हातगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवांनी दिली दिव्यांगांना अपमानास्प वागणुक *** अकोला** मनोज भगत —. मुर्तिजापूर तालुक्यातील सर्वात उत्पन्नाने मोठी असलेली ग्रामपंचायत म्हणजे हातगाव ग्रामपंचायत व ही ग्रामपंचायत विस्ताराने क्षेत्रफळाने ही खूप मोठी ग्रामपंचायत म्हणून मुर्तिजापूर तालुक्यात गणली जाते व या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एमआयडीसी परिसर , पेट्रोल पंप, हॉटेल व इतरही व्यावसायिक संकुलं याच हातगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात या ग्रामपंचायत चा कार्यभार कशा पद्धतीने चालतो याचा विषय आज गटविकास अधिकारी पंचायत समिती मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदना मधून आपल्यासमोर दिसून येत आहे विषय असा की दरवर्षी शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत मधून दिव्यांगांना ५./. टक्के निधी वितरित करण्यात येतो त्या अनुषंगाने ग्रामपंचायत हातगाव कडून गावातील दिव्यांगांना ५./. टक्के निधी मिळावा यासाठी हातगाव येथील दिव्यांग ग्रामपंचायत मध्ये निवेदन देण्याकरता गेले असता त्यावेळी मासिक सभा सुरू होती , सचिवांनी दिव्यांगांना सभागृहात बोलावून दिव्यांगाना तुम्ही आता लेखी निवेदन दिले आहे, तुम्हाला मिळणारा निधी आता मी अकोला येथे वरिष्ठां कडे पाठवतो यापुढे माझ्या कार्यालयात येऊ नका तुम्हाला काय करायचे असेल ते तिकडे करा येथे येऊ नका असे सर्वांसमोर बोलून सचिवांनी निवेदन देणाऱ्या दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक दिली आहे, त्यामुळे दिव्यांगाच्या भावना दुखावल्या असून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या ग्रामसचिवास आपल्या स्तरावरून योग्य समज देण्यात यावा, तसेच हातगाव ग्रामपंचायत मधून दिव्यांगांना मिळणारा ५% टक्के निधी तुटपूंजा न देता नियमानुसार सर्व दिव्यांगाना देण्यात बाबत आज सोमवार दिनांक २४ जून २०२४ रोजी गटविकास अधिकारी मुर्तिजापूर पंचायत समिती यांना निवेदन देतांना लेखी स्वरूपात दिले आहे यावेळी उपस्थित प्रवीण खंडारे, चेतन सातिंगे ,अभिजीत वाघ ,मयुरी कैलास गोपकर ,ओमप्रकाश सराफ, सुधीर कडू ,देवानंद भोरकडे ,मालुबाई सोळंके ,नंदाबाई तेलमोरे ,सुनीता भोरकडे ,लंका बाई इंगळे, शालिग्राम इंगळे ,राजू वानरे ,सुरज वाघमारे ,मायाबाई गोपकर, तुकाराम गोपकर यश गोपकर,, मनीष ढाकूलकर, किशोर सावळे, मालू दाते ,घनश्याम राऊत ,इत्यादींनी या निवेदनावर स्वाक्षरी करून आपले निवेदन मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे.चौकट.मुर्तिजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सचिवांना दिव्यांगाचा ५./. टक्के निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यांनी या कामात हलगर्जीपणा केला असेल त्या ग्रामपंचायत सचिवावर कार्यवाही करण्यात येणार आहे. अशोक बांगर गटविकास अधिकारी यांनी माहिती दीली आहे

Post a Comment

Previous Post Next Post