हास्यजत्रा फेम चे कुणाल मेश्राम, यांच्या हस्ते मंगलाताई पुंडकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित..अकोला (सौ संध्याताई ताथोड) अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे येथील मंगलाताई पुंडकर प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख अकोला यांना तरुणाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या अकोला जिल्हा साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय युवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी हास्यजत्रा फेम कलावंत कुणाल मेश्राम, प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ संदीप चव्हाण, श्रेष्ठ साहित्यिक प्रा. सतीश तराळ, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख, पत्रकार संजय कमल अशोक, प्रा. देवानंद गावंडे, डॉ. किरण वाघमारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मंगलाताई पुंडकर यांचा सन्मान करण्यात आला.अनेक स्तरावरील पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. आजवर त्यांच्या विवीध कार्य ,, अपंग निराधार, शेतकरी,व गौर गरीबांच्या मदतीसाठी धावून जाऊन सदैव तत्पर असतात,**सामाजिक कार्य व महिला सक्षमीकरण या साठी पण त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत मंगलाताई पुंडकर यांचा सन्मान करण्यात आला होता त्या बद्दल त्यांचे सर्वत्र थरांतून अभिनंदन केले जात आहे.......
byदिव्यांग शक्ती
-
0