पार्थ यादगिरे दहावीच्या परीक्षेत 98.80 टक्के गुण मिळवून तेल्हारा तालुक्यातुन आला प्रथम पार्थला व्हायचंय डॉक्टर ÷ तेल्हारा (मनोज भगत ) दि :-दि. 27 मे ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून या दहावीच्या परीक्षेमध्ये तेल्हारा येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ विद्यालयातील विद्यार्थी पार्थ विलास यादगिरे या विद्यार्थ्याने जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर 98.80% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला तसेच तेल्हारा तालुक्यातून सुद्धा त्याने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे .भविष्यात त्याला एमबीबीएस डॉक्टर व्हायचे असल्याचे त्याने सांगितले.तेल्हारा तालुक्यातून प्रथम आलेल्या पार्थ विलास यादगिरे या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत गणिता मध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले असून विज्ञान विषयात 100 पैकी 100 , सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 96 , हिंदी विषयात 100 पैकी 97 तर मराठी व इंग्रजी विषयांमध्ये प्रत्येकी 100 पैकी 91 गुण मिळाले असून असे ऐकून 98.80 टक्के गुण मिळाले आहेत . तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या प्राचार्या तसेच शिक्षक वृंद यांना देतो.भविष्यात जनतेची सेवा व सामाजिक कार्य करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टर बनण्याची इच्छा आहे असे पार्थ यादगिरे याने सांगितले. पार्थ यादगिरे या विद्यार्थ्याने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल व तेल्हारा तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0