहेत ज्यामध्ये दिव्यांगंना ६०००/- सह विविध अनुदानात वाढ करण्याचा नीर्णय घेतला आहे ग्रामीण विकास विभाग सामाजिक सुरक्षा पेन्शन (SSP) निवृत्तीवेतनधारकांच्या विविध श्रेणींसाठी विद्यमान पेन्शन रक्कम वाढवणे आणि "NTR भरोसा पेन्शन योजना आदेश जारी" असे या योजनेचे नाव पुनर्संचयित करणे. पंचायत राज आणि ग्रामीण विकास (RD.I) विभाग G.O.Ms.No.43 दिनांक: 13.06.2024 1. G.O.RT.No.67, SW (CV.PCR) विभाग, दिनांक: 06.02.2019. 2. G.O.Ms.No.103, PR आणि RD (RD.I) विभाग, दिनांक: 30.05.2019. 3. G.O.RT. क्र. 551, HM&FW (D2) विभाग, दिनांक: 26.10.2019. 4. G.O.RT.No.664, HM&FW(D2) विभाग, दिनांक: 19.12.2019 5. G.O.Ms.No.96, PR आणि RD (RD.I) विभाग, दिनांक: 21.12.2023. 6. सीईओ, SERP, A.P., विजयवाडा, e_file कडून. क्रमांक SERP- 17021/32/2024-PROJ (कॉम्प. क्रमांक 2466564). मंग-ॲडमिन-SERP, दिनांक: 12.06.2024 समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. समाजातील गरीब आणि असुरक्षित घटक, विशेषत: वृद्ध आणि अशक्त, विधवा आणि अपंग व्यक्ती इत्यादींच्या अडचणी दूर करण्यासाठी निवृत्ती वेतनाची रक्कम वाढवणे हा एक मोठा कल्याणकारी उपाय आहे. 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, सोसायटी फॉर एलिमिनेशन ऑफ रुरल पॉव्हर्टी (SERP) यांनी नोंदवलेल्या परिस्थितीत, वर वाचलेल्या 6व्या संदर्भामध्ये आणि वरील कल्याणकारी उपायांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून, सरकारने, प्रकरणाचा विचार केल्यानंतर, याद्वारे आदेश खालील (a) विद्यमान पेन्शनची रक्कम रु.वरून वाढवणे. OAP, विधवा, विणकर, ताडी टॉपर्स, मच्छीमार, एकल महिला, पारंपारिक मोची, ट्रान्सजेंडर, ART(PLHIV), डप्पू कलाकारांसाठी 3,000/- महिना ते रु. 4,000/- महिना आणि कलाकारांना पेन्शन. (b) अपंग व्यक्तींच्या निवृत्ती वेतनात रु. वरून वाढ करणे. 3,000/- ते रु. 6,000/- सर्व अपंग आणि बहुविकृती कुष्ठरोगी व्यक्तींना ही मानधन वाढ करण्यात आली आहेतर यावाढीची प्रतिक्रीया महाराष्ट्र राज्यातही अभिनंदनीय होत असतांना राज्यातील दिव्यांग मंञालयाचा डांगोरा पिटत आपली पाठ थोपटुन घेणारे शिंदे फडणवीस पवार सरकारलाही निराधार वेतन वाढीसाठी बुद्धी देवो असी ऊपहास्तम्क चर्चा राज्यात सुरु झाली आहे

*खामगाव तहसिलला दाखले प्रलंबित**विद्यार्थी पालकांचे हाल* तर विद्यार्थी संघटना गप्प का? खामगाव (शेखर तायडे)खामगाव तालुक्यातील शालेय विद्यार्थी पालकांचे दाखल केलेले दाखले ज्यामध्ये ऊत्पन्न दाखले,नाॅन क्रिमीलीयर,जातीचे दाखले,अधिवास प्रमाणपञ,नाॅन क्रिमीलीयरचे ऊत्पन्न दाखले,ईडब्लुएस, व ईतर दाखले खामगाव तहसिल अंतर्गत प्रलंबित असल्याने विद्यार्थी पालकांचे आर्थीक,शारिरीक,मानसिक नुकसान होत असल्याचे दिसुन येत आहे तर याविषयी अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता शासन परिपञकाचा आधार धेत दिड महिन्याचा कालावधी सांगित असल्याचे दिसत आहेया दाखल्या करिता सेतु चालक,आॅनलाईन सेंन्टर धारकांशी विद्यार्थी पालकांचे वादविवाद शीवीगाळ होत असल्याचे दिसुन आले आहेआॅनलाईन सेंन्टर धारकांची तहसिलला येरझार्‍यामुळे व पावती पद्धतीमुळे कालावधीचा विलंब लागत असल्याने यावर प्रशासनाने लवकरातलवकर तोडगा काढित तसेच एक कायम लिपीक दाखल्याच्या टेबलवर नियुक्त करण्यात यावा अशी चर्चा यांच्यातुन दिसुन येत आहेतर काही आॅनलाईन सेतुचालक वा केंद्रचालक तहसिल प्रशासनाशी आर्थीक व्यव्हार करित त्यांचे दाखले ते सोडुन घैत असल्याचेही दिसुन आले आहेया अनागोंदी कारभारामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थी असो वा शहरी यांच्यावतीने तहसिल कार्यलयाविषयी रोष निर्माण होत असल्पाचे दिसत आहेतर विषयी विद्यार्थीसाठी आवाज ऊचलणार्‍या संघटना का गप्प आहेत असा सवाल याठिकाणी निर्माण झाला आहे.

