जिल्हाधिकारी यांच्या पुढकाराने ग्रीन अकोला अंतर्गत पहिले स्वस्तिक पॅटर्न तेल्हारा तहसील मध्ये*स्वस्तिक पॅटर्न अंतर्गत एक हजार झाडांची लागवड प्रतिनिधी तेल्हारा सौ संध्याताई ताथोड तेल्हारा- अकोला जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने अकोला पॅटर्न संपूर्ण जिल्हयात राबण्यात येत असून ग्रीन अकोला संकल्पनेतून तेल्हारा तहसील कार्यालयाच्या उपलब्ध असलेल्या दोनशे फुट जागेवर स्वस्तिक पॅटर्न राबवून किमान एक हजार वृक्षांचे रोपवन तयार करण्यात आले आहे.वृक्ष लागवडीचे स्वस्तिक पॅटर्न मॉडेल तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या पुढाकाराने वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक एस. एस. नाथण यांच्या संकल्पनेतून तयार झाले आहे. अकोला जिल्हातील प्रथम तेल्हारा तहसील कार्यालयात हा प्रयोग राबवण्यात येत आहे. तेल्हारा तहसील चे तहसीलदार यांच्या हस्ते दि. २१ रोजी वृक्षलागवडीला सुरुवात करण्यात आली .पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमान वाढत आहे. ही तापमान वाढ कमी करण्याच्या उद्देशाने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसीलच्या आवारात असलेल्या जागेवर तब्बल एक हजार - वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. सदर संकल्पना ही ऑक्सिजन मॅन ऐ. एस. नाथण यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. या मागचा प्रमुख उद्देश तहसील कार्यालयात आपल्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना भरपुर प्राणवायु व विविध औषधी वनस्पतींचा लाभ व्हावा हाच आहे तेल्हारा तहसील कार्यालयाची इमारत नव्याने बांधण्यात आली असून या ठिकाणी खुली जागा उपलब्ध असल्याने वृक्षलागवडीचे स्वस्तिक पॅटर्न मॉडेल तयार करण्याची संकल्पना आहे, याची सुरुवात येथून झाली आहे. ही झाडे जलसंधारण विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने पुरविली आहेत. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात तेल्हारा तहसील कार्यालय हे जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. या कार्यालयाने राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.यावेळी तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे नायब तहसीलदार विकास राणे मंडळ अधिकारी संजय साळवे शग्मुणा नाथन यांच्या सह तेल्हारा तहसील चे सर्व तलाठी कोतवाल व कर्मचारी उपस्थित होते*चौकट*स्वस्तिक पॅटर्न नेमके काययामध्ये पन्नास पन्नास फुटाच्या आठ बाजू एकमेकांना जोडून दोन फूट लांबीवर एक वृक्ष असे तब्बल वनौषधीं वृक्ष ऑक्सिजन देणारे एक हजार झाडांची लागवड करून स्वस्तिकचा आकार तयार केला जातो.या मॉडेलमध्ये कडूनिंब, शिसम, चिंच, कडु बदाम, सीताफळ, रामफळ, बदाम, अशोक अशा पंचवीस प्रजातीच्या वृक्षांचे रोपवन करण्यात आले आहे. एकाच प्रजातीचे झाडे जवळ जवळ नसतील याची काळजी घेतली आहे -ऐ एस नाथण, वृक्ष क्रांती मिशनजिल्हाधिकारी अकोला यांच्या ग्रीन अकोला इनीशीएटीव्ह या उपक्रमअंतर्गत संपूर्ण अकोला जिल्ह्यात स्वस्तिक पॅटर्न व मियावाकी अशा प्रकारचे वृक्षारोपण सुरू आहे. त्याअंतर्गतच तेल्हारा तहसिल कार्यालय येथे मोकळ्या जागेत स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी लागणारा खर्च हा कर्मचारी यांच्या वर्गणीतून करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन करतो.समाधान सोनोवणे तहसीलदार तेल्हारा यांनी केले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0