*दिव्यांग कर्मचारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २५ला धरणे आंन्दोलन*÷*सुभाष चव्हाण*अमरावती (वि.प्र.)मा. जिल्हा आरोग्य अधिकारीजि.प. अमरावती यांच्याकडेश्री. सुभाष सावजी चव्हाण अमरावती,नागपुर विभाग अध्यक्ष यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र धुळधाट रेल्वे येथील कनिष्ठ सहायक सामान्य भविष्य निर्वाह निधीचे शेडयूल पाठवित नसल्याबाबतची तक्रार श्रीमती सुनिता मेश्राम (दिव्यांग) आरोग्य सेविका यांना न्याय मिळण्याकरिता महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटनेच्यावतिने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार आज धरणे आंन्दोलन विषयी निवेदन करण्यात आले की, श्रीमती सुनिता मेश्राम आरोग्य सेविका दिव्यांग असून त्यांची तक्रार संघटनेकडे प्राप्त झाली. त्यांच्यावर अन्याय झाल्याचे व ते आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत असे तक्रारीत नमुद केले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र घुळघाट रेल्वे येथील कनिष्ठ लिपीक यांनी सुनिता मेश्राम आरोग्य सेविका यांचे माहे नोव्हेंबर २०१५ ते जुलै २०१६ या कालावधी मधील जी.पी.एफ.चे शेडयुल अद्याप पर्यत जिल्हा स्तरावर पाठविले नाही. कनिष्ठ लिपीक धुळघाट रेल्वे यांना प्रत्यक्ष भेटुन व दुरध्वनीद्वारे संपर्क करून सुध्दा हो पाठवितो असे सांगुन वेळ काढूपणा धोरण अवलंबत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांना या संदर्भात संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा पदाधिकारी यांनी माहिती दिलेली आहे. प्रशासकीय अधिकारी यांनी स्वतः संबंधीत लिपीका सोबत दुरध्वनीद्वारे चर्चा केली आहेपरंतु संबंधीत लिपीक कोणालाही जुमानत नाहीं. व स्वतः मनमानी कारभार चालवित आहे. तसेच त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही असे संघटनेचे ठाम मत आहे. संबंधीत लिपीकाने अद्यापपर्यत का पाठविले नाही याबाबत आपल्या कार्यालया मार्फत कार्यवाही करण्यात यावी व श्रीमती सुनिता मेश्राम दिव्यांग आरोग्य सेविका यांना न्याय मिळून देण्यात यावा व झालेल्या विलंब कालावधी मधील व्याजासह रक्कम मिळुन देण्यात यावी. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला पण श्रीमती सुनिता मेश्राम यांनी संबंधीत लिपीक जीपीएफचे शेडयुल पाठवित नसल्याबाबतचे पत्र तीन ते चार वेळा दिलेले आहे. परंतु अद्यापपर्यत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.दिव्यांग कायदा २०१६ अन्वये दिव्यांगाचे पुनर्वसन करणे त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून प्रत्येक विभाग प्रमुखाचे आद्य कर्तव्य आहे. असे असतांना सुध्दा आपल्या कार्यालयाकडुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. संबंधीत लिपीकावर कार्यवाही करून दिव्यांग कर्मचारी सुनिता मेश्राम यांना त्वरीत न्याय मिळुन देण्यात यावा. तसेच न्याय न मिळाल्या मा. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर दिनांक २५/६/२०२४ पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.सदर आंदोलना दरम्यान काही कमी जास्त झाल्यास किंवा आरोग्य सेवा कोडमडल्यास संघटना व कर्मचारी जवाबदार नसून त्याला सर्वस्वी जवाबदारी प्रशासनच राहिल. याची कृपया नोंद घ्यावी असे नमुद केले आहेनिवेदनाच्या प्रतिलिपी मा.आ.श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु साहेब अध्यक्ष दिव्यांग मंत्रालयमहा. राज्य मुंबई यांच्यासह मा. विभागीय आयुक्त, अमरावती मा. जिल्हाधिकारी साहेब, अमरावती मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती मा. राज्याध्यक्ष साईनाथ पवार (मान्यता प्राप्त संघटना) महा. राज्य. दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई-३२ मा. पोलीस निरिक्षक साहेब, गाडगे नगर अमरावती यांना माहिती व उचित कार्यवाहीस्तव सादर करण्यात आल्या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post