हास्यजत्रा फेम चे कुणाल मेश्राम, यांच्या हस्ते मंगलाताई पुंडकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित..अकोला (सौ संध्याताई ताथोड) अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे येथील मंगलाताई पुंडकर प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख अकोला यांना तरुणाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या अकोला जिल्हा साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय युवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी हास्यजत्रा फेम कलावंत कुणाल मेश्राम, प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ संदीप चव्हाण, श्रेष्ठ साहित्यिक प्रा. सतीश तराळ, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख, पत्रकार संजय कमल अशोक, प्रा. देवानंद गावंडे, डॉ. किरण वाघमारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मंगलाताई पुंडकर यांचा सन्मान करण्यात आला.अनेक स्तरावरील पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. आजवर त्यांच्या विवीध कार्य ,, अपंग निराधार, शेतकरी,व गौर गरीबांच्या मदतीसाठी धावून जाऊन सदैव तत्पर असतात,**सामाजिक कार्य व महिला सक्षमीकरण या साठी पण त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत मंगलाताई पुंडकर यांचा सन्मान करण्यात आला होता त्या बद्दल त्यांचे सर्वत्र थरांतून अभिनंदन केले जात आहे.......

पत्रकार किशोर (काका) रूपारेल यांना धमक्या देवून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा पत्रकारांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन : घटनेचा नोंदविला निषेध ....खामगाव : पत्रकार किशोर (काका) रूपारेल यांना धमक्या देवून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करुन कठोर करवाई करण्यात यावी अशी मागणी खामगावतील पत्रकार बांधवांच्या वतीने आज दिनांक 18 जून 2024 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी निदर्शने करून घटनेचा निषेध देखील नोंदविण्यात आला. दरम्यान तहसीलदार अतुल पाटोळे यांनी निवेदन स्वीकारले.    निवेदनामध्ये नमूद आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारांकडून नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम होत आले आहे. मात्र गेल्या काही वर्षात पत्रकारांना धमक्या देवून मुस्कटदाबी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. खामगाव येथील जेष्ठ पत्रकार सांज दैनिक लोकोपचारचे संपादक किशोर काका रूपारेल हे नेहमीच निर्भिड पत्रकारिता करत आले आहेत. दरम्यान 14 जून रोजी त्यांच्या मेन रोडवरील लोकोपचार कार्यालयात 1.30 वाजताच्या सुमारास शहरातील युगधर्म पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांसह 10 ते 12 महिला व पुरूष कर्मचाऱ्यांसह येवून किशोर रूपारेल यांच्यासोबत वाद घालुन शाळेचे संचालक गोपाल अग्रवाल यांच्याबाबत तुम्ही बातमी कशी काय छापली, त्या बातमीत छळ झालेल्या महिलेचे नाव का टाकले नाही, गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लिक स्कुल विरोधात बातमी लावण्याची तुमची हिम्त कशी काय झाली असे प्रश्‍न करून जोरजोरात ओरडून कार्यालयातील टेबल बडवून धमकाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच यानंतर गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लिक स्कूलच्या विरोधात बातमी लावाल तर याद राखा अशा धमक्या देवून दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला.         