सतकार्याचा सत्कार व्हायलाच पाहिजे. वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जोपासावी. तहसीलदार समाधान सोनवणे. तेल्हारा (मनोज भगत) तेल्हारा ग्रामीण प्रतिनीधी तेल्हारा सतकार्याचा सत्कार व्हायलाच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनि सध्याचे तापमान पाहता एक वृक्ष लागवड करुन सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी तळेगाव बाजार येथे केले ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते. या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी पोलिस पाटील भाऊसाहेब खारोडे हे होते तर विशेष अतिथी म्हणून हिवरखेड ठाणेदार गोविंद पांडव प्राचार्य अरविंद गिरे प्राचार्य सुनिता गिरे डॉ खारोडे भाउ देवराव बंड रावसाहेब खारोडे हे होते यावेळी इयत्ता बारावी व दहावी मध्ये ८०टक्के गुण घेणार्या मुला मुलींना एक वृक्ष व शिल्ड देउन गौरविण्यात आले तहसीलदार समाधान सोनवणे ठाणेदार गोविंद पांडव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पल्लवी मानखैर श्रेया मानखैर पुर्वा शिगोंकार श्रावणी खारोडे रुपालि खराटे रोहित वानखडे वैष्णवी खारोडे सार्थक चिंचोलकार मेघा खारोडे प्रिया बंड पुर्वा मगर सानिका बोदळे वैष्णवी गव्हाळे कार्तिक खारोडे या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला मधुकर ठोंबरे संजय राऊत अशोकराव मानखैर अरुण खारोडे दिलिप पाटील शे मुजफ्फर वैभव खारोडे अमर उमाळे दिपक पाटील संदीप मानखैर अंकुश खारोडे स्वराज खारोडे योगेश पाटील यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार सदानंद खारोडे यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी खारोडे हिने केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सागर पुडंकर यांनी केले .
byदिव्यांग शक्ती
-
0