महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेला मोठे यशराज्यातील सर्व जिल्हा परिषदेत कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळणार सहाय्यक उपकरणे बीड - (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेला मोठे यश प्राप्त झाले असून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना यापुढे स्कूटर विथ अॕडप्शन व सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील व राज्य सचिव परमेश्वर बाबर यांनी गेल्या दहा वर्षापासून मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केलेल्या रीट याचीका 6630 / 2018 च्या निकालाच्या अनुषंगाने दिनांक 28 / 6 / 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित केला. ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी सामाजिक न्याय विभाग व वित्त विभाग यांच्या संमतीने शासन निर्णय निर्गमित केला असून जिल्हा परिषदेत कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्कूटर विथ अॕडप्शन व सहाय्यक उपकरणे मंजूर करण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही व लेखाशीर्ष मंजूर करून दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र लोटन पाटील यांनी परमेश्वर बाबर अव्वरसचिव, मंत्रालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाने गेल्या दहा वर्षापासून औरंगाबाद येथे रीट याचिका दाखल करून पाठपुरावा करून माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत कार्यरत सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्कूटर विथ अॕडप्शन व सहाय्यक तंत्रज्ञान, उपकरणे मिळणार आहेत. याबाबत दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील यांनी न्यायालयाच्या निकालाबाबत सांगितले की, गेल्या दहा वर्षापासून मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे पाठपुरावा करून दिव्यांग कायदा 1995 व दिव्यांग अधिनियम 2016 च्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे जाणे सोयीचे जावे तसेच त्यांना सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे असा निकाल मा. उच्च न्यायालय यांनी दिला. सदर निकालाच्या अनुषंगाने आता जिल्हा परिषदेत कार्यरत सर्व विभागाच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना राज्यात सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे यापुढे उपलब्ध होणार आहेत. दिव्यांग कर्मचारी संघटनेला मिळालेले हे यश फक्त संघटनेचे यश नसून प्रत्येक दिव्यांग कर्मचाऱ्यांचे, प्रत्येक तालुकाध्यक्षांचे, प्रत्येक जिल्हाध्यक्षांचे यश असून त्यात विशेष बाब म्हणून विशाल शिंपी तालुकाध्यक्ष पारोळा यांचे सहकार्य लाभले असे दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी शेवटी म्हटले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0