वास्तविक पाहता युगधर्म पब्लिक स्कूल मधील एका शिक्षिकेने 3 मे रोजी संचालक गोपाल अग्रवाल याचे विरोधात शिवाजी नगर पोस्टेला तक्रार दिली आहे. त्यामध्ये तु मला एकटी भेटत जा... सोबत कोणाला घेऊन येत जाऊ नको असे वाईट उद्देशाने गोपाल अग्रवाल बोलल्याचे शिक्षिकेने फिर्यादीत नमुद केले आहे. याबात खात्रिशीर माहितीवरूनच लोकोपचारमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र गोपाल अग्रवाल याने स्वताचे पाप झाकण्यासाठी युगधर्म पब्लिक स्कूलमधील महिला कर्मचाऱ्यांना पुढे करत त्यांना चिथावणी देवून कार्यालयात पाठवून नुकसान करण्याचे व मारहाण करण्याचे उद्देशाने तसेच पत्रकारितेपासून परावृत्त करण्यासाठी पत्रकारावर दबाव आणून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. गोपाल अग्रवाल हा व्यक्ती जर एखाद्या महिलेला एकट्यात भेट असे म्हणत असेल तर तो किती विकृत बुध्दीचा असेल हे लक्षात येते. तसेच यापुर्वी सुध्दा त्याचा विकृतपणा शहरवासियांना पाहला आहे. जर शाळेचा संचालक असा असेल तर शोळेतील विद्यार्थी, शिक्षकांवर काय परिणाम होतील हे चिंताजनक आहे.              किशोर काका रूपारेल यांच्यासोबत झालेला प्रकार हा पत्रकारांचा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असून या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार बांधव जाहीर निषेध करतो. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोषींवरआणखी कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले, सचिव अनिल खोडके, अशोक जसवानी, नितेश मानकर, विकास कुलकर्णी, राहुल खंडारे, श्रीधर ढगे, योगेश हजारे, संजय वर्मा, आनंद गायगोळ, अनुप गवळी, मोहन हिवाळे, मनोज नगरनाईक, पंकज ताठे, संतोष करे, योगेश आळशी, चंद्रकांत कोचुरे, आशिष पवार, शिवाजी भोसले, महेंद्र बनसोड, मुकेश हेलोडे, मुबारक खान, अमोल गावंडे, सुनील गुळवे, गणेश पानझाडे, मंगेश तोमर, आकाश पाटील, महेश देशमुख, विनोद भोकरे, कुणाल देशपांडे, शरद देशमुख, धनंजय वाजपे, किरण मोरे, किशोर होगे, शेख सलीम शेख फरीद, नाना हिवराळे, चंद्रकांत मुंडीवाले, मिर्झा अक्रम बेग, नितीन इंगळे, सिद्धांत उंबरकर, गणेश भेरडे महादेव पांडे यांच्यासह खामगावातील व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसटी नियञकाकडे वाहकाची तक्रारकार्यवाहीची मागणीखामगाव ( का.प्र.)शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील रहिविशी राजेश ऊगले यांनीविभाग नियंजक महा. राज्य परिवहन महामंडळ जळगाव जि. जळगाव यांचेकडे लेखी तक्रार दिव्यांग सवलतीचे कार्ड जप्तीबाबत करण्यात आली आहेऊगले हे जन्मता दिव्यांग ४०% दिव्यांग आहे त्यांनी दिव्यांग सुरक्षा हमी कायदा २०१६ अन्वेय अपमानास्पद वागणुक देत बोगस दिव्यांग असल्याचे हिणवित मला त्यांच्या लज्जेसठेस पोहचविण्याचे काम दि. १६/०६/२०२४ रोजी अकोला जळगाव खांन्देश (बस क्र. सोबत दिलेल्या टिकीटाची प्रत प्रमाणे) अकोला ते खामगाव सकाळी ठिक ९:१५ ते ९:३० प्रवासादरम्यान वाहक डि. वाय. सोनोने यांचे कडुन करण्यात आल्याचे तसेच या दरम्यान या वाहकाने बोगस दिव्यांग असल्याचे वा कलर प्रिंट यु.डि.आय.डी. हे बनावट असल्याचे सांगुन ते कार्डही वाहकाने जप्त केलेचे म्हटले आहेते वास्तविक जन्मापासुन दिव्यांग आहे याविषयी वरील वाहकाला वारंवार हातपाय पडुन विनंती केली परंतु त्या सोनोने नामक वाहकाने कुठलीच दया न दाखविता त्यांना हिनदर्जाची शिवीगाळ करित वागणुक दिली सत्यता तपासणी न करता अश्या या वाहकावर दिव्यांग सुरक्षा हमी कायद्याचे ऊल्धन केले प्रकरणी आठ दिवसाचे आत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही केली आहेयाप्रकरणी दिव्यांग संघटनेकडे सुध्दा याविषयी दाद मागणार आहे,तरी ते जन्मता ४०% दिव्यांग असल्यामुळे व हिन दर्जाची वागणुकदेणाऱ्या वाहकावर कार्यवाही तत्काळ करण्यात यावीही विनंती वजा मागणी त्यांच्याकडे तक्रारदार राजेश ऊगले यांनी सादर केली आली आहे तर तक्रारीच्याप्रतिलीपी नामदार बच्चु कडु अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग परिवहन मंत्री म.राज्य सर्व दिव्यांग संघटनायांनाही पाठविल्याचे नमूद केले आहे.

