*खामगाव तहसिलला दाखले प्रलंबित**विद्यार्थी पालकांचे हाल* तर विद्यार्थी संघटना गप्प का? खामगाव (शेखर तायडे)खामगाव तालुक्यातील शालेय विद्यार्थी पालकांचे दाखल केलेले दाखले ज्यामध्ये ऊत्पन्न दाखले,नाॅन क्रिमीलीयर,जातीचे दाखले,अधिवास प्रमाणपञ,नाॅन क्रिमीलीयरचे ऊत्पन्न दाखले,ईडब्लुएस, व ईतर दाखले खामगाव तहसिल अंतर्गत प्रलंबित असल्याने विद्यार्थी पालकांचे आर्थीक,शारिरीक,मानसिक नुकसान होत असल्याचे दिसुन येत आहे तर याविषयी अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता शासन परिपञकाचा आधार धेत दिड महिन्याचा कालावधी सांगित असल्याचे दिसत आहेया दाखल्या करिता सेतु चालक,आॅनलाईन सेंन्टर धारकांशी विद्यार्थी पालकांचे वादविवाद शीवीगाळ होत असल्याचे दिसुन आले आहेआॅनलाईन सेंन्टर धारकांची तहसिलला येरझार्यामुळे व पावती पद्धतीमुळे कालावधीचा विलंब लागत असल्याने यावर प्रशासनाने लवकरातलवकर तोडगा काढित तसेच एक कायम लिपीक दाखल्याच्या टेबलवर नियुक्त करण्यात यावा अशी चर्चा यांच्यातुन दिसुन येत आहेतर काही आॅनलाईन सेतुचालक वा केंद्रचालक तहसिल प्रशासनाशी आर्थीक व्यव्हार करित त्यांचे दाखले ते सोडुन घैत असल्याचेही दिसुन आले आहेया अनागोंदी कारभारामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थी असो वा शहरी यांच्यावतीने तहसिल कार्यलयाविषयी रोष निर्माण होत असल्पाचे दिसत आहेतर विषयी विद्यार्थीसाठी आवाज ऊचलणार्या संघटना का गप्प आहेत असा सवाल याठिकाणी निर्माण झाला आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0