अखेर पीडित मातीच्या तक्रारीने डॉक्टर राहुल रमेश चोपडे विरुद्ध चौकशी समिती गठीत समव्यावसायिकांना अभय की पिडीत मातेला न्याय? शहरात अनेक चर्चांना उधाण...मलकापूर (अनिल गोठी) शहरातील सौ पूनम भारंबे यांचा मुलगा दुर्गेश भारंबे याचा पायाचा उपचार आर्थोपेडिक डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांनी केला होता. सदर उपचार हा चुकीचा व बेजबाबदारपणाने केला असल्याचा आरोप पीडित मातेने केलेल्या तक्रारीत म्हटले होते. सदर तक्रार व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पत्राचा संदर्भ व अभिप्राय नोंदवत बुलढाणा शल्य चिकित्सक यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने एका पत्राद्वारे त्रिसदस्सिय समिती गठीत करुण चौकशी व अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.अखेर पीडित मातेला या त्रिसदस्सीय समितीकडून न्याय मिळेल की समव्यावसायिक डॉक्टरला पाठीशी घातले जाईल? अशा वेगवेगळ्या चर्चांना आता शहरभर उधान आले आहे. याबाबत सविस्तर असे की शहरातील आर्थोपेडिक डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांनी दुर्गेश भारंबे नामक मुलाच्या डाव्या पायाची फाटलेली गादी व वाटीचे फ्रॅक्चर असताना पायाला मांडीपासून पक्के प्लास्टर केल्याने मुलाच्या पाय संवेदनहीन होऊन जीव घेण्या वेदना त्याला सहन कराव्या लागल्या. घाबरलेल्या मातेने पुढील उपचारासाठी ब्रहानपूर येथील डॉक्टर सुबोध बोरले यांच्याकडे मुलाला उपचारार्थ दाखल केले. तेव्हा सदर पायावर केलेला उपचार हा चुकीच्या उपचार पद्धतीने व बेजबाबदारपणाने केला असल्याने मुलाच्या पायाचे मोठे नुकसान झाल्याचे मातेला कळाले. त्यानंतर पीडीत मातेने शिवसेना तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांच्यासह पोलीस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार दिली. परंतु पोलिसांकडून लेखी तक्रारी वर कुठलीही दखल न घेतल्याने मातेने शिवसेना तालुकाप्रमुख यांच्यासह ठाणेदार यांच्याकडे जाऊन ठाणेदाराची चक्क आरती ओवाळून अनोखे शिवसेना स्टाईल आंदोलन केले.त्यानंतर न्यायासाठी जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांच्याकडेही तक्रार दाखल केली. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात व शहरभर या अनोख्या आंदोलनाची चर्चा पहायला मिळाली होती.=================*चौकट* *गठित त्रिसदस्सिय समितीत ह्यांचा समावेश* पीडित मातीने दिनांक 16 मे रोजी दिलेल्या तक्रारी अनुषंगाने व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पत्रांचा अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी अभिप्राय नोंदवून स्वतःच्या स्वाक्षरीने डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्या विरुद्ध त्रिसदस्सिय समिती गठीत करून चौकशी व अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले.या समितीमध्ये ...१)डॉक्टर प्रवीण घोंगटे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) जिल्हा रुग्णालय बुलढाणा २) डॉक्टर संतोष पोळ (अस्थिरोग तज्ञ )जिल्हा रुग्णालय बुलढाणा ३)डॉक्टर उंबरकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मलकापूर यांचा समावेश आहे ================समिती गठीत होताच वैद्यकिय क्षेत्रात हडकंब मजला तसेच शहरभर यामुळे चर्चांना उधान आले आहे. समितीकडून पारदर्शक व निपक्ष कर्तव्याचे पालन होईल अशी आशा मातेकडून व्यक्त केली गेली. तरीही पीडित मातेला न्याय मिळणार की नाही याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post