*स्मशानभुमी द्या अन्यथा आंन्दोलन*खामगाव (का.प्र.) शहरापासुन अगदी शहरातीलच वाडी ग्रामपंचायती मध्ये स्मशानभुमी करीता ग्रामसेवकाकडे आन्दोलनात्मक निवेदन गावची लोकसंख्या 8/10 हजार असून आज पर्यंत गावाला स्मशान भूमी मिळाली नाही दुर्भाग्य आहे. आणि गांवकरी मंडळी यांनी लोक वर्गणी जमा करून बांधली होती ती आज दिनांक 26.05.2024 रविवार चक्री वादळ आल्या मुळे जमीन दोस्त झाली आहे. आम्ही सर्व गावकरी आज आमच्या गावचे सरपंच विनोद प्रमोद मिरगे यांना त्याची सूचना दिली व त्याची दुरस्ती ची मागणी केली असता, त्यांनी आम्हाला ती स्मशान भूमी अवैध रित्या तुम्ही बांधली आहे त्या मुळे आम्ही काहीच मदत करू शकत नाही त्या मुळे आम्हाला 15 दिवसात स्मशान भूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी,अन्यथा आम्ही 16 व्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालया समोर स्मशान भूमीचे भूमिपूजन करून त्या जागी लोकं वर्गणी मधून स्मशान भूमि करू त्यामुळे पुढे भविष्यात काही तणाव निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील. असे निवेदन पञात राजेश धोंडुजी खोद्रे यांनी म्हटले आहे तर या निवेदनाच्या प्रतीलिपी मुख्यमंत्री कार्यालयगृहमंत्री साहेब, पालक मंत्री,आकाश फुंडकर आमदार साहेब खामगाव विधान सभा कलेक्टर साहेब बुलडाणा Sdo साहेब Bdo साहेब पंचायत समिती खामगाव... शहर पोलीस स्टेशन यांना पाठविल्या आहेत

अखेर पीडित मातेच्या तक्रारीने डॉक्टर राहुल रमेश चोपडे विरुद्ध चौकशी समिती गठीत समव्यावसायिकांना अभय की पिडीत मातेला न्याय? शहरात अनेक चर्चांना उधाण...मलकापूर ÷(अनिल गोठी)शहरातील सौ पूनम भारंबे यांचा मुलगा दुर्गेश भारंबे याचा पायाचा उपचार आर्थोपेडिक डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांनी केला होता. सदर उपचार हा चुकीचा व बेजबाबदारपणाने केला असल्याचा आरोप पीडित मातेने केलेल्या तक्रारीत म्हटले होते. सदर तक्रार व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पत्राचा संदर्भ व अभिप्राय नोंदवत बुलढाणा शल्य चिकित्सक यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने एका पत्राद्वारे त्रिसदस्सिय समिती गठीत करुण चौकशी व अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.अखेर पीडित मातेला या त्रिसदस्सीय समितीकडून न्याय मिळेल की समव्यावसायिक डॉक्टरला पाठीशी घातले जाईल? अशा वेगवेगळ्या चर्चांना आता शहरभर उधान आले आहे. याबाबत सविस्तर असे की शहरातील आर्थोपेडिक डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांनी दुर्गेश भारंबे नामक मुलाच्या डाव्या पायाची फाटलेली गादी व वाटीचे फ्रॅक्चर असताना पायाला मांडीपासून पक्के प्लास्टर केल्याने मुलाच्या पाय संवेदनहीन होऊन जीव घेण्या वेदना त्याला सहन कराव्या लागल्या. घाबरलेल्या मातेने पुढील उपचारासाठी ब्रहानपूर येथील डॉक्टर सुबोध बोरले यांच्याकडे मुलाला उपचारार्थ दाखल केले. तेव्हा सदर पायावर केलेला उपचार हा चुकीच्या उपचार पद्धतीने व बेजबाबदारपणाने केला असल्याने मुलाच्या पायाचे मोठे नुकसान झाल्याचे मातेला कळाले. त्यानंतर पीडीत मातेने शिवसेना तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांच्यासह पोलीस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार दिली. परंतु पोलिसांकडून लेखी तक्रारी वर कुठलीही दखल न घेतल्याने मातेने शिवसेना तालुकाप्रमुख यांच्यासह ठाणेदार यांच्याकडे जाऊन ठाणेदाराची चक्क आरती ओवाळून अनोखे शिवसेना स्टाईल आंदोलन केले.त्यानंतर न्यायासाठी जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांच्याकडेही तक्रार दाखल केली. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात व शहरभर या अनोख्या आंदोलनाची चर्चा पहायला मिळाली होती.=================*चौकट* *गठित त्रिसदस्सिय समितीत ह्यांचा समावेश* पीडित मातीने दिनांक 16 मे रोजी दिलेल्या तक्रारी अनुषंगाने व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पत्रांचा अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी अभिप्राय नोंदवून स्वतःच्या स्वाक्षरीने डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्या विरुद्ध त्रिसदस्सिय समिती गठीत करून चौकशी व अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले.या समितीमध्ये ...१)डॉक्टर प्रवीण घोंगटे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) जिल्हा रुग्णालय बुलढाणा २) डॉक्टर संतोष पोळ (अस्थिरोग तज्ञ )जिल्हा रुग्णालय बुलढाणा ३)डॉक्टर उंबरकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मलकापूर यांचा समावेश आहे ================समिती गठीत होताच वैद्यकिय क्षेत्रात हडकंब मजला तसेच शहरभर यामुळे चर्चांना उधान आले आहे. समितीकडून पारदर्शक व निपक्ष कर्तव्याचे पालन होईल अशी आशा मातेकडून व्यक्त केली गेली. तरीही पीडित मातेला न्याय मिळणार की नाही याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

अखेर पीडित मातीच्या तक्रारीने डॉक्टर राहुल रमेश चोपडे विरुद्ध चौकशी समिती गठीत समव्यावसायिकांना अभय की पिडीत मातेला न्याय? शहरात अनेक चर्चांना उधाण...मलकापूर (अनिल गोठी) शहरातील सौ पूनम भारंबे यांचा मुलगा दुर्गेश भारंबे याचा पायाचा उपचार आर्थोपेडिक डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांनी केला होता. सदर उपचार हा चुकीचा व बेजबाबदारपणाने केला असल्याचा आरोप पीडित मातेने केलेल्या तक्रारीत म्हटले होते. सदर तक्रार व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पत्राचा संदर्भ व अभिप्राय नोंदवत बुलढाणा शल्य चिकित्सक यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने एका पत्राद्वारे त्रिसदस्सिय समिती गठीत करुण चौकशी व अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.अखेर पीडित मातेला या त्रिसदस्सीय समितीकडून न्याय मिळेल की समव्यावसायिक डॉक्टरला पाठीशी घातले जाईल? अशा वेगवेगळ्या चर्चांना आता शहरभर उधान आले आहे. याबाबत सविस्तर असे की शहरातील आर्थोपेडिक डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांनी दुर्गेश भारंबे नामक मुलाच्या डाव्या पायाची फाटलेली गादी व वाटीचे फ्रॅक्चर असताना पायाला मांडीपासून पक्के प्लास्टर केल्याने मुलाच्या पाय संवेदनहीन होऊन जीव घेण्या वेदना त्याला सहन कराव्या लागल्या. घाबरलेल्या मातेने पुढील उपचारासाठी ब्रहानपूर येथील डॉक्टर सुबोध बोरले यांच्याकडे मुलाला उपचारार्थ दाखल केले. तेव्हा सदर पायावर केलेला उपचार हा चुकीच्या उपचार पद्धतीने व बेजबाबदारपणाने केला असल्याने मुलाच्या पायाचे मोठे नुकसान झाल्याचे मातेला कळाले. त्यानंतर पीडीत मातेने शिवसेना तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांच्यासह पोलीस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार दिली. परंतु पोलिसांकडून लेखी तक्रारी वर कुठलीही दखल न घेतल्याने मातेने शिवसेना तालुकाप्रमुख यांच्यासह ठाणेदार यांच्याकडे जाऊन ठाणेदाराची चक्क आरती ओवाळून अनोखे शिवसेना स्टाईल आंदोलन केले.त्यानंतर न्यायासाठी जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांच्याकडेही तक्रार दाखल केली. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात व शहरभर या अनोख्या आंदोलनाची चर्चा पहायला मिळाली होती.=================*चौकट* *गठित त्रिसदस्सिय समितीत ह्यांचा समावेश* पीडित मातीने दिनांक 16 मे रोजी दिलेल्या तक्रारी अनुषंगाने व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पत्रांचा अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी अभिप्राय नोंदवून स्वतःच्या स्वाक्षरीने डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्या विरुद्ध त्रिसदस्सिय समिती गठीत करून चौकशी व अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले.या समितीमध्ये ...१)डॉक्टर प्रवीण घोंगटे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) जिल्हा रुग्णालय बुलढाणा २) डॉक्टर संतोष पोळ (अस्थिरोग तज्ञ )जिल्हा रुग्णालय बुलढाणा ३)डॉक्टर उंबरकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मलकापूर यांचा समावेश आहे ================समिती गठीत होताच वैद्यकिय क्षेत्रात हडकंब मजला तसेच शहरभर यामुळे चर्चांना उधान आले आहे. समितीकडून पारदर्शक व निपक्ष कर्तव्याचे पालन होईल अशी आशा मातेकडून व्यक्त केली गेली. तरीही पीडित मातेला न्याय मिळणार की नाही याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

*मलकापूरची कन्या तलवारबाजी ची उत्कृष्ट खेळाडू कु. गौरी सोळंके हिची पुन्हा कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड* अनुराधा सोळंके हिच्यानंतर बुलढाण्यात तलवारबाजीत गौरी सोळंके* कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय स्पर्धा न्युझीलंड येथे होणार* मलकापूर:- मलकापूर ची शान म्हणजे तलवारबाजी ची उत्कृष्ट खेळाडू कु.गौरी मंगलसिंग सोळंके हिची न्यूझीलंड मध्ये होणाऱ्या 12 जुलै ते 19 जुलै 2024 दरम्यान कॉमनवेल्थ ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेत निवड झाली आहे. मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथे रहिवासी तथा सध्या मलकापूर चैतन्यवाडी नगर मध्ये वास्तव्यास आहे. ही आपल्या मलकापूर वासियांसाठी गर्वाची बाब आहे.गौरी मुळे मलकापूर शहराचा तसेच जिल्हाचा नावलोकिक वाढविला. गत वर्ष 2021-22 मध्ये लंडन येथे झालेल्या कॉमनवेल स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते नंतर कुवेत येथे एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा खेळली,,तसेच फेब्रुवारी 2024 मध्ये इटली येथे तलवारबाजीच्या 21 दिवसाचे विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली होती ते प्रशिक्षण घेतले आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या नॅशनल सीनियर तलवारबाजी 2023--24 स्पर्धेमध्ये टीम मध्ये रजत पदक मिळवले या तिच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनत या सर्व अनुभवाच्या जोरावर तिची या स्पर्धेत निवड झाली आहे.विदर्भातून 2 वेळा कॉमनवेल्थ स्पर्धा खेळणारी ती एकमेव खेळाडू आहे. गौरीच्या यशाबद्दल जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी राजे जाधव, सचिव शेषनारायण लोढे, स्पोर्ट झोन ऑफ मलकापूरचे सचिव विजय पळसकर सर, बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर साहेब, धारपवार सर तसेच लि.भो.चांडक विद्यालय चे संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षकवृंद व चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मलकापूर या सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे. व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तिचे प्रशिक्षण-- स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया ( साई अकॅडमी संभाजीनगर ) येथे ती 3--4 वर्षापासून तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. तिला तलवारबाजीचे लाभलेले प्रशिक्षक तुकाराम मेहेत्रे सर यांनी घेतलेल्या मेहनतीने ती आज या यशापर्यंत पोहोचली आहे.तर माॅं जिजाऊ जिल्ह्यातील पॅराॅ आॅल्मपिक खेळाडु महाराष्ट्र राज्य शासनाचा शिव छञपती पुरस्कार (२०२३)प्राप्त तलवारबाजी दिव्यांग खेळाडु अनुराधा सोळंकी (चिखली )हिच्यानंतर गौरी सोळंके(मलकापुर)च्या कामगिरीमुळे बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढला आहे

*दिव्यांग कर्मचारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २५ला धरणे आंन्दोलन*÷*सुभाष चव्हाण*अमरावती (वि.प्र.)मा. जिल्हा आरोग्य अधिकारीजि.प. अमरावती यांच्याकडेश्री. सुभाष सावजी चव्हाण अमरावती,नागपुर विभाग अध्यक्ष यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र धुळधाट रेल्वे येथील कनिष्ठ सहायक सामान्य भविष्य निर्वाह निधीचे शेडयूल पाठवित नसल्याबाबतची तक्रार श्रीमती सुनिता मेश्राम (दिव्यांग) आरोग्य सेविका यांना न्याय मिळण्याकरिता महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटनेच्यावतिने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार आज धरणे आंन्दोलन विषयी निवेदन करण्यात आले की, श्रीमती सुनिता मेश्राम आरोग्य सेविका दिव्यांग असून त्यांची तक्रार संघटनेकडे प्राप्त झाली. त्यांच्यावर अन्याय झाल्याचे व ते आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत असे तक्रारीत नमुद केले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र घुळघाट रेल्वे येथील कनिष्ठ लिपीक यांनी सुनिता मेश्राम आरोग्य सेविका यांचे माहे नोव्हेंबर २०१५ ते जुलै २०१६ या कालावधी मधील जी.पी.एफ.चे शेडयुल अद्याप पर्यत जिल्हा स्तरावर पाठविले नाही. कनिष्ठ लिपीक धुळघाट रेल्वे यांना प्रत्यक्ष भेटुन व दुरध्वनीद्वारे संपर्क करून सुध्दा हो पाठवितो असे सांगुन वेळ काढूपणा धोरण अवलंबत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांना या संदर्भात संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा पदाधिकारी यांनी माहिती दिलेली आहे. प्रशासकीय अधिकारी यांनी स्वतः संबंधीत लिपीका सोबत दुरध्वनीद्वारे चर्चा केली आहेपरंतु संबंधीत लिपीक कोणालाही जुमानत नाहीं. व स्वतः मनमानी कारभार चालवित आहे. तसेच त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही असे संघटनेचे ठाम मत आहे. संबंधीत लिपीकाने अद्यापपर्यत का पाठविले नाही याबाबत आपल्या कार्यालया मार्फत कार्यवाही करण्यात यावी व श्रीमती सुनिता मेश्राम दिव्यांग आरोग्य सेविका यांना न्याय मिळून देण्यात यावा व झालेल्या विलंब कालावधी मधील व्याजासह रक्कम मिळुन देण्यात यावी. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला पण श्रीमती सुनिता मेश्राम यांनी संबंधीत लिपीक जीपीएफचे शेडयुल पाठवित नसल्याबाबतचे पत्र तीन ते चार वेळा दिलेले आहे. परंतु अद्यापपर्यत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.दिव्यांग कायदा २०१६ अन्वये दिव्यांगाचे पुनर्वसन करणे त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून प्रत्येक विभाग प्रमुखाचे आद्य कर्तव्य आहे. असे असतांना सुध्दा आपल्या कार्यालयाकडुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. संबंधीत लिपीकावर कार्यवाही करून दिव्यांग कर्मचारी सुनिता मेश्राम यांना त्वरीत न्याय मिळुन देण्यात यावा. तसेच न्याय न मिळाल्या मा. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर दिनांक २५/६/२०२४ पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.सदर आंदोलना दरम्यान काही कमी जास्त झाल्यास किंवा आरोग्य सेवा कोडमडल्यास संघटना व कर्मचारी जवाबदार नसून त्याला सर्वस्वी जवाबदारी प्रशासनच राहिल. याची कृपया नोंद घ्यावी असे नमुद केले आहेनिवेदनाच्या प्रतिलिपी मा.आ.श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु साहेब अध्यक्ष दिव्यांग मंत्रालयमहा. राज्य मुंबई यांच्यासह मा. विभागीय आयुक्त, अमरावती मा. जिल्हाधिकारी साहेब, अमरावती मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती मा. राज्याध्यक्ष साईनाथ पवार (मान्यता प्राप्त संघटना) महा. राज्य. दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई-३२ मा. पोलीस निरिक्षक साहेब, गाडगे नगर अमरावती यांना माहिती व उचित कार्यवाहीस्तव सादर करण्यात आल्या आहेत

*माऊली सायन्स अकॅडमीमध्ये 13 जून पासून ११वी सायन्स, स्टेट बोर्ड, रेगुलर NEET JEE MHT-CET चा बॅचसला प्रारंभ* *खामगांव*- (वा.प्र.)"विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य हेच आमचे ध्येय'" हे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या व मागील १० वर्षापासून विद्यार्थी आणि पालक यांचा विश्वसनीय असणाऱ्या क्लास माऊली सायन्स अकॅडमीमध्ये वर्ग ११ वी चा सायन्स स्टेट बोर्ड सर्व विषय एकाच छताखाली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी तसेच मेडिकल साठी प्रवेशासाठी आवश्यक असलेली NEET, इंजिनिअरिंगसाठी JEE, आणि MHT-CET चे रेगुलर क्लासेस 13 जुन गुरुवार पासून माऊली सायन्स अकॅडमी सिव्हिल कोर्ट चा बाजूला डॉ. ओक हॉस्पिटल मागे नांदुरा रोड खामगाव येथे सुरू होत आहे. तरी खामगांव व तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी माऊली सायन्स अकॅडमी येथे संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. वर्ग ११ वी ची पहिली बॅच फुल झाली असून दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आव्हाहन माऊली सायन्स अकॅडमीचे संचालक रितेश नागलकर सर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करावा - 9096609290, 9834422399

**राष्ट्रवादी पक्षाचा स्थापना दिवस साजरा झालाच नाही *खामगाव ÷ राज्यात व केंद्रात जनसामान्यांचा भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचा खामगाव येथे स्थापना दिन दि.१०/०६/२०२४ रोजी साजरा करणे पक्षाच्या जिल्ह्यातील खामगाव येथील पदाधिकारी व तालुक्यातील पदाधिकार्‍यांना विसर पडल्याचे दिसुन आले आहे तर या स्थापना दिनाविषयी पक्षाच्या निष्टावंत कार्यकर्त्यांना विचारले असता आमच्या पदाधिकार्‍यांचे याविषयी कुठलीच सुचना मिळाल्या नाहीत ,तर काहींना विचारले असता यादिवसाची आम्हाला माहिती नाहीयावर तालुकाध्यक्षाला भ्रम्हणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे राष्ट्रवादी राजकारणावर लक्ष ठेऊन असलेली जनता विविध चर्चा करित असल्याचे पहावयास मिळत आहे.

बेमुदत आमरण उपोषण दुसरा दिवसखामगाव (मघुकर पाटिल)दि. ५/०६/२४ पासुन ग्रामपंचायत परिसर शहापुर ता. खामगाव जि. बुलढाणायेथे दोनदिवसापासुन ऊपोषणा आपल्या प्रमुख मागण्या ज्यामध्ये१) एफ. आय. आर नं १५२/२०२४ आर्थीक फसवणुक प्रकरणातील मुख्य आरोपी नामे सुनिल हरिदास पारखेडे याला तत्काळ अटक करण्यात यावी.२) सदर प्रकरणाचा तपास (SIT) स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम किंवा (LCB) (लोकल क्राईम ब्रांच) कडे वर्ग करण्यात यावा.३) आर्थिक फसवणुक प्रकरणातील गरिव शेतकऱ्यांची झालेल्या आर्थिक नुकसानीची तात्काळ भरपाई करण्यात यावी.४) सदर प्रकरणात मुख्य आरोपी आणि सह आरोपी यांना मदत करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कार्यवाही करून त्यांना सदर प्रकरणात सह आरोपी बनविण्यात यावे.५) सदर प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच सह आरोपी त्रयस्थ व्यक्ती मार्फत फिर्यादीवर दबाव आणत असुन खोट्या गुन्हयात गोवण्याच्या धमक्या देत आहे त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी६) अपर प्रकरणातील आरोपी विविध नातेवाईकांच्या माध्यमातुन फिर्यादीवर प्रलोभने दाखवत असुन तपासामधे अडथळा निर्माण करत आहे त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा.७) सदर प्रकरणातील सह आरोपी यांना विद्यमान न्यायालयाने ज्या अटीशर्तीच्या अधिन राहुन जामिन दिला आहे त्याचा भंग सदर आरोपींनी केला आहे तेव्हा शासनाने (तपास अधिकारी) यांनी जामिन रद्द साठी तत्काळ अर्ज करावा८) सदर प्रकरणात गरिब शेतकऱ्यांचे भरपुर आर्थिक नुकसान झालले असुन सध्या पिक पेरणीचे दिवस येत असुन त्याकरता शासनाने सदर प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची विल्हेवाट लावुन आर्थिक नुकसान भरून दयावे.याकरीता सदर बेमुदत आमरण उपोषण मधील संपूर्ण फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबिय ग्राम शहापुर ता. खामगाव जि. बुलढाणा येथे दोन दिवसापासुन बसले आहेत यामध्ये ऊपोषणकर्ते रामकृष्ण भिकाजी मोरखळे- वय. ६८रामदास नामदेव चराटे - वय ७१भास्कर नारायण कोकदे- वय ५८अजय रमेश लांडे- वय ३१शैलेश हरिचंद्र ताले- वय ४०राजेश भीमराव तिडके- वय ४० हे बसले आहेत

डाक विभागाच्या एजंटसाठी अर्ज करण्याचे आवाहन बुलडाणा, दि‍. 05 : भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता यांची नेमणूक करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहेथेट अभिकर्तासाठी अर्जाचा नमुना बुलडाणा प्रधान डाक घर किंवा डाक अधीक्षक बुलडाणा यांच्या लार्यालयात उपलब्ध आहे. एजंट भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी. बेरोजगारीत किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवानिवृत्त शिक्षक व इतर अर्ज करू शकतील. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबत ज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे.निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रूपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. सदर रक्कम राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा कृषी विकास पत्राच्या स्वरुपात राहणार आहे. प्रशिक्षण पूर्ततेनंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. हा परवाना आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायमच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केल्या जाणार आहे. ही परवाना परीक्षा नियुक्तीनंतर ३ वर्षाच्या आत पास करणे अनिवार्य राहिल. निवड झालेल्या उमेदवारास ठरविलेले कमिशन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक, डाक घर कार्यालय, बुलडाणा ४४३००१ येथे विहित नमुन्यातील अर्ज आणि दहावी किंवा बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र, यासह सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्ताऐवजासोबत दि. २८ जून २०२४ रोजी ११ वाजता उपस्थित राहावे.याबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा maharashtrapost.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे यांनी कळविले आहे.

पार्थ यादगिरे दहावीच्या परीक्षेत 98.80 टक्के गुण मिळवून तेल्हारा तालुक्यातुन आला प्रथम पार्थला व्हायचंय डॉक्टर ÷ तेल्हारा (मनोज भगत ) दि :-दि. 27 मे ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून या दहावीच्या परीक्षेमध्ये तेल्हारा येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ विद्यालयातील विद्यार्थी पार्थ विलास यादगिरे या विद्यार्थ्याने जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर 98.80% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला तसेच तेल्हारा तालुक्यातून सुद्धा त्याने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे .भविष्यात त्याला एमबीबीएस डॉक्टर व्हायचे असल्याचे त्याने सांगितले.तेल्हारा तालुक्यातून प्रथम आलेल्या पार्थ विलास यादगिरे या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत गणिता मध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले असून विज्ञान विषयात 100 पैकी 100 , सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 96 , हिंदी विषयात 100 पैकी 97 तर मराठी व इंग्रजी विषयांमध्ये प्रत्येकी 100 पैकी 91 गुण मिळाले असून असे ऐकून 98.80 टक्के गुण मिळाले आहेत . तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या प्राचार्या तसेच शिक्षक वृंद यांना देतो.भविष्यात जनतेची सेवा व सामाजिक कार्य करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टर बनण्याची इच्छा आहे असे पार्थ यादगिरे याने सांगितले. पार्थ यादगिरे या विद्यार्थ्याने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल व तेल्हारा तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सतकार्याचा सत्कार व्हायलाच पाहिजे. वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जोपासावी. तहसीलदार समाधान सोनवणे. तेल्हारा (मनोज भगत) तेल्हारा ग्रामीण प्रतिनीधी तेल्हारा सतकार्याचा सत्कार व्हायलाच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनि सध्याचे तापमान पाहता एक वृक्ष लागवड करुन सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी तळेगाव बाजार येथे केले ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते. या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी पोलिस पाटील भाऊसाहेब खारोडे हे होते तर विशेष अतिथी म्हणून हिवरखेड ठाणेदार गोविंद पांडव प्राचार्य अरविंद गिरे प्राचार्य सुनिता गिरे डॉ खारोडे भाउ देवराव बंड रावसाहेब खारोडे हे होते यावेळी इयत्ता बारावी व दहावी मध्ये ८०टक्के गुण घेणार्या मुला मुलींना एक वृक्ष व शिल्ड देउन गौरविण्यात आले तहसीलदार समाधान सोनवणे ठाणेदार गोविंद पांडव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पल्लवी मानखैर श्रेया मानखैर पुर्वा शिगोंकार श्रावणी खारोडे रुपालि खराटे रोहित वानखडे वैष्णवी खारोडे सार्थक चिंचोलकार मेघा खारोडे प्रिया बंड पुर्वा मगर सानिका बोदळे वैष्णवी गव्हाळे कार्तिक खारोडे या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला मधुकर ठोंबरे संजय राऊत अशोकराव मानखैर अरुण खारोडे दिलिप पाटील शे मुजफ्फर वैभव खारोडे अमर उमाळे दिपक पाटील संदीप मानखैर अंकुश खारोडे स्वराज खारोडे योगेश पाटील यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार सदानंद खारोडे यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी खारोडे हिने केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सागर पुडंकर यांनी केले .

Load More
That is All